Skip to main content

कम्युनिस्ट आणि नक्षली मेंटॅलिटी, तंत्र, मोदी आणि आपण!!

कम्युनिस्ट आणि नक्षली मेंटॅलिटी, तंत्र, मोदी आणि आपण!!

सध्या जे चालू आहे देशभरात आणि जगभरात, त्यात एक टिपिकल तंत्र, आज संपूर्ण जगातून एकाच पद्धतीने वापरलं जातंय. याचाच अर्थ ही प्रचार , दबाव आणि बुद्धिभेदाची पद्धती, आता व्यापक प्रकारे, संपूर्ण जगभरातील, अनेक लोकांना हाताशी धरून आणि प्रचंड पैसा ओतून भारतातील काही विशिष्ट टक्के मतदाराला गृहीत धरून राबवलं जात आहे. 

आपला देशद्रोहाचा अजेंडा छुप्या पद्धतीने राबवून, काही विशिष्ट व्यक्तींना हाताशी धरून, त्यांना समाजसेवकाचा बुरखा घालून, त्यांना समाजात मानमरातब मिळण्यासाठी मॅगसेसे सारखी अवॉर्डस त्यांना देऊन, त्यांच्या माध्यमातून लोकांचं मन वळवणं, बुद्धिभेद करणं, आणि ते शक्य न झाल्यास मनात गोंधळ निर्माण करून आपल्या देशाविरुद्धचा अजेंडा पद्धतशीरपणे पुढे नेण्याचं काम गेली कित्येक वर्षे राबवलं जात आहे. ते छुप्या पद्धतीने होत होतं. त्या  जाळ्यातील सर्व मुख्य लोकांना सामाजिक प्रतिनिधी म्हणून पेश करून, त्यांना, स्वतःच स्थापन केलेल्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभं करून, त्यांचा पपेट म्हणून वापर करून, आपला नक्षली कार्यक्रम व्यवस्थित राबवणं व्यवस्थित सुरू होतं.

त्यासाठीचं अर्थव्यवस्थापन एकदम पद्धतशीरपणे ऐन जी ओ च्या माध्यमातून कायद्याच्या चौकटी मोडून केलं जायचं. त्यावर सत्तर वर्ष कधीही सरकारने कार्यवाही वा साधं लक्ष देण्याचं कामसुद्धा केलं नाही. त्यामुळे ही पैसे येण्याची आणि त्याचं उत्तमप्रकारे वाटप करण्याची सिस्टिम पद्धतशीरपणे सेट झाली होती. गेली अनेक वर्षे छुप्या पद्धतीने, गुप्तपणे, कायद्याचं भय न बाळगता हे कार्य सुरू होतं. हे नक्षली विष हळूहळू झिरपत होतं. त्यामार्गे देशाला खिंडार पाडून कार्यसिद्धी करण्याची व्यवस्था आस्तेआस्ते तयार झाली होती आणि स्टेज तयार होत होतं.

यासाठी उत्तमातले उत्तम जाणकार, गीतलेखक, अभिनेते   समाजसेवक, पर्यावरणवादी असा बुरखा घालून यात सामील झालेले, यांची व्यापक प्रमाणात साखळी तयार झाली होती. भारतात हिंदू धर्माची कोणतीही चळवळ, जागृतता, जाग, अस्मिता यावर कधीही चर्चा झाली, कधी काही दुर्घटना घडली की, यावर बाजूने बोलणाऱ्या लोकांना वा संघटनांना एकत्र येऊ न देता,  पण कोणाच्यातरी इशाऱ्यावर नाचणारे, बरोबर त्याचवेळी बाहेर  येऊन आवाज, बवाल निर्माण करत. जेणेकरून अश्या हिंदूंच्या बाजूने बोलणाऱ्यांचं खच्चीकरण करणं सोप्प होईल, इतकी ही पद्धती सेट झाली होती. 

विविध क्षेत्रातील तथाकथित मान्यवर, यावर, वरवर  अचानक समोर आल्यासारखे, पण आतून पद्धतशीरपणे, एखाद्या मुद्दयावर हिंदू एकत्र येत आहेत किंवा एखादी घटना हिंदू जनमत जागृत करत आहे असं वाटलं की, त्यावर विरुद्ध मतं, एका साखळीत या सर्व जमवलेल्या लोकांना मांडायला लावलं जात असे. हिंदू हे मुळात सहिष्णू आणि पटकन बॅकफूटवर जातात हा इतिहास निर्माण करण्यात किंवा तसा चुकीचा इतिहास शालेय स्तरावर मांडण्यात वा शिकवण्यात रोमिला थापर सारखे तथाकथित डावे इतिहासकार यशस्वी झालेत. कारण समस्त हिंदुस्थानचा हिंदूंच्या गौरवाचा इतिहास आपल्यापर्यंत पोचू नये याची छानपैकी सोय सरकारी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या नावावर पाच ते सहा पिढ्या माथ्यावर मारण्यात आला. (यावर एक लेख लवकरच). 

म्हणूनच इतकी वर्षे मनात असून आणि सत्य माहीत असूनसुद्धा सर्वसामान्य हिंदू कधीही मुक्तपणे आपल्या जनमताचा जोर दाखवू शकला नाही. यात सर्वात, प्रथम ज्या व्यक्तीने, अधिकारीकपणे हिंदूंना व्यक्त होण्याची,  ही हिंमत जर कोणी दिली असेल, तर ती मोदींनी. याबद्दलचे अनंत उपकार त्यांनी आपल्यावर केले आहेत. म्हणजे आज इतकी वर्षे पद्धतशीरपणे पैसे ओतून हळूहळू झिरपत असलेली, ही देशाची अस्मिता पोखरून, तयार केलेल्या पार्श्वभूमीवर, किती सहजपणे पाणी फेरण्याचं काम मोदींनी केलं, याची साधी जाणसुद्धा आपल्याला नाही. पण त्यांना, आपल्या हातातून सुटत चाललेल्या, खेळाची सूत्र, पुन्हा हातात घेण्याचं कार्य कसं शक्य आहे, यावर अनेक मार्ग वापरून झाले. सर्वच्या सर्व मार्ग फक्त एका व्यक्तीने फेल आणि फोल केले, मोदी. 

आता परदेशी पैश्याचा ओघ नियंत्रित केला गेला आहे, काश्मीर प्रश्न निकालात निघाला, तीन तलाक कायदा संमत झाला, CAA अधिनियम पास झाला, NRC येईलच, बेकायदेशीर धंद्याचे अनेक मार्ग हळूहळू बंद होत चालले, सुरक्षा नियम कडक झाले, त्यांची अंमलबजावणी होत आहे, त्यामुळे अतिरेकी पाठवणं यासारखे मार्ग बंद झाले, आता  पुढे जर समान नागरी कायद्यासारखे कायदे जर संमत झाले, तर इतक्या वर्षातील सर्व मेहनत पाण्यात जाईल, हे सर्व संबंधित जाणून आहेत. 

त्याव्यतिरिक्त पुढची कमीतकमी पंचवीस वर्षे भाजपला कोणीही हलवू शकणार नाही आणि गेल्या कित्येक वर्षातील भारतीय जनतेच्या प्रचंड पैश्यावर मजा मारत असलेल्या अनेक पक्ष, संघटना, व्यक्ती, संस्था या कायम स्वरूपी नष्ट होऊ शकतात. त्यामुळे आज पाच ते सात दशकं ओतलेला पैसा हा पाण्यात जाणार. 

आता यात परदेशी व्यक्ती, संस्था यांना का उतरवण्यात आलं. याचं कारण हे देशाच्या विनाशाचं विषारी कार्य भारतासह अनेक देशात सुरू आहे. पण भारतातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हे कार्य अवघड झालं, पण अत्यंत गरजेचं होऊन बसलं. कारण जर 2024 हातातून गेलं, तर पुढे काहीही हाती येणार नाही. कारण जितक्या जास्त काळ मोदी सत्तेत राहतील तितक्या जास्त प्रमाणात,  सर्व खेळाची ते वाट लावणार, हे सर्व जगातील अतिरेकी, नक्षली, डावे, काँगीसह सर्व विरोधी, जॉर्ज सोरोससारखी विनाशकारी बुद्धीची माणसं, चीन पाकडे जाणतात, जाणत नाहीत ते बुद्दु सहनशील, हिंदूविरोधी हिंदू. 

त्यामुळे आता नाही तर कधीच नाही या त्यांच्या प्लॅनला आपण राष्ट्रप्रेमी जनसामान्य त्याच प्लॅनने उत्तर द्यायला हवं, एक होऊन, एक राहून, मोदींच्या पाठीशी ठाम उभे राहून. कारण मोदी कोणतीही गोष्ट स्वतःसाठी करत नाहीत हे लक्षात असुद्या. 

Now or never !! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले 
०७/०२/२०२१
२३:३७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...