Skip to main content

सेना - ठाकरे संघर्ष, सुप्रीम कोर्ट आणि हरिश साळवे ! भाग ३

सेना - ठाकरे संघर्ष, सुप्रीम कोर्ट आणि हरिश साळवे ! भाग ३

साळवे यांनी एक सुंदर वाक्य म्हटल,त्या दिवशी आपल्या युक्तिवादात, जे माझ्या मनाला भावलं आणि त्याचा impact, जर निकाल विरुद्ध गेला आणि जर, reference application करावी लागली, तर त्याचा नक्की उपयोग होईल. त्याचा खरा मतितार्थ खूप गहन आहे. ते वाक्य आहे. 

Mr Kaul has addressed, Your lordships,on the issus, which perhaps don't arise, if your lordship, sit, back and consider.

म्हणजे कौल यांनी त्या सर्व मुद्द्यावर युक्तिवाद केलेला आहे, न्यायाधीश महाराज, जे मुद्दे कदाचित गैरलागू आहेत, किंवा उपस्थित होऊ शकत नाहीत, किंवा जे मुद्दे उपस्थित होण्याची, शक्यताच नाही. 

म्हणजे असे अनेक मुद्दे चर्चे दरम्यान उपस्थित करण्यात आलेत, ज्यांना या खटल्याचा भाग बनवण्यात आलंय. आणि तरीही ते सर्व युक्तिवादात कौल यांनी खोडून काढले आहेत, जे या केस संदर्भात लागू सुद्धा होत नाहीत. 

याचा दूरगामी अर्थ असा होतो की, काही गैरलागू मुद्द्यांवर या केसला न्यायालयाने तोलण्याचा प्रयत्न करून, निकाल दिलाच, तर त्याही मुद्द्यांना आम्ही युक्तिवादात उत्तर दिलीत, खरतर ते मुद्दे या केसच्या संदर्भात, गैर आहेत आणि आपण त्यांना विचारात घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण यदाकदाचित न्यायालय त्यांना ग्राह्य मानत असेल, तर तेही मुद्दे आम्ही विचारात घेतले आहेत आणि उत्तरित केले आहेत.

इतक्या खोलात जाऊन, विचार करून, आपली प्रत्येक वाक्य तोलून वापरणारा साळवे यांच्यासारखा दूरदृष्टी व्यक्ती सुद्धा कुठल्याही, अशक्य निकालाची शक्यता मनात ठेवून, पुढील कायदेशीर लढाईचा विचार करून आपला एक एक शब्द उच्चारतो. 

यातील दुसरा भाग मला अत्यंत महत्वाचा वाटतो, की न्यायालयाने शांतपणे जर त्या मुद्द्यांचा व कौल यांच्या युक्तिवादाचा साकल्याने, सर्वार्थाने व गांभीर्याने विचार केला तर, न्यायालयाच्या हे लक्षात येईल की, असे अनेक गैरलागू मुद्दे आहेत, ज्यांना या केसच्या संदर्भात काहीही अर्थ नसणार आहे. त्यामुळे ते गैरलागू आहेत याचा न्यायालयाने, गांभीर्याने विचार करावा. 

बघुया पुढे, घोडा मैदान फार लांब नाही. 

© संकल्पना व लेखन प्रसन्न आठवले
०६/०३/२०२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...