Skip to main content

अध्यात्म विराम १४२

अध्यात्म विराम १४२

सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

काल म्हटल्याप्रमाणे ज्या कार्यात ईश्वरी स्मरण असतं, ते कार्य अंती उत्तम फलदायी होतं. त्याचप्रमाणे जे कार्य करताना ईश्वराच्या स्मरणाचां विसर होतो, ते कार्य अंती, दुःख, भोग आणि कष्ट आपल्या वाट्याला येतात. आज यावर विचार करूया. कारण हे फक्त एक विधान नाही, तर ते एक सत्यवचन आहे. तेदेखील प्रत्यक्ष ईश्वराचं वचन आहे. आता विषयाकडे वळूया. जे कर्म ईश्वराच्या स्मरणात केलं जातं ते अंती उत्तम फल देत. हे सर्वश्रुत आहे. 

यावर लगेच एक विचार मनात येतोच की, कोणतंही कर्म जे ईश्वर चिंतनात वा स्मरणात केलं जातं, ते सर्व या सदरात येत. मग यात चांगलं वाईट असं सर्व कर्म येत का. तर हो, येतं. काही गोष्टी खुलासेवार चिंतनातून जाणून घेऊ. चांगलं कर्म केलं तर नक्कीच त्याचं फल चांगल मिळेल कर्मफल न्यायाने. पण ईश्वराच्या स्मरणात त्याचं फलित योग्य स्वरूपात आणि विशेष म्हणजे योग्य तऱ्हेने आणि योग्य वेळी आपल्याला प्राप्त होतं. हा या स्मरणाचा मुख्य लाभ आहे. 

मुळात एक लक्षात घ्या की, ईश्वर स्मरण हा व्यवहार नाही. त्यामुळे हे केलं म्हणून मला पुढे चांगलं मिळेल, हा व्यवहार साध्य करण्यासाठी स्मरण करायचं नाही, हे नक्कीच. पण ईश्वराची कृपा अशी आहे की, आपण केलेल्या स्मरणाची पोच ईश्वर आपल्या कृपेने करतो. म्हणून स्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. पण आता दुसरा विचार करुया. समजा ईश्वर स्मरणात चुकीचं कृत्य घडल तर काय. यावर हे निश्चित सांगता येईल की, असं चुकीचं कृत्य घडताना ईश्वर स्मरण केल्यानंतर, त्याचे होणारे परिणाम ईश्वर टाळणार नाही. पण अंततः त्याचा शेवट हा उत्तम फलदायी होईल, याची काळजी तोच ईश्वर घेतो.

आता यावर अजून पुढचा विचार करूया की, अधमी, पापी, हीन वृत्तीच्या लोकांनी जर ईश्वर स्मरण करत, हीन दर्जाचं, पापदायक कर्म केलच, तर त्याच्या परिणामांना ईश्वर थांबवू शकत नाही आणि थांबवणार सुद्धा नाही. कारण ईश्वर हा व्यवहार नाही. पण तोच ईश्वर त्या पाप कर्माच्या फलातून मुक्तता न करता, तुमच्या मुक्तीच्या मार्गाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 

म्हणजे त्या कृत्याच्या परिणामतः तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. केलेल्या कर्माची आणि प्राप्त फलाची सांगड घालण्याची जाणीव जागृत करून त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जरूर करेल. पण शेवटी फल त्या जीवाच्या बुद्धिनुसार त्याला मिळेल. तरीही त्याला त्या पाप फलाचा, चुकीच्या कर्म फलाचा भागीदार करूनही, त्याला मोक्षपदाला नेईल. ही झाली अंतिम मार्गाची महती. 

पण सर्वसामान्य जीवाला चुकीने झालेल्या कर्मात, ईश्वर स्मरण घडल्यास, त्या ईश्वरीय शक्तीला, फलाच्या भोग काळात, सुलभता आणि सहजता प्राप्त करून द्यावी लागेल. म्हणजे जे फल समोर येईल,ते भोगताना जीवाला आपल्या कर्माचा पश्चात्ताप होऊन, त्या पश्चात्ताप अग्नीत, कर्मफल भोग विरून जातील किंवा त्या फलाची तप्तता जाणवणार नाही, हे नक्कीच.

याचं विषयाला उद्याच्या भागात पुढे नेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०३/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...