Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४१

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
   
श्रीकृष्ण ज्या रुक्मिणीच्या हरणासाठी सर्व दळभारे अर्थात सर्व दल म्हणजे पायदल अश्वदल गजदल घेऊन येथे पातला होता त्या रुक्मिणीचं आणि तिच्या सौन्दर्याचं वर्णन करताना शब्द तोकडे होतात. श्रीकृष्णप्राप्तीसाठी धर्मशास्त्र वेद पुराण यात सांगितलेली नवविधा भक्ती , तिच्या स्वरूपातील नऊ मुद्रिका तीने आपल्या हातात धारण केल्या आहेत. 

नाथांनी सांगितलेल्या या रत्नांचा तात्विक अर्थ असा की, जिने श्रीकृष्ण अर्थात श्रीविष्णू अर्थात जगतपिता यांना पतिरुपात प्राप्त करून घेण्यासाठी नवविधा भक्तीच्या नऊ मार्गांचा अवलंब करून, त्या सर्व मार्गातून जाऊन, यशस्वी होऊन त्या सर्व भक्तीचा गूढार्थ जाणून, तितके जन्म खडतर तपसाधन करून नारायणाला प्राप्त केले आहे, करून घेतलं आहे. म्हणजे तिने केलेल्या त्या खडतर तापसाधनेची फक्त कल्पना मात्रही आपण करू शकणार नाही. अश्या नवविधा भक्तीच्या नऊ मुद्रिका धारण केलेली ती. 

या सृष्टीत सौन्दर्याची सुरवात जीच्यापासून होते. जिच्यामुळे बरवेपण काय हे ज्ञात झाले अर्थात बरवेपणाची सुरवात जिच्यापासून होते. स्वस्वरूप अर्थात आत्मरूप म्हणजेच जगतव्युत्पत्तीच्या  वेळी नारायणाच्या आत्म्यातून जे आत्मतेज सृष्टीत आले आणि ज्या आत्मतेजातून समस्त प्राणीमात्र सचेतन झाले त्या मूळ रूपाची अर्थात स्वस्वरूपाची जननी प्रत्यक्ष रुक्मिणी आहे. समस्त सुरवरांना सौन्दर्य प्राप्त करून देणारे सौन्दर्य जेंव्हा श्रमले त्यावेळी स्वतः जेंव्हा विश्रांतीसाठी आले तेंव्हा ते सौन्दर्य रुक्मिणी पाशी येऊन शांत झाले. 
 
श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना बिलगून सौन्दर्य समाधान प्राप्त करते झाले. अश्या स्वरूपाची मोहिनी श्रीकृष्णाला इथपर्यंत ओढून घेऊन आली होती. इतकं करून सुद्धा त्या सौन्दर्याचं वर्णन देवी शारदेचे शब्द करू धजावतील हे अशक्य आहे. जीची  निर्मिती , अद्भुत अश्या ब्रह्मांडाच्या निर्मात्या अर्थात सृजनकर्त्यांने केलेलीच नाही. तर जी कृष्णाच्या प्रभावाने रुपास आली. 

आपल्या शून्यत्वाचा उबग अर्थात कंटाळा येऊन हे गगन कृष्णभेटीस आतुर जाहले ते रुक्मिणीच्या मस्तकीच्या  निलवर्णी कुंतलात प्रकट जाहले. त्या निलवर्णी नभाचा निळेपणा तिच्या केसात प्रकट झाला. आकाशातील चंद्र हा खरतर रुक्मिणीच्या रूपाच्या तेजाचे प्रकटीकरण किंबहुना तोच चंद्र सृष्टीवर रुक्मिणीचे मुखचंद्र होऊन प्रकटला. 

परंतु त्यातही त्याची खजिलता अशी की कृष्णपक्षातील पंधरवडा त्याचा क्षय होत जातो. त्या क्षयाची अर्थात अस्तंगत होण्याची लज्जा वाटून तोच चंद्र कृष्णाच्या पक्षातही अर्थात कृष्णापक्षाच्या पंधरा दिवसातही कृष्णदर्शन व्हावे आणि अक्षयपण प्राप्त व्हावे म्हणून रुक्मिणीच्या मुखकमलावर प्रकटोनी आला होता. नभांगणात जसे चंद्रानंतर तारांगण तसे मौक्तिकांचे दागदागिने रुक्मिणी ल्यायली होती. श्रीकृष्ण भेटीचा योग प्राप्त व्हावा म्हणून तारांगणातील तेज एकत्र येऊन भीमकीच्या कर्णातील कुंडले होऊन भीमकीच्या कानात विराजित झाली होती. उद्देश हा की, त्यानिमित्ताने सृष्टीकर्त्या पूर्ण रुपी श्रीकृष्णाची भेट होईल वा व्हावी. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

११/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...