Skip to main content

अध्यात्म विराम १४९

अध्यात्म विराम १४९

सर्वसामान्य मानवी मनाचा हा गुणधर्म आहे की, एखाद्याचे ऋण असतील आणि त्यावर आपल्या जीवनाचा डोलारा उभा असतो, त्या ऋणकर्त्याचे ऋण आपण सहसा विसरत नाही. कृतज्ञ माणसाचं ते लक्षण आहे. आयुष्यात कितीही वर गेला तरीही, कोणताही माणूस, आयुष्यातील अश्या मदतीचे ऋण विसरत नाही, ज्याच्या आधारावर आपण पुढे जातो. आता या आपल्या कृतज्ञता पूर्ण स्वभावाच्या पार्श्वभूमीवर आपणच स्वतः बद्दल हा विचार करावा की, आपल्याला हा देह,मुळात हे श्वासाचं गणितं पुरवून, ज्याने आपल्याला या पृथ्वीतला वर पाठवलं आहे, त्याचे ऋण आपण कधीतरी फेडू शकतो का. तर नाही.

बरं तो ईश्वर आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, अश्या अनंत प्रकारचे उपकार करून, आपलं जीवन समृद्ध करतो. पण तरीही जर काही न्यून असेल तर ते आपल्या कर्मातुन आलेलं न्यून आहे. असं असताना सुद्धा आपण, आपल्या कर्माच्या भोगांचा हिस्सा, ज्याचे आपल्यावर आधीच ऋण आहेत, अश्या ईश्वराच्या नावावर टाकून, आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करतो. 

ईश्वराला सुद्धा हे पाहून खेद वाटतं असेल की, करणार माणसं स्वतः, उपभोग सुख आलं की, आपल्याकडे त्यांचं श्रेय घेऊन मोकळे होतात. पण भोग वा दुःख आलं की, माझ्याकडे अंगुलीनिर्देश करून मोकळे होतात. किती हास्यास्पद आहे.म्हणूनच या ऋण कर्त्या ईश्वराला, दिवसा तून एकदा जरी, त्याच्या उपकारचं श्रेय दिलं तर, नक्कीच त्याचा लाभ आपल्यालाच मिळेल. कारण ईश्वरच एक वैशिष्ट्य आहे की तो कोणतेही उपकार बाकी ठेवत नाही. सर्वाची, त्या त्या व्यक्तीला सव्याज परतफेड करून मोकळा होतो. 

आपल्याच कृतज्ञता पूर्वक उच्चारलेल्या काही अक्षरांचा, भावनांचा, अगणित रुपात, परतावा आपल्यालाच प्राप्त होतो, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच माणसाला फक्त मनातल्या मनात ईश्वराच्या अनंत उपकाराबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आहे. ईश्वर इतका दयाळू व कृपाळू आहे की, तो आपल्या मनातील भाव जाणून, त्याचा स्वीकार करतोच करतो. या व्यतिरिक्त दुसरा मार्ग म्हणजे, त्याच्या नावाचा पुनरुच्चार करून,त्या द्वारे त्याचे आपल्या वरील अनंत ऋण व्यक्त करायचे. हे ऋण फक्त याचं जन्मातीलच बसून,ते मागील अनंत जन्मातील असू शकतात. 

म्हणून त्याला सतत स्मरत गेल्यास, या अनंत रुणा तील काही कमी होण्यास मदत मिळते. त्याला आपल्यारख्या भक्तांची जरूर असतेच. अजून एक लाभ म्हणजे प्रत्येक श्वासा गणिक, तो आपल्यासोबत आहे, याचा आपल्याला प्रत्यय येतो. दूसरा लाभ म्हणजे, स्मरणाच्या मार्गाने मरणाच्या दारापर्यंत गेल्यास, पुढील जन्माची, संचिताच्यां वहनाची जबाबदारी त्या ईश्वराकडे जाते. कारण अंते मती सा गती, या न्यायाने अंत समयी, जी बुद्धी होईल, किंवा जे प्रत्यक्ष कल्पनेत, ओठांवर व मनात असेल, त्यानुसार आपल्याला पुढील जन्माची प्राप्ती होते. 

विषय मोठा आहे, त्यामुळे उद्याच्या भागात प्पुढे सुरू ठेवू. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...