Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४९

भोग आणि ईश्वर  ५४९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
    
सर्वसामान्य जनांना आपल्या कर्माच्या आलेखातून, आपल्या ललाटी असलेली, जन्म मृत्यू रूपातील पुनरावृत्तीस्वरूप आयुष्य जगत जगत मागील पानावरून पुढे सुरू, असं प्रारब्ध भोगायचं की, यातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या वाटेवर वाटचाल करायची. 
पण मुळात ही जाणीवच नसेल की, मी बद्ध आहे आणि मला मुक्त व्हायचं आहे, तर ही जाणीव आधी उत्पन्न होणं महत्वाचं आहे. त्यासाठी जीवाला जाग आणणं हे सर्वात पहिलं काम आहे. 

यासाठी दयासागर. ईश्वराने अनेक गोष्टी अंमलात आणल्या आहेत. संत महंत, भगवत भक्त इत्यादी मार्गांनी ईश्वर आपल्या कनवाळू पणाची साक्ष देत असतो. हे संत महंत, ऋषीमुनी, साधू सन्यासी, नवविधा भक्तीच्या मार्गातून, भजन कीर्तन, प्रवचन, संबोधन इत्यादी अनेक मार्गांनी, सर्वसामान्य माणसाला हे समजावून सांगण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. त्यातून काहीजणांना समजतं, जाणवतं, ज्ञान प्राप्त होतं. त्यातील काही जण यावर जाण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी होणं न होणं, हे सर्वस्वी इश्वराधीन आहे.

कारण जो पर्यंत आपलं प्रत्येक कर्म हे त्या ईश्वराला. समर्पित होणार नाही, तोपर्यंत त्या कर्मातून निर्माण होणारं फल देखील ईश्वराला अर्पित होणार नाही. म्हणजेच ईश्वरी प्रेरणेने मी हे प्रयत्न करू शकलो, आता जे परिणाम होतील, ते सर्वस्वी ईश्वराच्या मर्जीवर अवलंबून आहे. ही वृत्ती अर्पण व शरण भक्तीची उत्तम साक्ष म्हणता येईल. 

यात सर्वात शेवटी जे म्हटलंय की ईश्वराच्या मर्जीवर किंवा इश्र्वराधीन आहे, यामधे विनम्रता, आपण निमित्त आणि ईश्वर कारण हे आपण अध्याहृत करतो. असं करण्याचं अजून एक कारण म्हणजे, सर्व सृष्टीचा, ब्रम्हांडाचा निर्माता, नियंता आणि नष्टकर्ता, स्वतः तोच आहे. इतकं असूनही, जो फक्त साक्षीरुपात आपलं अस्तित्व या जगतात दाखवतो. पण या सृष्टीतील प्रत्येक सजीव व निर्जीव याचं चलनवलन, पालनकर्ता या नात्याने स्वतः पाहतो, 

असा हा ईश्वर एक खेळ मांडून बसला आहे. तो कधीही आपला कसलाही हस्तक्षेप या जगताच्या कारभारात करत नाही. जीवाच्या जगण्यातील प्रत्येक श्वास, त्या जीवाला आपल्या मर्जीने जगता येईल, हेखील पाहतो. पण मानवाला आपला अस्तित्व  कळेल, जाणवेल याची क्षणोक्षणी तजवीज करून ठेवतो. याचं अस्तित्वाच्या खेळाला योग असं म्हटलं जातं. बरेचदा आपण काही गोष्टी योजलेल्या असताना त्याहून भिन्न गोष्टी घडून येतात. 

या गोष्टी आपल्या मनातील योजनांहून भिन्न,, कदाचित अनपेक्षित व बरेचदा गूढ असतात. त्या घडल्यावर आपण विचार करतो की, हे कसं काय घडून आलं. नेहमी चांगल्या योगाच्या गोष्टींमधे ईश्वरी हात किंवा संकेत असतात. ते जाणवावेत अशी त्याची इच्छा नसते. कारण तो स्वतः निरिच्छ आणि निरपेक्ष असतो. 

त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्या संकेतांबद्दल आणि त्याच्या कार्यकारण भावाबद्दल उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...