Skip to main content

भोग आणि ईश्वर ५७२

भोग आणि ईश्वर  ५७२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
माया म्हणजे भ्रम. हा भ्रम कशाचाही असू शकतो. अगदी मी कुणी नाही इथपासून मी कुणीतरी आहे. अर्थात निराशा ते गर्व असा असू शकतो. असलेल्या संपत्तीमुळे आलेल्या मस्तीचा किंवा नसलेल्या पैश्यामुळे आलेल्या दुःखाचा असेल, आयुष्यात भोगलेल्या भोगांचा असेल किंवा उपभोग घेत असताना वाटणाऱ्या सुखासीनतेचा. असे अनेक भ्रम माणूस आयुष्यात बाळगतो. 

या भ्रमात माणूस आयुष्य जगतो. अनेक कर्म याचं भ्रमात करतो. कारण आपला आयुष्याचं जगण्याचं आणि कर्माचं गणित हे या मायेच्या आधारावर वसलेलं असतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा दूषित किंवा भ्रमाने ग्रस्त आहे. आपण फक्त आणि फक्त सद्यस्थितीला, सद्य परिणामांना आणि सद्य घटनानाच बघतो. सद्य याचा अर्थ या जन्मा तील आयुष्य आणि त्या आयुष्यातील घटना, अनुभव, दृश्य, संवाद यांसह जे पाहतो ते. 

त्यावर आधारित आपली मत, आपल्या प्रतिक्रिया, आपली कर्म, आपल जगणं, आपल्या श्रद्धा, आपला विश्वास असतो. आपण जो विचार करतो, त्याला या जन्मातील दाखले व अनुभव हा एकमेव आधार असतो. कारण माया जी, या जगताच्या, या जगण्याच्या व या मात्र साठ सत्तर वा ऐंशी वर्षाच्या पलीकडे बुद्धी व मन यांना जाऊ देतं नाही. 

त्यामुळे माणसाच्या कल्पना सुद्धा मन बुद्धी अनुभव यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. असं म्हणतात की माणूस हा मन व बुद्धी यापलीकडे झेप घेऊ शकत नाही. अर्थात या दोन्हींच्या मर्यादे पलीकडे त्याला जाता येत नाही. याचं कारणच ही माया आहे. जिने या त्रिमितीच्या जगतात मानवी बुद्धी व मन यांना जखडून ठेवलं आहे. 

म्हणूनच ह्या मायेच्या पलीकडे जे जे गेले त्यांना विश्वातील अनेक गोष्टी पाहता अनुभवता आल्या आणि ज्याला चमत्कार म्हणता येईल, अश्या अनेक गोष्टी अश्या माणसांनी पाहिल्या, ज्या वास्तविक अर्थाने चमत्कार नाहीत. तर त्यामागे निश्चित तात्विक कारणं आहेत. मात्र आपली बुद्धी व मन यांना ही मायारुप बेडी पडलेली असते. हीच बेडी या त्रिमिती जगतात माणसाच्या बुद्धीला या मर्त्य जगता पलीकडे विचार करू देत नाही. 

पण यातून बाहेर पडण्याचा निश्चित असा मार्ग आहे. त्यासाठी मनाला आणि बुद्धीला या मायेच्या बेडीतून मुक्त कारण महत्वाचं आहे. त्यासाठी मनाला एकाग्र, एकचित्त आणि स्थिर कारण आवश्यक आहे. तसं केल्यानंतरच, मनाच्या अगम्य शक्ती आणि ऊर्जेचा योग्य विनियोग आणि मार्गीकरण होऊ शकेल. मनाकडे आसलेल्या या अफाट शक्तीने हनुमंता सारखा जीव अलौकिक कार्य करू शकला. 

हे एक उदाहरण आहे, ज्यातून हे सिद्ध होतं की, मनाच्या या शक्तीला पद्धतशीपणे, योग्य मार्गावर नेऊन, त्या मनाच्या ऊर्जा व शक्ती यांना, सुनियोजितपणें योग्य कार्याला लावल्यास, मानव अनेक चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी करू शकतो. हाच विषय उद्या पुढे नेऊ. पण तोपर्यंत, आपण नामाने, मनाला योग्य मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...