Skip to main content

अध्यात्म विराम १२५

अध्यात्म विराम १२५
 
भोगाच्या वाटेवरून आपण साधनेच्या मार्गावर येण्या साठी आपली पूर्वापुण्याई कमी येते. मुळातच सद्गुरू कृपा होण्यासाठी आपली तशी पात्रता असावी लागते. अध्यात्मिक मार्गात ही पात्रता, जन्म, जातपात, पैसा, श्रीमंती, गरिबी अश्या कोणत्याही निकषावर ठरत नसते. त्याचे निकष परम ईश्वराने घालून दिलेले आहेत आणि युगानुयुगे ते काळ, विधाता, निसर्ग, या सर्वांसहित असलेली ब्रम्हांड व्यवस्था त्यांचं चोख पालन करते. यात कुठेही कसलीही कसूर , चूक, प्रमाद होत नाही आणि होणार सुद्धा नाही.

कारण ही सर्व व्यवस्था चालवणारे, त्यांना दिलेल्या निकष आणि नियम यांनी बद्ध आहेत. त्यांचं ते काटेकोर पणे पालन करतात. नव्हे त्यासाठी ते बाध्य आहेत. त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही भ्रष्टता नाही आणि ती येणारसुद्धा नाही. याच कारण म्हणजे एकतर ती व्यवस्था भौतिक जगताच्या पार आहे. त्यामुळे मायेचे, मोहाचे पाश त्यांना लागू होत नाहीत. दुसरं म्हणजे त्यांच्या मतीमध्ये मानवी गुणधर्म नाहीत. 

माणसाच्या बुद्धीला बंधनाचा, कर्माचा, मर्यादांचा आणि मोहाचा शाप आहे. तसा तो त्यांना लागू होत नाही. कारण मुळात ते सर्व चैतन्य रुपात आहेत आणि त्यांना मानवी देहात असलेली बंधनं लागू होत नाहीत.याच कारणाने,हे सर्व घटक, नियमशील व नीतिमान राहून, फक्त त्यांना देण्यात आलेली जबाबदारी, युगानुयुगे पार पाडून,ईश्वरी व्यवस्था चोख हाताळतात. जे व्यवस्थापनाचं सर्वात मोठं तत्व आहे. 

म्हणून मानवी कर्म व त्यांचे योग्य ते परिणाम फल रुपात, त्या त्या व्यक्तीपर्यंत पोचवून, आपल कार्य पार पाडतात. आपल्यापाशी ते परिणाम भोग आणि उपभोग स्वरूपात येतात. ज्याचा आपण स्वेच्छेने वा अनिच्छेने स्वीकार करतो. जिथे तो स्वेच्छेने होतो, तिथे त्या कर्म फलातून नवीन कर्माच बीज उत्पन्न होत नाही आणि ते कर्म शांत होतं. पण जिथे ते अनिच्छेने स्वीकृत केलं जातं किंवा नाकारून भोगलं जातं, तिथे मात्र आपण पुन्हा नव्या कर्माना जन्म देऊन, साखळी पुढे नेऊन, फेऱ्यात अडकतो.

ही स्वेच्छा व अनिछ जाणिवांच्या प्रमाणात आणि गुणधर्मावर अवलंबित असते. जिथे जाणीवा प्रगल्भ असतात किंवा होत जातात तिथे स्वेच्छा प्रमाण वाढत जातं आणि अनिछा प्रमाण कमी होत. म्हणजेच पुन्हा सर्व काही जाणिवांच्या दाराशी येऊन थांबलं. जाणीवा आपल्याला प्राप्त स्थिती स्वीकारून, त्यातून भोगाच्यां वाटेने पुढे जाण्याची प्रेरणा देतात.ही जाणिवांच्या प्रेरणेचे उगमस्थान स्वकर्मफल, स्वपुण्याई व त्यामुळे प्राप्त सद्गुरू कृपा यावर अवलंबून असते. 

अशी स्थिती येण्यासाठी काय काय आवश्यक गुणधर्म प्रानिमात्राकडे असावेत यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. पण तोपर्यंत सद्गुरू सेवा करत नाम घेत राहूया

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...