Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६९

भोग आणि ईश्वर  ५६९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
भगवंताच्या स्थूल स्वरुपाबद्दल विस्ताराने जाणल्यानंतर, आपण सूक्ष्म रुपात ईश्वरी अस्तित्वाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सूक्ष्मता ही अणूच्या सुद्धा कित्येक पट सूक्ष्म असू शकते.  लक्षात घ्या की, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कित्येक कीटक, कृमी, जंतू, जीव यांना आपण सूक्ष्म दर्शक यंत्राने पाहू शकतो. ते पाहताना त्यांच्या शरीर रचनेचा अभ्यास आधुनिक विज्ञान करतं. त्या विषयाची स्वतंत्र शाखा सुद्धा आहे. 

अश्या या अभ्यासात आधुनिक जगताला, त्या सूक्ष्मातील सूक्ष्म जीवांच्या शरीरांतर्गत रचना, वेगवेगळी इंद्रिय, अवयव याबद्दल जाणून घेताना, एक प्रश्न कायम डोकावतो की, जी गोष्ट आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघावी लागते, तेसुद्धा प्रत्यक्षाच्या कित्येक पट प्रतिमा मोठी करून, तर त्या सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाच्या शरीराची संरचना विधात्याने निर्माण कशी केली असेल. 

त्या सर्व प्राण्यांमध्ये इतर प्राण्यांसारखीच बाह्य व अंतर्गत शरीररचना, इतक्या छोट्याश्या जीवाचे तितकेच सूक्ष्म अवयव, पाय, पंख शरीरातील पेशी, पचनसंस्था, हृदय आदी रचना कशा अद्भुत असतात. म्हणजेच यातून त्या विधात्याच्या सुक्ष्मतेची कल्पना येऊ शकते. जे जाणायला आपल्याला आधुनिक जगताची कित्येक हजार वर्ष लागली. 

पण त्याही आधी ईश्वर नावाच्या एका वैज्ञानिकांने, या सृष्टीची, सृष्टीतील या अतिसूक्ष्म जीवा पासून ते अतीमहाकाय अजस्त्र, बलवान प्राण्यांपर्यंत सर्वांची रचना केली आहे. सर्वात विलक्षण गोष्ट ही आहे की, यंत्रांशिवाय न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म जीवांच्या देहाला चालवणारं चैतन्य त्या ईश्वराचं आहे. त्याचं ईश्वराचं अस्तित्व इतर अनेक प्राणी, मानव या सर्वात आहे. म्हणजे ती चैतन्य रूप शक्ती त्या जीवांना चालवायला किती सूक्ष्मतम
होऊ शकते. 

आश्चर्य कारक गोष्ट म्हणजे, प्रत्येक देहात, देहाबाहेर, ब्रम्हांडात, त्रिलोकात असलेलं हे अस्तित्व, त्या त्या देहात प्रकट झाल्यावर, त्या देहातील त्रिगुण व दोष, त्या चैतन्याला प्राप्त होतात आणि ते चैतन्य त्या देहात असेपर्यंत, त्या देहाला कार्यरत ठेवतं. कार्य संपल्यावर, तेच चैतन्य त्या देहाला, अश्याप्रकारे सोडून जातं की, त्या देहात ते कधीच नव्हतं. प्रत्येक जीवातील या अतिसूक्ष्म चैतन्याचा स्वामी असलेला ईश्वर, तरीही त्या देहापासून अलिप्त आणि वृत्तिरहित असतो. 

या कल्पनातीत विश्वाच्या रचनेला जाणल्यावर, त्याच्या अति सूक्ष्म प्रभावाचा अजून एक महत्वाचा पैलू आपण उद्या पाहूया. तोपर्यंत, या अमर्याद सामर्थ्य असलेल्या ईश्वराच्या नामाला आपण स्मरत राहूया.

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...