Skip to main content

अध्यात्म विराम १५२

अध्यात्म विराम १५२

मनातील ईश्वरी भक्तीचा भाव स्मरणातून सुरू होतो. स्मरणातून, उच्चारण, त्यातून श्रुती श्रवण, त्याची आवर्तनं, आवर्तनातून अर्चन, अर्चनातून अर्पण, अर्पणा तून शरण, शरणातून दास्यत्व, दस्यत्वातून सख्य असा हा भक्तीचा मनोमय प्रवास, देहाकडून अंतरात्मा आणि त्यातून परमात्मा या स्थानी समाप्त होतो. आता यातील एकेक मुद्द्यावर विचार करूया. एक गोष्ट ध्यानात असूद्या की, ईश्वर देह आणि देहाची स्थिती याबद्दल अनभिज्ञ असतो. किंबहुना कोणाही प्राण्याबद्दल ईश्वर देही न पाहता, मनाच्या स्थितीला पाहतो आणि त्यातून प्राण्याची परीक्षा करतो. 

अर्थातच मानवाच्या देहात मनाची स्थापना करून, बुद्धीच्या माध्यमातून त्याला उच्च अधिष्ठान दिलेलं असल्यामुळे, मुख्यत्वे हे सर्व मानवाच्या मनाबाबत आपण बोलत आहोत हे गृहीत धरावं. आपण देहाने केलेले कोणतेही उपचार ईश्वराकडे पोचत नाहीत. कारण ते देहाचे उपचार आहेत आणि मनाचा त्यात सहभाग नसेल तर, ते केवळ एक कर्म आहे. अर्थात त्या कर्माच जे फल, उपाचारपूर्वक प्राप्त होणं गरजेचं आहे, ते नक्की मिळेल. पण कोणत्याही स्वरूपाचं ईश्वरी आराधन हे मनाने आणि मुखतः आत्म्याने घडलेलं असेल तर ते पूर्ण फलदायी होतं. 

याबाबत. कोणतीही संदिग्धता बाळगायची जरुरी नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे देहाची उपलब्धता ईश्वराने, त्याचे स्मरण, पूजन, अर्चन, चिंतन भजन या माध्यमातून, प्रत्येक भक्ती मानवाने करावी, यासाठी करून दिलेली आहे. त्यामुळे देह हा निव्वळ एक माध्यम आहे. पण साधन हे मन आणि अंतरात्मा आहे, हे पक्क ध्यानात राहुद्या. त्यामुळे मनाला पूर्ण एकाग्र करूनच कोणतंही ईश्वरी कार्य करावं, याचसाठी प्रथम श्रवण भक्तीचा उगम झाला. कारण गर्भात असताना आणि जन्मानंतर श्रवण माध्यमातून बुद्धिद्वारे साद, ध्वनी मनाच्या सभागृहात पोचतात. ते तिथे नोंदले जातात. 

त्या साद ध्वनी याना मन हे, देह बुद्धी व वाचा या माध्यमाने प्रतिसाद देतं. त्यामुळे श्रवण, ग्रहण या क्रिया आणि कर्म हा प्रतिक्रिया, असा खेळ विधात्याने घडवून आणला आहे. यामधे मनाचा सहभाग ज्या ज्या ठिकाणी असेल, त्या त्या गोष्टी जीवाला बद्ध करतात. देहाने केलेलं सर्व देह भोगतो आणि भोगणार. पण त्यात मनाचा असलेला सहभाग जीवाला भोग आणि त्याच दुःख या भावना भोगायला भाग पाडतो. म्हणजे आपण जे भोग देहाने भोगतो, ते ते सर्व आपण देहाने केलेल्या कर्माचं फल आपल्या समोर आलेलं आहे. 

पण त्यातून मनाला होणाऱ्या वेदना, दाह, त्रास हा आपल्याला त्यापुढील कर्मात बद्ध करतो. म्हणूनच संत सज्जन, शास्त्र इत्यादींनी वेळोवेळी सांगितल आहे की, देहाच्या कोणत्याही भोग वा उपभोग स्थितीत मनाला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यातून येणारी बद्धता, प्राप्त होणार नाही. म्हणजे एकप्रकारे आपल्याला समीकरण प्राप्त झालं की, सांसारिक व प्रापंचिक गोष्टीत मन हे उदासीन किंवा तटस्थ असावं आणि अध्यात्मिक गोष्टीत मनाचा पूर्ण सहभाग असावा, देहाची कोणतीही स्थिती असो. 

याचाच अर्थ भोग आणि उपभोग दोन्ही काळात, मनाला त्यातून मुक्त करावं आणि निरिच्छ भावनेने त्याचा उपभोग घ्यावा किंवा दाह सहन करावा. कसं ते ध्यानात धरा. कायम हे मनात असूद्या की मी भाड्याच्या घरात रहात आहे. अर्थातच आत्मा मनाच्या सहाय्याने, तात्पुरत्या प्राप्त देहात रहात असून, त्याचं कायम स्वरूपी घर हे ईश्वराचं हृदय स्थान आहे. त्यामुळे आपला मूळ उद्देश ध्यानात राहील आणि भोग सहन करताना आणि उपभोग घेताना साहजिक तटस्थता येईल. 

याचं मुद्द्याला धरून, उद्या पुढे चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...