Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४६

भोग आणि ईश्वर  ४४६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

उपवास हा पारंपारिक अर्थाने मात्र, देहासाठी आणि देहासंबंधी वापरला जाणारा शब्द. त्याचा आपण जाणलेला अर्थ म्हणजे, देहाला रोजच्या जीवनातून मुक्त करून, काही काळ वा वेळ भोजनात बदल वा रुचित बदल करून, देहाला आसक्तीतून बाहेर पडण्याची सवय लावून, काही काळ मनाला निश्चयी व दृढ बनवत जाणं. 

म्हणजे भुकेच्या मर्यादा पाळण्याची सवय लावून, देहाला व मनाला वासना, क्रोध, मोह,लोभ या सर्वांवर नियंत्रण मिळवून, मनाला योगयुक्त राहण्याची सवय लावणं. उपवास हा मुळातच एक योगप्रकार आहे. ज्याचा अंतिम उद्देश, देहाचे चोचले ठराविक वेळा वा ठराविक दिवशी, नियंत्रणात ठेवणं. यातून आधी देहाला लागलेली सवय, बुद्धीला नियमित लागून, त्यातून ती सवय मनापर्यंत उतरवून, शेवटी आत्मतत्वाला शुद्ध करणं. 

कारण देहशुद्धी, बुद्धीचं तेज वाढवून, त्याद्वारे, मनाला शुद्ध करते. चित्तशुद्धी हाच योगाचा एक उद्देश आहे. कारण चित्त शुद्धीद्वारे, आत्मशुद्धी साध्य करता येते. विश्वनियंत्यापर्यंत जाण्यासाठी आत्मशुद्धी अत्यंत गरजेची आहे. म्हणजे वासना, माया, मोह, लोभ, क्रोध यांसारखे शत्रू नमवून आपला साधनेचा मार्ग प्रशस्त करणं. 

म्हणजेच उपवासाने  काही आत्मिक उद्देश साध्य करता येतो. म्हणजेच उपवास हा उपासनेचा एक मार्ग आहे. पण मग तो वर्षानुवर्षे फक्त देहाच्या संदर्भात मर्यादित अर्थाने का वापरला गेला किंवा मर्यादित राहिला, हे कळत नाही. पण आपण उपवास याचा व्यापक अर्थाने असलेला उपयोग, शोधण्याचा प्रयत्न करूया. 

मनातील अनेक प्रकारच्या शत्रूंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देह व बुद्धी या माध्यमांना वापरून, त्यातून योगयाग, या सारखी अनंत साधने, विधात्याने, मानवासाठी मांडून सिद्ध केली आहेत. या सर्वांना थोडावेळ बाजूला ठेवून, एक वेगळा विचार करूया. जर देहाच्या बाबत, उपवास म्हणजे नियंत्रणासाठी वापरण्यात येणारा योग अस म्हटल्यास ते योग्य ठरेल. म्हणून तोच प्रयोग देहाप्रमाणे मनाबाबत करून बघूया. 

म्हणजे मनातील काम क्रोध, मोह, मद, मत्सर द्वेष या मनातील भावांना एक ठराविक वेळ निश्चित करून, त्या वेळात, उत्पन्न होणाऱ्या राग लोभ आदी भावांना, त्याकाळात पूर्ण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करूया. कदाचित असा प्रयत्न करताना सुरवातीला, कमी व मर्यादित वेळ ठरवून, नन्तर ती वेळ वा तो मनाच्या उपवासाचा काळ, हळूहळू जसजसा आत्मविश्वास वाढेल, त्याप्रमाणे, वाढवत न्यावा. 

हा मनाला, त्याची आसक्ती वाढवणारी प्रलोभने विसरून जाण्याचा किंवा नियंत्रित ठेवण्याचा अभ्यास, एक उपवास म्हणून स्वीकारून, मनाला उपवास योगयुक्त बनवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे उपवास या शब्दाचा वास्तविक अर्थ जाणून, त्यानुसार आपल्याला मनावर नियंत्रण मिळवण्याच्या मार्गात अग्रेसर होता येईल. 

यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण उद्या करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...