Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६८

भोग आणि ईश्वर  ५६८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
   
कालचाच विषय पुढे नेऊया. 

पण या सर्वात भुलोकीचं  बिघडलेलं संतुलन , पूर्ववत व्हावं यासाठी, ईश्वराकडून केले जाणारे corrections आजही होत आहेत आणि पुढेही होतच राहतील. याचं कारण ही व्यवस्था, ही निर्मिती, या ब्रम्हांडाचं अस्तित्व ईश्वराच्या संकल्पनेतून आलेलं असल्यामुळे, तो कधीही कोणत्याही परिस्थितीत, या जगताचं नियंत्रण स्वतःच्या हातातून अनियंत्रित होऊ देणार नाही. ज्या ज्यावेळी अशी वेळ आली किंवा येते अथवा येईल, त्या त्यावेळी स्वतः येऊन दाखल घेऊन, आपलं अस्तित्व दाखवून, आपल्या हातात पुन्हा सूत्र घेण्यासाठी गरज पडेल ते सर्व ईश्वर करेलच. 

फक्त मधल्या काळात असुररुप दानवी वा मानवी शक्ती आपल्याला काही काळासाठी, शक्तिमान झालेल्या दिसतील. पण इथे एक लक्षात ठेवणं जरुरी आहे की, आपण या जगतात प्रत्येक जन्मात, काळाच्या त्या त्या परिघात काही वर्ष घालवतो. जी संपूर्ण जगताचं आयुष्य लक्षात घेतलं, तर अतीसूक्ष्म प्रमाणात आहे. त्यामुळे आपलं सर्व अनुमान, अभ्यास, निष्कर्ष, चिंतन यावर त्या त्या काळाचा प्रभाव अधिक असणार, हे नक्की. पण काही करोड वर्षांचा पूर्ण परीघ लक्षात घेता, आपलं मत, निष्कर्ष, विश्लेषण हे नक्कीच पूर्ण योग्य बरोबर आणि संपूर्ण सत्यदर्शक नसणार हे नक्की. 

म्हणूनच आपण काळाच्या ज्या कालखंडात वावरतो, तो प्रभाव धरून आपलं सर्व चिंतन आपण करतो, जे स्थूल पातळीवर आणि सूक्ष्म पातळीवरही बरोबर नाही. म्हणून आपण या प्रभावाबाहेर येऊन, विचार, अंदाज, अभ्यास, निरीक्षण, विश्लेषण करायला हवं.

हे कसं शक्य आहे. यासाठी ईश्वराच्या सूक्ष्म रूपाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ही सुक्ष्माची शक्ती हाच कलियुगातील इश्वरावतार आहे.  म्हणजे, याच बळाच्या आधारावर, कलिच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्याचं सामर्थ्य, ईश्वरच मानवाला देणार आहे. हीच कलियुगातील इश्वरेच्छा आह, हे ध्यानात घेतलं पाहिजे. कारण कलीची ताकद आणि संहारक शक्तीसुद्धा सूक्ष्मातील सूक्ष्मात आहे. 

आता हे सूक्ष्म म्हणजे काय, याचा विचार करूया. ढोबळ मानाने सूक्ष्म म्हणजे जे चर्मचक्षूना सुलभतेने दिसू शकत नाही, ते. ही झाली वैज्ञानिक व्याख्या. पण अध्यात्मिक विषयात सूक्ष्म म्हणजे जे देहात आहे, पण पंचमहाभूत देहाला दिसत नाही. पण जे या देहातील, मनचक्षू, ज्ञानेंद्रिय, जाणीवा आणि चेतना या माध्यमातून जाणवतं. म्हणजेच जे देहातील मन व आत्मा यांचा विषय आहे. कारण मन आणि आत्मा हे दोन्ही, या देहात असूनही, अतिसूक्ष्म असून, फक्त जाणीवा, ज्ञान, आत्मशक्ती यांच्याद्वारे ज्ञात होतं आणि कार्य करतं. 

या सूक्ष्म इंद्रियांच्या माध्यमातून, कलियुगात, कलीचं कार्य, सुरू राहतं. कलियुगातील सर्व शत्रू, याच सूक्ष्म मानसिक द्वारातून, आत्मा आणि चैतन्य यांचा ताबा घेऊन, देह व बुद्धी यांच्याकडून सर्व विपरीत, अप्रस्तुत आणि अश्लाघ्य कार्य करवून घेतं. त्यानंतर लांब राहून, त्याचे देहाला, बुद्धीला, मनाला आणि आत्म्याला, भोगावे लागणारे सर्व परिणाम त्रयस्थपणे पाहून, त्या जीवाला, जग जंजाळात सोडून जातात. 

म्हणून या सूक्ष्म असुरी शक्तींना पराभूत करण्यासाठी, तितकीच सूक्ष्म पण प्रभावी शक्ती, ऊर्जा व चेतना जरुरी आहे. त्याचा विचार व चिंतन आपण उद्याच्या भागात पाहूया. पण तोपर्यंत आपण सूक्ष्म अश्या नाम औषधींचा आस्वाद घेत राहूया.  

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...