Skip to main content

अध्यात्म विराम १३३

अध्यात्म विराम १३३

मुळात विचारांना महत्व का द्यायचं,तर तेच सर्व काही साध्य करून घेतात आणि देतात. कारण विचार शून्य कृती ही घातक आहेच पण अविचाराने केलेली कृती हीसुद्धा तितकीच आत्मघातकी असते. म्हणजे विचारांचा अभाव आणि योग्य विचारांचा अभाव अश्या दोन्ही कारणांनी माणूस चुकीची कर्म करून, भोग, दुःख, पश्चात्ताप ओढवून घेतो. पण नंतर मात्र दोष देव व दैव याना देतो. एकजरी खरं असलं की, आपण प्रत्येक कर्माची संगती फलाशी लावू शकत नाही, तरीही तशी तर्क संगती लावून आपण ताडून पाहू शकतो.

पण आपल्या सर्व कर्मांची फलनिष्पत्ती याचं जन्मात होईल असं नाही. कारण आपण फक्त या देहाचा आणि याच जन्माचा विचार करू शकत असलो तरीही, आत्मा हा अविनाशी आहे आणि तो नित्य एका देहातून दुसऱ्या देहात, इच्छापूर्ती साठी फिरत असतो. इच्छा या वासने तून जन्म घेतात आणि वासना मायेतून. आता वासना या चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या असतात त्याच प्रमाणे माया सुद्धा चांगली व वाईट दोन्ही प्रकारची असते.

जसं लग्न करणं आणि आपला प्रपंच पुढे नेऊन, प्रजोत्पादन करणं, हा एक नैसर्गिक नियम व अधिकार आहे. त्या अधिकारापोटी अनेक गोष्टी माणूस करतो. म्हणजे इथे जन्माला असलेली किंवा उत्पन्न झालेली माया ही चांगली आहे आणि त्यातून इतर अनेक वासना जन्म घेतात. त्या वासनांमधून अनेक विध इच्छा जन्म घेतात. त्याच इच्छांच्या पूर्ततेसाठी माणूस प्रपंच नामक चक्र तयार करवून घेतो आणि त्यात आपल्या पूर्ण आयुष्याला अर्पण करतो. ज्यावेळी यातील अनेक पूर्ण होतात त्यावेळी आनंदी होतो आणि ज्यावेळी यातील काही अपूर्ण राहतात किंवा आपल्या इच्छे प्रमाणे फल देत नाहीत, तेंव्हा तोच मनुष्य दुःखी होतो, निराश होतो. 

पण ज्या गोष्टीच्या मागे तो आधी धावला, कष्ट घेतले, त्याचा पाया हाच मुळी अशाश्वत आणि बेभरवशाचा आहे, त्याच्यावर पूर्ण विसंबून राहून, जे मिळेल ते आपल्या इच्छा, वासना, माया आणि कर्म यांच्या परिणामातून आलेलं आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे कर्माचा पायाच जिथे एका तकलादू आधारावर आहे, त्यातून मिळेल ते केलेल्या कर्माचं प्राप्त फल आहे, हा सरळसरळ एकसमायिक समिकरणाचा इष्ट परिणाम आहे किंवा असतो, हे ध्यानात धरावें लागेल. म्हणजे लॉटरीचं तिकीट काढताना, ते बक्षीस मिळेल किंवा न मिळेल हे माहीत असूनही, आशेच्या धाग्याने बांधलेलं मन, बक्षीस न मिळताच, खट्टू किंवा नाराज होतं. 

हे चूक आहे हे जाणवून सुद्धा आपण मनाला समजावू शकत नाही, याचं कारण आपण आपल्या मनाशी संवाद साधायला कमी पडतो, किंवा आपल्या मनाला सत्य स्वीकारायची व त्यातून बोध घ्यायची इच्छा नाही आणि अपेक्षा नाही, हे नक्कीच. 

अनेक प्रकारे आपण आपल्या मनाला समजावून सांगू शकतो की, मुळात एखादं कर्म केल्यावर, मला त्याचं फल चाखता येईल किंवा भोगावं लागेल.कारण याचा परिणाम काय आहे, हे मीच काय कोणीही सांगू शकणार नाही. पण काही निश्चित आडाखे, नीतीचे नियम, शास्त्र, वेद इत्यादी माध्यमातून आपल्याला माहीत झालेले आहेत. ते म्हणजे उत्तम वागणूक असेल तर चांगलं कर्म हातून घडेल व वागणूक वाईट किंवा स्वार्थी स्वरूपाची असेल तर, आपल्या हातून, वाईट कर्म घडेल.

ही वागणूक माणसाच्या वृत्ती वर आणि वृत्ती मनाच्या आकलना वर अवलंबून आहे. सरते शेवटी आकलन हे आत्म्याच्या संस्कार, ज्ञान इत्यादी वर अवलंबून आहे. यावर उद्याच्या भागात, सविस्तर चर्चा करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...