Skip to main content

भाजपा सेना हे दोघे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महा आघाडीला नाचवणार!!

भाजपा सेना हे दोघे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महा आघाडीला नाचवणार!! 

सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वेळोवेळी काढलेल्या अपमानजनक विधानांबद्दलचा आक्रोश सध्या गाजतो आहे. वास्तविक ही काही पहिलीच वेळ नाही, राहुल गांधी यांनी असे उद्गार काढण्याची. गेल्या तीन वर्षात, विशेषतः महा आघाडीच्या काळात, अनेकदा राहुल गांधी यांनी मुद्दामहून तात्यारावांचा अपमान केला आहे. (मधला विकास हा मुद्दाम गाळलाय. कारण अडीच वर्षात राज्याला अधोगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं शासन राज्याने पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या नावात विकास शब्द लिहायचं धैर्यच होत नाहीये 😃. म्हणून महा आघाडी). 

स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी, विधानसभेत आणि बाहेर सुद्धा, आपल्या भाषणात वेळोवेळी ही अगतिकता बोलून दाखवली आहे.कारण ज्यावेळी आघाडी सरकारच्या काळात असे प्रसंग जाणून बुजून गांधी यांच्याकडून, रचले गेले, त्या त्यावेळी, आपली कुचंबणा झाली, हे मुख्यमंत्री यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले आहे. कदाचित हे त्यावेळी मुद्दामहून सेनेची गोची करण्यासाठी घडवण्यात आलं असावं. पण त्यावेळी सेनेला सत्ता टिकवायची असल्यामुळे, त्यांना मूग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु ज्यांना त्यावेळी अपमान गिळायची वेळ आली आणि ज्यांना हे अपमानकारक वाटत होतं, ते जून 2022 ला बाहेर पडून, त्यांनी शिवसेना आपली आहे, याबाबत अधिकृत अधिकार सिध्द केला आणि प्राप्त केला. 

त्यातच निवडणूक आयोगाचा लागलेला निकाल, आता सुप्रीम कोर्टात अपेक्षित असलेलाल्या निकालाची टांगती तलवार, पात्रता नसतानासुद्धा,आपल्याकडे वारसा हक्काने आलेली सेना ही आपली खाजगी मालमत्ता आहे, हे समजून, एखाद्या मुघल सम्राटा प्रमाणे आपला पक्ष चालवून, आता विचित्र कात्रीत स्वतःला अडकवून घेतलेले, सेनेचे माजी पक्षाध्यक्ष, मोठ्या कुचंबणा युक्त . मन:स्थितीत आहेत. त्यांची देहबोली, भाषा, भाषण यातून हे जाणवत आहे. कारण स्वतःच्या अकर्तृत्वाने घालवलेलं राज्य, राजीनाम्याच्या एका राजकीय आत्मघातामुळे, इश्वरसुद्धा पुन्हा मिळवून देऊ शकत नाही, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. 

त्यामुळे भाजपाचे विरोधक, कितीही सकारात्मकपणे डोळे लावून बसले असले तरी, चमत्कार सोडला तर, सुप्रीम कोर्टात कोणीही ठाकरे यांचे गेलेले सरकार परत आणू शकत नाहीत. बरं आज 9 महिने झालेत, शिंदे यांच्याकडून एक साधा कार्यकर्ता सुद्धा फुटून इकडे आलेला नाहीये. त्यातच ठाकरे गटाकडून सुरू असलेली ओहोटी अजून चालूच आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे फारच अगतिक स्थितीत आहेत. त्यात अजून एक मजेची बाजू म्हणजे, भाजपा शिवसेना यांनी आपला संपूर्ण रोख आणि प्रचाराची दिशा फक्त आणि फक्त उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच केंद्रित केली आहे. 

त्यामुळे आघाडीतील खरे दोन पक्ष काँगी आणि रांका हे जवळजवळ निष्प्रभ झालेले वाटतात. म्हणूनच अजित दादा मधे मधे आपलं अस्तित्व जाणवून देतात. जून 22 मागील अडीच वर्ष भीष्माचार्य बनलेले काका, आज जवळपास मीडिया पारिघाच्या बाहेर गेलेले दिसतात. म्हणूनच राहुल गांधी प्रकरण झाल्यावर, ते दोन्ही पक्ष विशेषतः काका, पुन्हा एकदा reactive झाले आणि केंद्रबिंदू आपल्याकडे वळवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण तरीही नंतर उद्भव लेल्या सावरकर अपमान प्रकरणाचा लाभ घेऊन, उद्धव ठाकरे यांनी मालेगावात टीका करून, कोंगी आणि काका यांची जबरदस्त पंचाईत केली. 

कारण आजच्या घडीला उद्धव ठाकरे त्यांचं आघाडी सोबत असणं, हा काकांसाठी प्रेस्टिज प्रश्न आहे. कारण काकांची ताकद, तीन साडेतीन जिल्ह्यात संपते. त्यांचं अस्तित्व फक्त मीडिया coverage वर जास्त आहे आणि मतांसाठी या वयातही, त्यांना पावसात भिजावं लागतं. त्यातही त्यांच्या पक्षात पुढील पिढीची वर्चस्वा साठी सुरू झालेली लढाई लपून राहिलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे, हे त्यांच्यासाठी मास्टर कार्ड झाले आहेत. 

म्हणूनच सावरकर यांच्यावरील टिकेनंतर आणि ठाकरे यांच्या मालेगावातील टिप्पणीनंतर काका लगेच खर्गे राहुल गांधी यांना भेटून, त्यांना सांगते झाले की, ठाकरे जर नाराज होऊन, वेगळे झाले, तर अनेक मतदारसंघात जिथे आपला मतदार आधार कमी आहे, तिथे मतांची बेगमी कशी करणार. त्यामुळे राहुल गांधी यांना सावरकर प्रकरणात गप्प बसवण्यासाठी ठाकरे यांची पंचाईत करण्यात, भाजपा सेना नक्कीच यशस्वी झाले आहेत. 

याचं कारणाने, रांकाशी उभे मतभेद असलेल्या वंचित बरोबर ठाकरे यांनी साटलोट करूनही, काका काहीही करू शकले नाहीत.म्हणजेच येणारी एकूण सव्वा वर्ष, हे चित्र निश्चित दिसत आहे की, ज्याप्रमाणे, उद्धव ठाकरे यांनी भाजपाला 2014 ते 2019 सतत मानसिक त्रास दिला, त्याचप्रकारे काँगि आणि रांका याना उद्धव ठाकरे नाचवणार. बघुया काका आणि त्यांचे पुतणे हे कितपत सहन करतात. कारण आता खरी परीक्षा त्यांची आहे आणि भाजपा सेना टोचणी घेऊनच बसले आहेत. 

काका आता समजेल तुम्हाला, फडणवीस यांनी 2014 ते 2019 ही पाच वर्ष ठाकरे यांच्यासह कधी काढली. आता ठाकरे तालावर नाचायची पाळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची. 

©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
२९/०३/२०२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...