Skip to main content

भोग आणि ईश्वर ७८

भोग आणि ईश्वर  ७८
  
गेल्या भागापर्यंत आपण हे पाहिलं की मन स्वस्थ बसू शकत नाही.  त्याला काही ना काही खाद्य हे लागतं. हे जर असं आहे तर मग मनाला नित्य सकारात्मक, उच्च विचारांचं आणि सत्शीलपणे राहण्याचं विचाररूप खाद्य आणि चिंतनरुप नैवेद्य का देऊ नये. नैवेद्य शब्दाने जरा आश्चर्य वाटलं असेल.

पण खर आहे. मन ही अशी गोष्ट आहे की तीच नराचा नारायण आणि नराचा रावण करू शकते. म्हणजेच नीट मार्ग
 धरून जेंव्हा तेच मन देह आणि आत्मा यांचा संयोग घडवून आणतं, त्यावेळी त्या देहातील आत्मा हा श्रीकृष्णाचा सखा अर्जुन, श्रीरामाचा सखा हनुमंत, विभीषण, सुग्रीव होतो 

आणि ज्यावेळी तेच मन विकारी आणि वासनेत मग्न होऊन अंतरात्म्याला विसरतं आणि देहाच्या साथीने काम क्रोध अहं आणि वृथा दुराभिमान यांच्या अग्नीत रममाण होतं, त्यावेळी तेच मन रावण, कंस, जरासंध कर्ण आणि दुर्योधन होतं.

आपण या दोन्ही आत्यंतिक पातळीवर जाऊ शकणार वा जाणार नसलो तरीही आपण जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनात स्वतःलाच जखडून पुन्हा पुढील जन्मी याच विचारात जन्म घालवू की, हा भोग माझ्या नशिबी का. म्हणूनच या सर्वातून वेळीच बाहेर पडून, देहभोग भोगून, वर्तमान व भविष्यातील कर्मव्यवस्था सुधारून या व पुढील जन्मांच्या प्रारब्ध व संचितात सुधारणा निश्चित करू शकतो. म्हणून त्या सर्वांची पहिली पायरी, मनाला एक कायमस्वरूपी, सकारात्मक, नित्य छंद, जडवून देण्याचं, कर्म करत राहू शकतो. 

जर असा छंद जडवून मनाला वाममार्गावरून सन्मार्गाला लावायचंच आहे, तर मग त्या छंदातून मन आणि आत्मा दोन्हींची उन्नती साधणारा मार्ग का शोधू नये, जो शाश्वत, परीक्षित, अत्यंत कमी श्रमात अनंत फलदायी असेल. आता असा कायमस्वरूपी, सकारात्मक आणि पुन्हा पुण्य वृद्धिंगत करणारा छंद कोणता, जो फार कोणताही त्रास सहन न करता वा देहाला फार कष्ट न देता, उचित परिणाम साधत असेल आणि मनाला भटकू देणार नसेल तर असा छंद म्हणजे नामस्मरण. 

कलियुगातील सद्य कालखंडात देवाचं स्मरण हा एकमेव पुण्य साधण्याचा मार्ग परिणामकारक आणि फलदायी असा सांगण्यात आला आहे. याच मार्गाने जाऊन सामान्य आणि असामान्य अश्या, अनेक मानवदेहधारी आत्म्यांनी आपलं जीवनईप्सित साध्य करून मोक्षाप्रति केली आहे. कदाचित त्यांचा आपल्याला ज्ञात असलेला हा जन्म अनेक जन्मांच्या पुण्याईचं फल असू शकेल. 

पण आपणही त्या मार्गावर चालायला सुरुवात करूया, जेणेकरून कुठेतरी या जन्मात संचित संपून पुण्यसंचय सुरू होईल. कारण भगवंताचं नाम हे इतकं पुण्यकारक आहे की, अनेक जन्मांच्या पापांचे मेरूपर्वत भस्म करण्याचं सामर्थ्य नामात आहे. नाम हे भगवंताला भक्ताशी नित्य बद्ध करून ठेवतं आणि जेंव्हा भगवंत भक्तासमीप असतो त्यावेळी तिथे फिरकण्याची मायेची हिंमत होत नाही. 

म्हणजेच नाम भक्ताला मायेपासून मुक्ती देऊन मायेच्या पाशातून सोडवून भगवंताच्या हृदयापर्यंत पोचवते. 

नाममहती ही अलौकिक आहे. त्यावर अजून सखोल विचार करूया पुढच्या भागात. 

आता नित्य नामचिंतन करा, भगवद्विचार येतील म्हणून नामचं घेऊन पुढे जा, अनेक प्रश्नांना मार्ग सापडतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...