Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६७

भोग आणि ईश्वर  ५६७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
काल आपण ईश्वराच्या स्थूल अर्थात macro अस्तित्वा बद्दल चिंतन केलं. आता आज micro म्हणजे सूक्ष्म अस्तित्वाबद्दल बोलण्याआधी हे लक्षात घ्या की, स्थूल आणि सूक्ष्म या शब्दाबद्दल आपण ज्ञानोबा माऊलीच्या एका अभंगात  ऐकलं आहे की, 

तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे ।
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥

तुज स्थूळ ह्मणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥

याचं अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात माऊली म्हणतात की, तुज स्थुळ म्हणू की सूक्ष्म रे. यातील स्थूल अस्तित्व आपण कालच्या भागात पाहिलं, त्यावर अजून विवेचन आज पाहूया. संपूर्ण जगताची, ब्रम्हांडाची, चराचराची काळजी घेण्यासाठी, जी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, त्याची निर्मिती स्वयं विधात्याने केली आहे. ती सुसुत्रतेने चालू आहे, हे बघण्यासाठी तशी chek system अर्थात नियंत्रण व्यवस्था, उत्तम रीतीने, युगानुयुगे कार्यरत आहे. 

या सगळ्यात, कुठेही चूक, फेरबदल, घातपात होत नाही. आज कलियुगात इतकी वर्ष झालीत, पण त्याच्या प्रभावाने, एखादा मृत्यू उशिरा झाला, कोणाला न्यायचं राहून गेलं, जन्माच्या वेळा चुकल्या, कर्मफल व्यवस्थेत काही चुका झाल्या, असल्या कोणत्याही गोष्टी अशक्य कोटीतील आहेत. इतकी ही व्यवस्था चोख आहे. ज्याला इंग्रजीत zero tolerance manage ment म्हणतात, त्याचा आद्य प्रवर्तक, स्वतः ईश्वर आहे.  पंचमहाभूतांचं गणित हे या सृष्टिशी जोडलेलं असल्यामुळे, त्यात काळा नुसार होणारे बदल, जसं global warming, ऋतु बदल, हवामान, वातावरण इत्यादी सर्व मानवाच्या कर्मांशी निगडित आहे. 

त्यामुळे त्यातील बदलाचे परिणाम मानवालाच भोगावे लागणार. पण त्यामुळे ईश्वराच्या व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात जीवित हानी ही, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी द्वारे होत असे. आता काळाच्या बदलामुळे, मानव निर्मित कारणं जसं प्रदूषण, रोगराई, पुर, प्रचंड पाऊस, दुष्काळ, अश्या अनेक कारणांनी हे मृत्यूचं प्रमाण राखलं जातच. मानवी बुद्धीने त्यात काही कारणात झालेले बदल, मानवाच्याच, इतर चुकांमुळे, घडतच आहेत. 

वाढता ताणतणाव, कामाचं बदललेलं स्वरूप, मानसिक शांती बिघडवणारी इतर अनेक मानव निर्मित कारणं, मानवी कर्माच्या फळाला, त्याच्या पदरात टाकतात. पण या सर्वात भुलोकीचं  बिघडलेलं संतुलन , पूर्ववत व्हावं यासाठी, ईश्वराकडून केले जाणारे corrections आजही होत आहेत आणि पुढेही होतच राहतील. 

 यावर, स्थूल जगतावर आणि ईश्वराच्या सूक्ष्म अस्तित्वा बद्दल आपण उद्याच्या भागात चिंतन करूया. पण त्यानेच निर्मिलेल्या नामाच्या प्रभावात राहूनच, हे चिंतन करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...