Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५६

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
शाल्व राजाने वार चुकवला आणि वेगात रथाबाहेर उडी घेतली अन्यथा शेवट निश्चित होता. उसळून पुन्हा उभा रहात शाल्व गदा घेऊन बलरामाकडे धावला आणि गदेने बलरामाच्या छातीचा वेध घेत घाव घातला. या प्रहाराने बलराम मात्र आकाशाच्या दिशेने थोडा उडाला आणि पुनः जमिनीवर उभा राहिला. या अवधीत शाल्व रथारुढ झाला आणि पुढला पवित्रा घेणार इतक्यात बलरामाने मुसळ उचलून बरोबर शाल्व राजावर वार केला.  रुधिराच्या वांतीने शाल्व मूर्च्छित पडला.  त्याला मुसळीने घाव घालत बलरामाणे त्याचा अंत आपल्या नांगराने केला आणि शाल्व यमसदनी पोहोचला. 

यानंतर बलरामाने युद्धभूमीवर  अक्षरशः तांडव सुरू केलं. नांगर हाती घेऊन रणभूमी शब्दशः नांगरून काढली. अनेक वीर मातीत मिसळले. समोर शत्रूचा सैनिक वा वीर दिसला की त्याला नांगराने एकाच घावात रुधिराच्या वांती व अभिषेकासह रणात धारातीर्थी पाडलेच म्हणून समजा. त्याच्या नांगराचा फिरस्ता पाहून दोन्ही बाजूचे वीर तोंडात बोटं घालून आश्चर्यचकित होत होती आणि एकमेकांना सांगत होती. एखाद्या योध्याच्या हाती शस्त्र असतं तसच याच्या हाती हल शोभत आहे. याला इतर शस्त्राची गरजच नाही. उखळातील मुसळ आणि शेतातील नांगर घेऊन रणभूमीवर विराचं कार्य करतोय. 

बलरामाच्या या पराक्रमाने शत्रुसैन्याची दाणादाण उडवली. सर्वत्र प्रेतांचा खच झाला. किती मारले गेले , किती घायाळ यांची गणतीच नव्हती.  रुधिर मांस यांचा चोहीकडे चिखल झाला होता. किती वीर रणी धुळीस मिळवले बलरामाने हे फक्त यमराजच सांगू जाणोत. तिरकमठे , भाले, कट्यारी, खड्ग यांचा ढीग झाला होता. कित्येक गज घायाळ व मृत होऊन पडले होते. रुधिराला एखाद्या नदीचे स्वरूप आले होते.

त्यात या शस्त्रांचा ढीग वहात होता. तीर हे त्या नदीपात्रातील सर्पांसम दिसत होते. वीरांची शिरे त्यात फिरणाऱ्या मकरां प्रमाणे ,  त्यावरील केशजाळ शेवाळासमान भासत होतं, तर रथ नावेसमान आणि रथांच्या पताका या नावेवरील तारूसम दिसत होते आणि हे सारे नावेवरील जीव एकाच दिशेने निघाले होते. ती दिशा होती श्रीकृष्ण. कारण जे जे जीव आज रणात प्रत्यक्ष केशवासमोर इहलोकातून गेले ते ते सर्व मोक्षाला प्राप्त झाले. हे निर्विवाद सत्य होते. 

कारण जी जी शीरं उडत ती जणू स्वर्गद्वारापर्यंत जात, पण प्रत्यक्ष श्रीकृष्ण जिथे भुवर उभा आहे तोच खरा स्वर्ग  हे जाणून तेच शीर पुनः भुवर कृष्णासमीप येऊन पडत असे. जी जी शिरकमले ध्रुवमंडळात उडाली ती सर्व पुनः ब्रह्मांडप्रदक्षिणा करून सायुज्ज मुक्ती शोधार्थ पृथ्वीलोकी कृष्णचरणांवर येऊन पडत असत. कारण कृष्ण चरणांवर मृत्यू मिळता चारी मुक्ती दासी होतात हे वेदवचन त्या शिरास ज्ञात होत होतं. एक एक शीर जे सत्यलोकी जाऊन परत सत्यलोक न भावल्यामुळे ब्रम्हसदन त्यागून पुनः श्रीकृष्ण चरण गाठत आहे. कारण सत्यलोकी फक्त मुक्ती आहे पण कृष्णचरणी मोक्ष आहे. खरा मोक्ष खरी मुक्ती ही फक्त हरी चरणांवर आहे हे त्यास सत्य लोकी गेल्यावर उमगत असे. म्हणून सत्यलोकाकडे तुच्छतेने पाहात ब्रम्हसदन मुर्खानाच लखलाभ होवो असे म्हणत  खरे सुख फक्त हरी चरणांवर आहे हे जाणत पुनः येऊन हरिचरण प्राप्त करत होते. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२७/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...