Skip to main content

काव्यांजली

काव्यांजली 

तव स्वरांनी आमुच्या 
सुख मिळाले मनाला
कर्ण मन हृदयही माझे
सुखावते त्या समयाला 

लिहितीलही गीत सारे
आपुल्या यश कीर्तीचे 
तरीही मन माझे म्हणते
अंगाई आईसम भासते 

प्रेमगीत वा युगुलगीत
गायले प्रियेने वाटे 
विरह दुःख हे भावही
त्या त्या गीतातून प्रकटे 

इतुकेच आता शेवटी
उरला लतास्वर तो 
त्या गंधर्वकन्येचा
आचंद्रसूर्य निनादो 

© कवी : प्रसन्न आठवले
०६/०२/२०२२
१९:२३

Comments