Skip to main content

भोग आणि ईश्वर ६५

भोग आणि ईश्वर  ६५

 या विश्वात अनेक प्रकारच्या लहरी संचार करत असतात. प्रत्येकाचा प्रत्येक विचार, इच्छा, शब्द  एक तरंग होऊन या आसमंतात लहरीस्वरूपात फेकला जातो आणि त्या लहरींच्या शक्तीप्रमाणे आपल्याला फलस्वरूपाची  प्राप्ती होते. त्याचप्रमाणे परमेश्वरी आशीर्वाद हेसुद्धा या जगतात नव्हे पूर्ण ब्रह्मांडात अनंत काळापासून अनंत काळापर्यंत विहरत असतात. 

ज्यावेळी आपले विचार, कर्म व शब्दतरंग या परमेश्वरी तरंगांशी संयोग पावतात, त्यावेळी आपल्याला इच्छित फलप्राप्तीचा अनुभव येतो. अश्या संयोगालाच आपण परमेश्वरी आशीर्वाद प्राप्ती म्हणतो. 

परमेश्वर वा या जगताची निर्मितीशक्ती मुळात कोणालाही नकारात्मक लहरी वा संदेश वा तरंग पाठवत नाही. परमेश्वरी हृदयातून फक्त आनंद, समाधान, जगताचं कल्याण, जगताच्या सुखाची सदिच्छा हेच जगतासाठी आसमंतात वा ब्रह्मांडात लहरीस्वरूपात परावर्तित होतं. आपण ते प्राप्त करायला समर्थ असतो वा असमर्थ असतो. ही समर्थता वा असमर्थता आपल्याच कर्मातून वा कृतीतून ठरते.

 वर्गात शिक्षक शिकवतात ते पूर्ण वर्गासाठीच असतं. ज्यांचं लक्ष आहे वा ज्यांनी त्यासाठी एकाग्रता साधली आहे किंवा ज्यांनी त्यासाठी स्वतःला तयार वा सिद्ध केलं आहे त्यांनाच ते प्राप्त होणार किंवा त्यांच्याच कानातून मेंदूपर्यंत ते पोहोचणार आणि योग्य त्या पेशींमध्ये ते साठवलं जाणार. ज्यांचं लक्ष नाही किंवा जे इतर काही करण्यात मग्न आहेत, त्यांना समजणार नाही आणि परीक्षेच्या वेळी त्यांना काही लिहिता येणार नाही. 

इथे शिक्षक म्हणजे परमेश्वर, विद्यार्थी म्हणजे आपण, ईश्वरी आशीर्वादाच्या लरही म्हणजे शिक्षकांचं शिकवणं आणि आपली साधना, सत्कर्म,  इत्यादी म्हणजे त्या लहरींपर्यंत पोहोचण्यासाठी आपण केलेले प्रयत्न आणि त्या आशीर्वादाची प्राप्ती म्हणजे त्या शिक्षकांचं ज्ञान जे आपल्याला प्राप्त झालं.  म्हणजेच ईश्वर कोणालाही त्या आशीर्वादाची पखरण वा कोणाला वंचित ठेवतो असं काही नाही. 

आपल्या सिद्धतेवर त्याची प्राप्ती अवलंबून आहे. वेळ पडल्यास व योग्य व्यक्तीसाठी प्रत्यक्ष कुरुक्षेत्री येऊन गीतासंदेश सांगून त्या व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतं करण्याचे कष्टदेखील ईश्वर घेतोच घेतो. मग आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर आपल्या कर्म, शब्द, विचार व इच्छारुप लहरींना, त्याच्या आशीर्वादरूप लहरींशी संयोग साधून इच्छित प्राप्ती करता येऊ शकते. 

आता ही सिद्धता म्हणजे काय तर नामजप, सकारात्मक विचार, शुद्ध आचार, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, समस्त जगताबद्दल सद्भावना, या माध्यमातून साधलेली चित्तशुद्धी. कारण शुद्ध चित्तातून उत्तम आचार, विचार, उच्चार व इच्छा निपजतात आणि परमेश्वरी आशीर्वाद प्राप्ती करून देऊ शकतात. 

अजून पुढे पाहूया, उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...