Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४२

भोग आणि ईश्वर  ५४२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
काल आपण, स्वयं ईश्वरी चैतन्याने प्रेरित किंवा भारलेले सद्गुरू यांविषयी पाहिलं. पण तरीही, जी विशेषणं व गुण वैशिष्ट्य आपण पाहिली, ती सर्वसाधारणपणें सर्वच सद्गुरूंना लागू होतात. किंबहुना, त्या गुणविशेषानी युक्त चैतन्य स्वरूप व्यक्तित्व,  हे सद्गुरू पद प्राप्त करण्यास योग्य आहे.  पण यामधे सर्वात प्रमुख गुण म्हणजे साधक, भक्त यांविषयी अपार करुणा व प्रेम.ज्यामुळे, साधकांच्या भक्तांच्या दुःखाने व्यथित होऊन, त्यांचा पुत्रवत सांभाळ कारण, हा विशेष स्वभाव, हे सद्गुरुंचा स्नेहाचं विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सद्गुरूंना माऊली म्हणूनही संबोधलं जातं, ते याचमुळे. अपार करुणा हा त्यांचा आत्मविशेष असतो म्हणजे तो त्यांच्या आत्म्याचा गुणधर्म असतो. 

हा स्नेह, भक्तांविषयी ही चिंता हा प्रत्येक सद्गुरुंना, आपले साधक , शिष्य व भक्त यांच्याशी बांधून ठेवते.  खरतर सद्गुरू होणं, ही ईश्वरी कृपेशिवाय, अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजेच पर्यायाने असं नक्कीच म्हणता येईल की, प्रत्येक सद्गुरूंच्या मागे, ईश्वरी पेरणा, शक्ती व ऊर्जा ही नक्कीच असते. म्हणूनच कोणत्याही सद्गुरूंच्या प्रेरणेने आपण साधना करत असलो तरीही, त्यामागे ईश्वर उभा असतो, निश्चित. 

सद्गुरुंचा दुसरा प्रकार म्हणजे जे साधनेने, भक्तीने आणि आपल्या वृत्ती, प्रवृत्ती व निग्रह यांच्या सहाय्याने मनातील विकार, शत्रू यांच्यावर जय प्राप्त करून, आपल्या गुरु कृपेने अश्या ठिकाणी पोचतात,जिथे प्रत्यक्ष सद्गुरू तत्व त्यांना, ते उच्चपद प्रदान करून, तो अधिकार देतात, जो सर्वमान्य सद्गुरूंना प्राप्त होतो. 

अशी साधनेची, भक्तीची, त्याग, वैराग्य व निग्रह यांची पराकाष्ठा केलेले अनेक पवित्र व सात्विक आत्मे, चैतन्य स्वरूप प्राप्त करून, चिदानंदात रत असतात.  पण कोणतेही सद्गुरू हे सिद्धआत्मे असतात. त्यांना फक्त आणि फक्त आपल्या साधकांचा मोक्षमार्ग सुलभ करणं, याचीच ओढ, चिंता व प्रेरणा असते. त्यासाठी आवश्यक ते सर्व कारण ही त्यांची मनीषा असते. त्यांचा अंतरात्मा शुद्ध असल्यामुळे, त्यांना जनहित, परहित साधणं आणि परदुःख शांतीसाठी कार्यरत असणं इतकंच माहीत असतं. 

स्वयं ज्या ठिकाणी विराजित आहोत, ते सुखस्थान नसून, एक ईश्वरी प्रेरणा व जबाबदारी आहे, याची जाणीव व ज्ञान असल्यामुळे, साधक व भक्तांनी, मधेच हात, साथ वा साधना बंद केली, सोडली तरीही, त्यांना हरप्रकारे, पुन्हा सन्मार्गावर वा योग्य मार्गावर आणणं, हे प्रत्येक सद्गुरूंच्या मनात कायम असतं.म्हणून प्रत्येक सद्गुरूंच्या अंतर्यामि साधक हित, हे सर्वतोपरी उच्छा ध्येय व ब्रीद असते. 

सद्गुरूविषयी जाणून घेतल्यानंतर, त्यांच्या कृपा प्राप्ती विषयी, उद्याच्या भागात जाणून घेऊ. पण आपलं नामाचं सत्कार्य सुरूच ठेवूया.  

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...