Skip to main content

भोग आणि ईश्वर ८३

भोग आणि ईश्वर  ८३
  
 कालच्या भगवंताच्या उत्तराच्या विचारात, मन शांत केल्यावर, त्याच शांततेत काही काळ तसच बसून, त्या विचारांचं चिंतन व मंथन करताना काही गोष्टी जाणवल्या. खरच भगवंताने बुद्धी दिली देहात अर्थात स्थूलरूपात, आत्मा सुक्ष्मरूपात आणि मन दिलं या दोन्ही स्थूल आणि सूक्ष्म यांना जोडण्यासाठी. विचार करा जीवनाचा प्रवास कर्मफल भोगत असताना भोगाकडून भोगमुक्तीकडे वाटचाल आहे. 

भोग हे कर्मफलाचं साक्षात प्राप्त रूप अर्थात स्थूल कर्माचं स्थूल फलस्वरूपात प्रकटीकरण आहे. पण मायेच्या प्रभावात  केलेल्या सर्व कर्माच्या परिणामात जे प्राप्त होईल ते अनेक रुपात समोर येतं.  तो स्थूल परिणाम अनेक प्रकाराने आपल्या समोर येतो आणि आपण त्या परिणामांच्या प्रभावाने, अजून वाहवत जाऊन, या सागरात पूर्ण अडकून जातो. जन्म जन्मांतरीच्या या स्थूल देहरुप भोग चक्रातून जाताना, कधीही हा विचार येत नाही की मी इथे का?.

आपल्या मनात नेहमी विचार येतो मी इथे कसा?. जर का हा विचार आला की कळेल हा संघर्ष सर्व स्थूलरूप देहातून सुरू होतो आणि युगेयुगे जन्मजन्म स्थुलातच सुरू राहतो. पण भगवंत तर निर्गुण आहे म्हणजे सुक्ष्मरुप आहे. म्हणजेच आपला प्रवास स्थूलरूप देहाकडून सुक्ष्मरुप भगवंताकडे आहे. म्हणजेच स्थुलातून सुक्ष्माकडे नेणारं साधन आपल्याला पाहिजे, जे हा उद्देश साध्य करू शकेल. 

ते सुक्ष्मरुप साधन अर्थात सर्वात सूक्ष्म, तरीही स्थूलाला सुक्ष्माकडे नेण्याची शक्ती त्यात आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. इतकं सूक्ष्म की निर्गुण निराकार परमेश्वराचं प्रतीक आणि म्हटलं तर स्थूलरूप देहातील आत्म्याच्या निकट जाणारं, त्या आत्म्याला अनंतरूप परमात्म्याला भेटवू शकणारं. यासाठी परमेश्वराने मन नावाचं एक सुक्ष्मरुप इंद्रिय प्रदान केलं, ज्याच्या सहाय्याने नामाचाच सुक्ष्मरुप आधार घेत, ते मन, बुद्धी आणि आत्मा यांचा सांधा बनून देहाचा उद्धार करू शकतं. 

म्हणूनच आपण एक वाक्य नेहमी म्हणतो की, मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो. त्याचं महत्वाचं कारण की मनच सर्व गोष्टीचं कारक आहे, ऊर्जा आहे. मनच बुद्धीला कार्यप्रवृत्त करतं आणि शरीराला कर्मात बद्ध करतं. म्हणूनच परम ईश्वर भगवंताने मनाची निर्मितच केली नाही, तर गीतेत साक्षीदार राहून सांगितलं की इंद्रियांमध्ये मी मन आहे. म्हणजे मन हे अमर्याद शक्तीचं साक्षात रूप आहे. जसं वाफेच्या शक्तीने इंजिन चालतं, त्याचप्रमाणे मनाच्या शक्तीने देह बुद्धी कार्यसिद्ध होतात.

म्हणजेच स्थूलाकडून सुक्ष्माकडे जाण्याचा मन हा एकमेव मार्ग आहे आणि त्या मनाला बुद्धी व आत्मा यांची साथ घेणं गरजेचं आहे, कारण मुक्तीचा मानवी देह हा एकमेव मार्ग आहे. याच पद्धतीने हा प्रवास, ही यात्रा योग्य दिशेने सुरू राहू शकते. 

 चिंतन करा,  उद्याच्या भागात पुढे विचार करू. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...