Skip to main content

भोग आणि ईश्वर ५७६

भोग आणि ईश्वर  ५७६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कालचा विषय पुढे नेताना, मनामध्ये असलेला गैरसमज दूर करू. गीता ही फक्त युद्धासाठी अर्जुनाला तयार करण्यासाठी असती, तर ती अठरा अध्यायांइतकी दीर्घ सांगितली गेली नसती. त्यामुळे समस्त विश्वाला, विश्वा तील प्रत्येक जन सामान्यांना कल्पांतापर्यंत मार्गदर्शन करत राहील, हेच त्यामागील प्रयोजन असावं. याचं अजून एक कारण म्हणजे, जर असा काही उद्देश नसता, तर त्यानंतर साडेतीन चार हजार वर्षांनी श्रीसंतज्ञानेश्वर माऊली या रुपात अवतरून, प्रभूंनी स्वमुखे तीच गीता संस्कृत या फार कमी लोकांना ज्ञात असलेल्या भाषेतून, प्राकृतात आणली नसती. 

म्हणजेच या गीतेमध्ये नक्कीच, जनसामान्यांसाठी काहीतरी असणार. काय, ते बऱ्याच जणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यातील बरेच अर्थ, भावार्थ, मतितार्थ गुह्यार्थ हे अध्यात्मिक मार्गाचा धागा पकडून, पुढे शोधत आतपर्यंत गेले आहेत. फारच थोड्या विद्वानांनी यातील प्रापंचिक दृष्टीने सार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आज त्या दृष्टीने प्रयत्न करूया. 

गीतेतील सर्वश्रेष्ठ दोन सिद्धांत आहेत, कर्मयोग आणि भक्ती योग. तिसऱ्या, सांख्ययोगात हा मुळात ज्ञानी व योगी जनांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर काय काय सिद्ध व साध्य होतं, या योगा बद्दल विस्तार पूर्वक कथन केलं आहे. पुन्हा सद्य स्थितीत असे ज्ञानी जन हे दुर्मिळ आणि अल्प होत चाललेत. त्यामुळे त्याचा जनसामान्यांना फार उपयोग होणार नाही, हे बहुदा निश्चित. 

म्हणजे आपण कर्म आणि भक्ती याबद्दल चिंतन करूया आणि सामान्य जनांना काय व कशाप्रकारे, सांसारिक दृष्टीने, यातून उपलब्धता होते, ते पाहूया. मुळात कर्म हे नित्य व अनिवार्य आहे. याला कोणताही विकल्प उपलब्ध नाही. कारण काही न करता, बसून राहणं, हेदेखील एक कर्मच आहे आणि त्याचेही, अनेक प्रकारांनी विपरीत परिणाम व फलप्राप्तीत्या त्या व्यक्तीला होऊच  शकतात. म्हणजे क्षणक्षण काही ना काही कर्म करण्याला कोणताही पर्याय उपलब्ध नाही, हे निश्चित. 

आता सांसारिक कर्मांची परिणती सांसारिक फलप्राप्ती असणार हे अध्याहृत आहे. अशी ही फलप्राप्ती, सांसारिक कर्मांप्रमाणे संसारात अडकवणारी असणार, यात शंका नाही. म्हणजे अनिश्चित आणि अशाश्वत. आता या दोन्हींचा अर्थ सांसारिक कर्म ही सागरातील लाटांप्रमाणे प्रवाहात कायम खेळतं ठेवून प्रवाहहिन करणारी आणि तरंगणं आणि डुबणं यामधे आयुष्य भर ठेवणारी असतात. म्हणूनच सांसारिक कर्मातून होणारी लाभहानी ही अनिश्चित ,अशाश्वत आणि अनित्य आहेत. अनित्य यासाठी की, त्यातील कोणत्या कर्माचा लाभ कधी आणि कोणत्या कर्मातून प्राप्त हानी कधी, हे नित्य वा निश्चित नाही. 

याचं विषयावरील चिंतन आपण उद्याच्या भागात पुढे सुरू ठेवूया. तोपर्यंत साध्य ईश्वर आणि साधन नाम हे नित्य कर्म करत राहु. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...