Skip to main content

भोग आणि ईश्वर ८८

भोग आणि ईश्वर  ८८
  
आपण जाणतेपणी वा अजाणतेपणी, याजन्मी वा गतजन्मांत घडलेल्या, स्मरणात असलेल्या वा विस्मरणातील प्रमाद किंवा चुका यांच्याबद्दल चर्चा करूया. माणूस हा विचारशील आणि कृतिशील प्राणी आहे. बाकी सर्व प्राण्यात आणि मानवात हाच मुख्य भेद आहे, विचार आणि कृती. 

तरीसुद्धा जाणूनबुजून वा अजाणतेपणी कर्म करत असताना, माणसाच्या हातून चुका, क्वचितप्रसंगी प्रमाद घडतात. हे सर्वसामान्य लोकांबाबत आपण बोलत आहोत. जे प्रमाद म्हणजे गुन्हे मुद्दामहून बुद्धियुक्त स्थितीत करतात, त्यांचा आता नको विचार करायला. आपण अश्या अनेक चुका जीवन जगताना करतोच करतो. कुणी जर नाही म्हणत असेल तर खात्रीने सांगतो की, तो त्यांचा भ्रम आहे. 

अश्या चुका, जश्या या जन्मी असोत वा आधीच्या जन्मातल्या असोत, पण कर्म केल्यानंतर त्याचं फलित भोगणं हे ओघानेच आलं. बर कर्मफलाच्या सिद्धांताने कोणतं फल कधी समोर येईल हे अज्ञात आहे, गूढ आहे. म्हणजे आनंदात एखाद्या मागील चुकांचं फलित समोर येणं हे नित्य आहे. आनंदावर विरजण ज्याला म्हणूया ते. बर भोग भोगून संपवायची मानसिक तयारी जरी केली, तरीसुद्धा, किती कधीपासून आणि कधीपर्यंत हे भोग राहणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे मानसिक अवस्था कठीण होते, भोग भोगत असताना. 

पण मग उपाय काय हा प्रश्न खूपदा पडतो. काही मंत्र, तंत्र, पूजाअर्चा इत्यादी उपाय प्रत्येकजण आपापल्या अधिकारात सांगतो, पण आपण आज वेगळाच विचार करणार आहोत. मुळात लक्षात घ्या की, सर्वकाही मनाशी निगडित आहे. भारतीय कायदासुद्धा उद्देश अर्थात इंटेंशन्सवर आधारित आहे. म्हणजे देह जरी कर्म करतं आणि आत्मा त्याचं ऋण पुढे नेतो, या जन्मात वा पुढील जन्मात तरीही, मनाचा त्यातील सहभाग किती याचंदेखील विश्लेषण होतं आणि विधाता त्यावर आधारित कर्मफल देतो किंवा तशी रचना कर्मफल सिद्धांतात करण्यात आली, विश्वनिर्मितीच्या वेळीच. 

कायदा जरी पुराव्यावर आधारित उद्देश सिद्ध करण्यावर भर देतो, तरीही आरोपीलासुद्धा बोलण्याची संधी देऊन मगच निकाल दिला जातो, जो न्यायाधीशांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित असतो. आता विचार करा मानवाने मानवासाठी निर्माण केलेल्या कायद्यात, जर आरोपीच्या बोलण्याचा इतका विचार करण्यात आला असेल तर मग विश्वन्यायाधीश आणि जगतपिता असलेल्या परमेश्वराने याचा विचार केलाच नसेल, हे अशक्य आहे. झालं काय की, या गोष्टी आपल्यापर्यंत त्याप्रकारे मांडण्यात येत नाहीत.

विधात्याने तशी रचना निश्चित केली आहे. घडलेल्या प्रमादांची, क्वचित चुकांची जाणीव मनाला होणं आणि त्यावर आपण मनाने, मनापासून आणि मनासाठी विधात्याची  क्षमा मागून घडलेल्या जाणिवेतील वा जन्मजन्मातील न समजलेल्या चुकांबद्दल ईश्वराला साक्षी ठेवून पश्चात्ताप व्यक्त करून, ईश्वराची क्षमायाचना करून प्रार्थना केली आणि ती जर मनापासून असेल तर विधाता हा परमदयाळू आहे, त्याला आपण तितक्या ममत्वाने वा आत्मीयतेने सादच घालत नाही. 

अन्यथा तो तर अखंड ब्रह्मांडाचा रक्षणकर्ता व तारणहार आहे आणि आपण तर आत्मरूपाने त्याचा अंश, म्हणजे एकप्रकारे लेकरं आहोत, का तो क्षमा करून, भोगातून सुटका करणार नाही. यात आपणच मागे पडतो किंवा हा मार्ग तितक्या प्रकर्षाने शास्त्रात असूनसुद्धा,  नित्य मांडला वा सांगितला जात नाही, त्यामुळे तो अवलंबला जात नाही. पण अखंड ब्रह्मांडस्वामी जो विविध रुपात प्रकटला आहे, 

जो गुरुरुप घेऊन साधकांवर मातेच्या ममतेने प्रेम करतो, जो रावणासारख्या अधमी, पापी जिवालासुद्धा अंतिम युद्धाआधी संधी देऊन प्रमादांची कबुली देऊन क्षमायाचना मार्गे शरण येण्यास सांगतो आणि जर तसं केलं तर, सीतेच्या बदल्यात सर्व प्रमाद माफ करीन असं वचन देतो, जो विधाता नरसिंहरुपात खांबातून प्रकटून हिरण्यकश्यपूला शेवटची शरण येण्याची संधी देतो, तो विधाता किती परमदयाळू असेल याचा फक्त विचार करा. 

बर हा प्रश्चाताप आणि कबुली कधी करायची, तर नित्य रोज नामस्मरण करण्याआधी, केल्यानंतर किंवा प्रत्येक क्षण करत जावं. मानवी देहात नोकरीत वा व्यवसायात प्रसंगी न केलेल्या वा केलेल्या चुकांबद्दल निरुपाय म्हणून वा अपरिहार्यता म्हणून आपण सॉरी म्हणून क्षमा मागतोच. मग इथेतर परम ईश्वर, जगाचा कर्ता करविता प्रत्यक्ष या आत्म्याचा स्वामी वा पिता याचीच क्षमा मागायची आहे. तेसुद्धा आत्म्याला पुढे या जन्मात किंवा पुढील जन्मात त्रास होऊ नये म्हणून. 

रोज नित्य देवाला प्रार्थना करावी, " हे परमदयाळू परमपीता मी जाणतेपणी वा अजाणतेपणी काही चुका, प्रमाद / अपराध केलेच असतील, तरीही तू मोठ्या मनाने मला क्षमा करून त्याच्या कर्मफलातून सोडव. मी नित्य तुझा ऋणी राहीन आणि नित्य तुझं स्मरण करत राहीन." 

बघा प्रार्थनेचा स्वीकार नक्की होईल. बघा विचार करा आणि मनापासून प्रार्थना करा. नाम मात्र नित्य घेत रहा, कारण नाम, सर्व काही सुलभ करेल. भेटूया उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...