Skip to main content

अध्यात्म विराम १३१

अध्यात्म विराम १३१
 
अनेकवेळा मन अनेक कारणांनी, बोथट, कठोर किंवा रुक्ष होतं किंवा होऊ शकतं. असा प्रत्यय आल्यानंतर, आपण त्या मनाला, थोडावेळ, निश्चिंत किंवा शांत बसायला लावावं. जेणेकरून, त्याला आपल्यातील रुक्षतेची प्रचिती येईल. या प्रचीतीचा अनुभव अनेक प्रकारांनी मनाला येऊ शकतो. आपण बरेचवेळा चित्रपटात पाहतो की, एखादी अती तापट, कोपिष्ट व्यक्ती, एकतर तितक्याच तापट, रागीट व्यक्तीच्या सान्निध्यात आली असता, विचारी होते आणि काही क्षणात त्या व्यक्तीच्या स्वभावात अमुलाग्र बदल होतो किंवा होऊ शकतो. 

या मागे मानसशास्त्र आणि विज्ञान दोन्ही आहे. दोन समान आणि अविनाशी व एकाच दिशेने आलेल्या शक्तींचा संघर्ष झाला की, त्या घर्षणातून नक्कीच काही उत्तम उत्पन्न होतं, हा निसर्गनियम आहे. उदाहरणार्थ एकाच दिशेने आलेले दोन ढग, जेंव्हा एकमेकांवर आदळतात, तेंव्हा त्यातून पाऊस आणि वीज निर्माण होते, हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. त्याप्रमाणे मन जेंव्हा अतिरागीट वा अतीचंचल असतं, तेंव्हा त्याला एकतर अतिविचाराने किंवा एकदम शांत करून, नियंत्रणात आणता येतं.

म्हणून आपल्या हातात जे आहे, ते म्हणजे ज्या क्षणी राग, क्रोध अती येईल किंवा सीमेवर असेल, त्या क्षणी त्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. त्यातून दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे धावत्या धबधब्याला अचानक रोकण्यात आलं तर, त्यातील पाणी आणि त्याचा वेग व शक्ती याना खीळ बसतो. पण ती शक्ती वाया जात नाही तर ती नियंत्रित करता येऊन, त्याचा सदुपयोग करता येतो. त्याप्रमाणे अश्या अवखळ, वांड, अतीशीघ्रकोपी मनाला, आपण त्या क्षणी शांत करून, त्याला आपल्या पद्धतीने कार्याला लावू शकतो.

मनाला शांत करून त्याला, कोणत्या कार्याला लावायच, हे सुद्धा मनात योजलेले असणे किंवा ज्ञात असणे महत्वाचं आहे. म्हणजे त्या शांत मनाला त्वरित उत्तम कार्यार्थ जुंपता येऊ शकतं. म्हणून ही योजना सुद्धा तयार असावी. त्या मनाला शांत करून आपण त्याला उत्तम अश्या ईश्वरी नामाच्या मार्गाला लावू शकतो. अती कोपी मन शांत केल्यानंतर, त्याला त्याचं शांत अवस्थेत, नाम, नाद, ध्वनी, धून, स्वर यांच्या नादात गुंतवू शकतो. 

थोडक्यात मन चंचल असो, रागीट असो व सामान्य असो, त्याला शांत बसण्याची सवय लावण्यासाठी आपण डोळे मिटून, ध्यान धरून किंवा मनात कल्पना योजून, एखादी मूर्ती वा एखादा नाद यांच्यामधे गुंतवून, त्याला त्याची आवड निर्माण करू शकतो. हे काम कोणतीही जोर जबरदस्ती करून साधणार नाही. यासाठी आपल्या मनाला एका विचाराने भारून टाकता आले पाहिजे. तो विचार आतून आला पाहिजे.

कारण मन हे बाहेरून आलेल्या विचारांना पटकन स्वीकारत नाही. म्हणून त्या विचारांची सुरुवात आतूनच व्हावी. तो विचार म्हणजे मी जे मनाला शांत करणार आहे, ते माझ्याच हिताचे आहे. हा विचार मनात खोलवर रुजला पाहिजे. म्हणजेच या विचाराची पक्की मशागत मनात झाली पाहिजे. पण हे कसं शक्य आहे, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत ईश्वराच्या नामात किंवा नादात मनाला डुंबवून काढण्याचा प्रयत्न करावा. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...