Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५४

भोग आणि ईश्वर  ५५४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

भगवंत हा कृपावंत म्हणून आपण म्हणतो, त्यावेळी त्याचा वास्तविक स्वरूप कार्य जाणण्याचा प्रयत्न करूया. मुळात ईश्वर हा खूप मोठा शास्त्रज्ञ आहे. कारण या ब्रम्हांडातील निर्मिलेली आणि आतापर्यंत मानवाला ज्ञात झालेली सर्व भौतिक, रासायनिक, जीवशास्त्रीय, गणिती, खगोलीय, भौगोलिक, भूमितीय, अध्यात्मिक, आदी सर्व गोष्टी या, एका विशिष्ट शास्त्रीय सत्त्यावर आधारित आहेत. 

मानवाने संशोधित केलेलं किंवा जाणलेलं सर्व ज्ञान, हे कारण आणि तत्वावर आधारलेलं आहे. विनातत्व वा विनाकारण काहीच अस्तित्वात नाही. असा हा शास्त्रज्ञ भगवंत किती, प्रयोगशील आहे, हे जाणल्यावर, त्याच्या बद्दलच्या आपल्या प्रेमात नक्कीच वाढ होईल. विचार करा. प्रत्येक प्राण्यात, स्वतःपासून अनेक नवीन जीव निर्माण करण्याचं तंत्र प्रजोत्पादन रुपात देऊन ठेवलं. पण प्रत्येकाला त्याचा वेगवेगळं तंत्र दिलं. 

म्हणजे वनस्पींपासून नवीन जीव निर्माण होताना, पराग कण, पुकेसर, स्त्रीकेसर या तंत्राची व्यवस्था, त्यासाठी पक्षी, भुंगे, माश्या कीटक इत्यादी माध्यमातून परागी भवन या प्रक्रियेने, ही पुनर्निर्मिती होत राहावी, यासाठी त्या प्राण्यांना आकर्षित करायला, मधासम द्रव्य निर्माण करून, हे एक आकर्षणाचं किंवा आसक्तीचं कारण वा माध्यम उत्पन्न करून दिलंय. पण हे सर्व वनस्पतींच्या बाबतीत नाही. काहींना बीज प्रक्रियेने हेच पुनरुत्पादन होईल, अशी व्यवस्था निर्माण केली. या सर्वांचे हजारो प्रकार निर्माण करून, आपली विविधता आणि कलाकार म्हणून अदाकारी दाखवून दिली. 

प्राण्यांची बाबतीत हीच निर्मिती व्यवस्था नर आणि मादी या माध्यमातून होईल, अशी एक वेगळीच व्यवस्था केली. त्यातील आकर्षण टिकाव किंवा टिकेल याचीसुद्धा व्यवस्था, ईश्वराने निर्माण केली. प्राण्यातील जवळजवळ सर्व प्रजातींमधे सुद्धा वैविध्य प्रकार निर्माण केलं. बहुतांश प्राण्यांमध्ये प्रजोत्पादन प्रक्रियेसाठी आकर्षण काळ आखून दिला. त्या ऋतूत किंवा काळातच, ते प्राणी ते कार्य करतात. बाकीच्या ऋतूत किंवा काळी, फक्त भय, निद्रा व भूक या तीनच धर्माचं पालन करतात. 

पण मानवाला निर्माण करताना, या सर्व मर्यादा काढून टाकाव्या लागल्या. कारण मानवामध्ये काही नवीन तत्व किंवा additional features implant करायची होती. कदाचित mechanic लोकांना किंवा तंत्रज्ञ व्यक्तींना माहीत असेल की, ज्यावेळी एखाद्या यंत्रात काही नवीन features add करायची असतील, त्यावेळी त्यातील काही मर्यादा काढून टाकाव्या लागतात. तरच नवीन features पूर्ण क्षमतेने आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय कार्य करतात. 

याचंच पुढील चिंतन उद्या करूया, म्हणजे कृपावंत भगवंत ओळखता येईल आणि त्याचा नाम अधिक श्रद्धेने घेता येईल. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...