Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५३

भोग आणि ईश्वर  ४५३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

पंचमहाभूतरुप देहातील पाच तत्वाचं एकत्रित अस्तित्व आणि त्यांच्या संयुक्त समिकरणातून अखंड उभं राहिलेला स्वभाव, व्यक्तित्व, देहरचना, बुद्धीची झेप, मन आणि मनाची खोली, याचा एकत्रितपणा माणूस कोण आहे, कसा आहे व काय आहे, हे ठरवतो.पण यावरसुद्धा सर्वात प्रथम प्रारब्ध अर्थात पूर्वसंचित याचा मूलतः प्रभाव असतो आणि आपल्याला या एकत्रित समिकरणातून, जे व्यक्तित्व प्राप्त झालं, त्याला घडवणं वा बिघडवणं हे आपण, पुन्हा आपल्या कर्मभाराने ठरवतो किंवा लिहितो. 

या पाच घटकातील जो घटक सर्वात प्रभावी व बलशाली आहे, तो घटक, त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक हे सर्व ठरवतो. आता कोणता घटक जास्त प्रभावी, तेसुद्धा आपण पूर्वकर्माने ठरवत असल्यामुळे, हे पक्कं ध्यानात ठेवावं की,आज जसे आपण जगतो,वागतो वा कोणत्या गोष्टी आपल्या मनाला व बुद्धीला प्रेरित करून कर्म करवून घेतात, त्यानुसार, या जन्मातून जाताना आपण, पुढील जन्माचा आपला मनाचा आलेख लिहून ठेवतो. 

आधीच्या जन्माबद्दल, काही क्षण आपण विसरून जाऊ. पण या जन्मात जसं वागतोय किंवा जसं पुढे वागू, त्या नुसार आपला स्वभाव, वागणूक यांचा आलेख तयार होतो. हा अलेखच पुढे, मृत्यूनंतर, आपल्यासोबत, पुढील जन्मात येतो. स्वभावाला औषध नाही असं म्हणताना आपण हे विसरतो की, पंचमहाभूतातील आकाशातत्वाने युक्त मन, हे असं इंद्रिय आहे, ज्याला प्रभावित करताच, ते स्वतःसह बुद्धी व देह यांना कार्याला जुंपू शकते. 

याचं कारण की आकाश हे अग्नी, वायू , पृथ्वी व जल या चारही तत्त्वांनी सहजी युक्त होऊन, त्यानुसार आपला प्रभाव बदलू शकतं. मनाच्या या निर्गुण निराकारी रुपा मुळेच योगेश्वर श्रीकृष्ण आपलं अस्तित्व इंद्रियांमध्ये मनात आहे, हे श्रीमद्भगवद्गीतेत ठामपणे मांडतात. यामुळे स्वभावाला औषध नाही, हा पूर्णतः नकारात्मक विचार सोडून, त्याला प्रभावित करणाऱ्या, चुकीच्या घटकाला ओळखून, त्यावर काही कार्य केल्यास, स्वभावातील दोष काढून टाकता येतील. 

आपल्यावर , या पाच तत्वातील कोणत्या तत्वाचा प्रभाव जास्त आहे आणि त्यावर मात करून, योग्य ते कसं करवून घ्यायचं यावर आणि व्यक्ती व व्यक्तित्व यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.अर्थातच श्वासातून नामाचं व्यक्त होणं, सुरुच ठेवू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...