Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४८

भोग आणि ईश्वर  ४४८  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

योगाचा जसा दृढतेने अभ्यास करून, नित्य प्रयास करावा लागतो. त्यानंतर कालांतराने, आपण त्यामध्ये, एक एक पायरी पुढे जाऊन, ठराविक काळानंतर ते आत्मसात करतो.  आत्मसात करणे म्हणजे देह, बुद्धी व मन, यांच्या पलीकडे जाऊन, एखादी कृती वा कर्म सातत्याने करणे, जेणेकरून एका ठराविक काळानंतर, त्या कर्माला वा कृतीला करण्याची सवय देह बुद्धी व मन या त्रयीला जडते आणि त्या कर्मावर वा कार्यावर कर्त्याची घट्ट पकड बसते. 

म्हणजेच प्रत्येक कृतीनंतर, पुढे काय होणार आणि काय घडल्या वर  काय काळजी घ्यावी, काय कृती करावी, काय धोके आहेत आणि काय पायऱ्या पुढे आहेत, हे ज्ञात होतं. म्हणजेच त्या कर्मातील, त्याच्या प्रत्येक कृतीतील पायऱ्यांची पूर्ण माहिती आणि त्यावर पूर्ण नियंत्रण, मिळवण्यात, कर्ता यशस्वीच होत नाही, तर त्याला त्यातील तज्ञ पदापर्यंत जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. 

योग वा अन्य कोणतीही कृती वा कर्म, नित्य करत गेल्यास, ठराविक काळाने, त्यात कर्त्याला प्राविण्य मिळते. एकप्रकारे अधिकार प्राप्ती होते. पण आत्मसात करणे याचा गुह्यर्थ हा आहे की, एखादी कृती वा कर्म, आत्म्याच्या अंतरापर्यंत, जाऊन भिडेल आणि तेथेसुद्धा, त्याचा ठसा उमटेल. जेणेकरून, त्या कर्मावर आपला सर्वश्रेष्ठतेचा अधिकार होईल. 

एखादी गोष्ट आत्मसात करण्यात यश मिळाल्यास आणि त्यात कालांतराने प्राविण्य मिळाल्यास, ती कला, कर्म, वा ते करण्याचा अधिकार, पुढील जन्मातसुद्धा प्राप्त होतो. म्हणूनच आपण पाहिलं असेल की, एखाद्याला जन्मा पासूनच किंवा खूप लहानपणापासून प्राप्त एखादी कला किंवा एखाद्या विषया तील,लहान वयातील, मिळालेलं विशेष प्राविण्य किंवा तो विषय वा ती कला चटकन आत्मसात करण्याची उपजत हातोटी वा प्रज्ञा, हा नक्कीच आधीच्या जन्मातील तपश्चर्येचा भाग असतो. 

आता या सर्व चिंतनातून एक धागा नक्कीच हाती लागतो की, कोणत्याही गोष्टीत, सातत्याने, एकाग्रतेने व आत्म विश्वासाने प्रयास केल्यास, त्या विषयात आपण फार पुढे जाऊच शकतो. हाच योग आहे. योगाचा व्यापक दृष्टीने अर्थ म्हणजे सातत्य, एकाग्रता, प्रयास आणि आत्म विश्वास. म्हणून आपण आपल्या मनातील अकारण व अवाजवी येणाऱ्या वा उमटणाऱ्या अप्रस्तुत भाव भावनाना, योग्य प्रमाणात, मर्यादेत ठेवण्याचा सातत्यपूर्ण प्रयास, करत गेल्यास, सर्व भावभावनांना मर्यादेत प्रकट होण्या साठीचं नियमन व नियंत्रण आपण मिळवू शकतो. 

त्यासाठी सर्वात प्रथम आपण आपल्या भावना, कामना, इच्छा, आकांक्षा यांना तीन भागात विभागूया. गैर व अवास्तव, अनियमित व अनियंत्रित आणि योग्य व प्रस्तुत. तिन्ही प्रकारच्या नावांवरून अंदाज येईलच. पण यावर सविस्तर चर्चा उद्याच्या भागात करूया. अर्थातच नामाचं कर्म दृढतेने करूनच. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...