Skip to main content

भोग आणि ईश्वर ४३८

भोग आणि ईश्वर  ४३८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

मनाला श्वासांच्या तालावर डोलायला लावत, श्वासांना शांत करत करत, एका अश्या ठिकाणी मन व श्वास, एक होतात की, त्यातील आनंद हा अवर्णनीय आहे. एखाद्या शास्त्रीय रागदारी तील संगीताच्या नादावर, गुंग होताना, याचा अनुभव आपल्या पैकी अनेकांनी घेतला असेल. इथे संगीताच्या ऐवजी, आपण आपल्याच, श्वासांचा आवाज व लय यांचा आधार घेत आहोत. 

कारण मन अंतर्मुख करण्याच्या प्रयत्नात आपण आतील नादाचा सदुपयोग करून घेतल्यास, मन सहज आतमध्ये डोकावतं किंवा आत नेलं जातं. असच शांतपणे बसलेलं असताना, आपण स्वतःच्या मनातील,मेंदूतील व त्यायोगे देहातील त्याज्य व नकारात्मक गोष्टी काढून टाकत आहोत, अशी कल्पना करावी. 

मनाच्या गुणधर्मानुसार, कल्पनेतील अनेक गोष्टी, मन इछा उत्पन्न करून साध्य करू शकतं. अश्याच प्रकारे, शक्य होईल तेंव्हा किंवा निदान आठवड्यात एकदातरी, हा प्रयोग करून बघितल्यास, मनातील अनेक चुकीचे, नकारात्मक व त्याज्य विचार, आठवणी नष्ट झालेल्या आढळतील. गघरातील कचरा, धूळ इत्यादी काढून, घर स्वच्छ केल्यानंतर जो आनंद मिळतो, त्याच आनंदाचा प्रत्यय, आपल्याला अश्या प्रयोगातून मिळेल. 

नकारात्मक, अनिष्ट व अप्रस्तुत गोष्टी मनातून काढून टाकायचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे, असे विचार वा त्यांच्या लहरी मनात असतील, तर बाहेरून येणाऱ्या, सकारात्मक, शुद्ध व सात्विक विचार लहरींना आत येण्या पासून मज्जाव होईल किंवा अडथळा निर्माण होईल. ज्याप्रमाणे घरातील खिडक्या व दारं यांच्या समोर किंवा यांच्या मार्गात अडसर किंवा चुकीच्या अंतर्गत सजावटीने निर्माण झालेल्या अडचणी असतील,तर स्वच्छ सूर्य प्रकाश व ताजी हवा आत येण्यात अडचणी निर्माण होतील. 

त्यामुळे घरातील दूषित हवा बाहेर पडून, स्वच्छ हवा व प्रकाश आत येऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे मनात जर अनिष्ट, त्याज्य व नकारात्मक विचार असतील,तर त्यांच्या लहरींच्या प्रभावाने, सात्विक, शुद्ध व सकारात्मक लहरी निर्माण होण्यात आणि बाहेरून आत येण्यास मज्जाव केला जातो.ज्याप्रमाणे कुकर्म करणाऱ्या व्यक्ती, आपल्या विभागात, चांगल्या, सत्शील सात्विक व्यक्तींना राहू देत नाहीत, त्याप्रमाणे. 

म्हणूनही असे त्याज्य विचार नेहमी ठराविक काळाने मनातून, योग्य प्रकारे काढून टाकलेच पाहिजेत. म्हणजेच देहाप्रमाणे मनाची स्वच्छता हीदेखील नित्याची गरज आहे.या सर्वात महत्वाचा तर्काचा मुद्दा म्हणजे विचारांच्या लहरींचं हे युद्ध विचारांनी लढून, योग्य त्या शत्रूंवर नित्य विजय मिळवणं गरजेचं आहे. 

यासाठी अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयोग, योग सांगितले आहेत. पण यासर्वांमागचं तत्व एकच की, जे त्याज्य आहे, ते नाकारून बाहेर पाठवणे. कारण जसा नको असलेल्या लोकांचा घर, कार्यालय किंवा अन्य ठिकाणी त्रास होतो, त्याप्रमाणे नको असलेले विचार त्रास देऊन, मनाची ऊर्जा व बल अकारण खर्च करतात. 

उद्या आपल्या नियंत्रणातील तिसरी गोष्ट म्हणजे कर्म, या माध्यमातून आपण मनाची ऊर्जा व शक्ती कशी सशक्त ठेवू शकतो, यावर चिंतन करूया. तोपर्यंत आपण आपलं नित्य नेमाचं नाम घेत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...