Skip to main content

अध्यात्म विराम १३५

अध्यात्म विराम १३५

मनाला पटणारी प्रत्येक गोष्ट, विचार लहरी या कुठल्या तरी तर्काने किंवा सिद्धतेने प्रेरित किंवा सक्षित्वाने सिध्द होणारी असते. म्हणजे अतार्किक, असंबद्ध असैद्धांतिक गोष्टी मन करमणूक म्हणून पाहून वा ऐकून सोडून देतं. मनाचा हा मूळ व नैसर्गिक गुणधर्म आहे. पण ही परिमाणं व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. पुन्हा व्यक्तिपरत्वे ही भिन्नता परिस्थिती,ज्ञान,आकलन, चिंतन आणि विश्लेषण यावर अवलंबून असते.म्हणजे माणूस परिस्थिती व आपल्या व्यक्तिगत स्थिती यावर आधारित लहरी, विचार तर्क याना स्वीकारतो किंवा नाकारतो. नाकारतो म्हणजे तो त्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्या नाकारलेल्या गोष्टींचा, विचारांचा व लहरींचा कोणताही परिणाम, मनावर होत नाही.

अर्थात माणूस विचार करून एखादी गोष्ट मनात ठरवतो किंवा अविचाराने न ठरवून कृती करतो. पण या दोन्ही स्थितीत त्याची मनाची भावावस्था त्याला मार्गदर्शन करते. आता मनाला पटणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे नाही. उदाहरणार्थ एखाद्या दुर्गम भागात खेड्यात राहणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या कल्पनेत किंवा निरीक्षणात न आलेली कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती खरी वाटू शकते. याचं कारण ज्ञानाची कमतरता. खरतर त्याला अज्ञान संबोधता येणार नाही. कारण अज्ञान म्हणजे सुद्धा ज्ञानाचा अभाव. पण जे काही कमी, सूक्ष्म असेल तरी ते असतं ज्ञानच. 

म्हणून जिथे ज्ञान कमी किंवा अज्ञान जास्त, त्या मनावर कोणताही विचार न करता, विश्वास ठेवण्याची सवय अधिक असते. ही एकप्रकारे निरागसता म्हणता येईल. पण म्हणूनच असं निश्चित व ठामपणे म्हणता येईल की, जिथे निरागसता जास्त, तिथे विश्वास जास्त आणि जिथे विश्वास जास्त, तिथे श्रद्धा अधिक प्रमाणात असते. म्हणूनच कोवळ्या मनावर संस्कार करण्याची शास्त्रीय पद्धती,या अभ्यासाने आपल्या सनातन धर्मात रूढ करण्यात आली. म्हणजे असं नक्की म्हणू शकतो का की, जिथे ज्ञान वाढत जातं, तिथे श्रद्धा व विश्वास कमी होत जातो. नक्कीच असं म्हणता येईल. पण जे ज्ञान श्रद्धा, विश्वास यांना तडा देऊन, त्यांना कमी करतं किंवा संपवतं ते विपरीत ज्ञान.

याचीच दुसरी बाजू म्हणाजे, जे ज्ञान, अज्ञान दूर करून श्रद्धा , विश्वास यांचा भाव मनात जागृत करून वृद्धिंगत करतं, ये ज्ञान यथार्थ ज्ञान होय. म्हणजे ज्ञानाचे ढोबळ मानाने दोन प्रकार होतात. एक म्हणजे यथार्थ ज्ञान आणि दुसरं विपरीत ज्ञान. आता ज्ञानाच्या या विभागणीतून आपल्यासाठी योग्य व यथार्थ ज्ञान कोणतं आणि विपरीत ज्ञान कोणतं, हे आपण कसं काय ठरवू शकतो, असा एक प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर सर्वात सोप्पं आहे. जे ज्ञान मनातून अविश्वासाला दूर करून, मनातील अंधःकार नाहीसा करून, मनात श्रद्धा विश्वास निर्माण करून, तो दृढ व वृद्धिंगत करतं, ते यथार्थ ज्ञान आहे. 

म्हणजेच जे ज्ञान ही श्रद्धा निर्माण होऊ, न देता किंवा असलेली कमी कमी करत नष्ट करण्याचं कार्य करतं, ते ज्ञान विपरीत ज्ञान समजावं. आता अजून एक प्रश्न निर्माण होतो की, श्रद्धा व विश्वास कशाबद्दल असावा किंवा निर्माण केला जावा. तर तो तर्कांच्या संगतीबद्दल, विवेकाबद्दल, प्रेमाबद्दल, आदराबद्दल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वरीय अस्तित्वाबद्दल. या जगातून आपण आपल्या आधीचे करोडो जन नष्ट झाले, त्याच प्रमाणेच एक दिवस नष्ट होणार, हे नक्की. 

मग जे नश्वर नाही, त्याबद्दल आकर्षण, आस्था, विश्वास व सरते शेवटी श्रद्धा निर्माण करणारं ज्ञान प्राप्त करावं, असलेलं वृद्धिंगत करावं आणि त्यावर श्रद्धा बाळगून, त्या ईश्वरीय शक्ती पुढे कायम लीन राहून, त्याचं स्मरण करावं, हे समजावून सांगणारं ज्ञान हे विश्वातील , नव्हे ब्रम्हांडा तील सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. याचं ज्ञानाबद्दल उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत त्या करुणाकरी शक्तीचं स्मरण करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...