Skip to main content

मोदींनी काय केलं !!!

मोदींनी काय केलं। !! 

प्रश्न ऐकून भुवया उभ्या राहिल्या असतील ना. पण खरंच खूप विचार केला की याचं उत्तर सापडतं.   पूर्ण साडेपाच  वर्ष अनेक आव्हानं उभी करत, अनेक जणांना प्रश्नात टाकत , अनेक जणांच्या पायाखालची जमीन सरकवत , अनेक जणांच्या बुडाला आग लावत , अनेक समीकरण तोडत , अनेक नवी समीकरणं जन्माला घालत, अनेक सुप्त समंध जागे करत, अनेक वज्राघात झेलत आणि अनेक घात करत, अनेक स्थित्यंतरं घडवत हा माणूस निघालाय. अनेक नवीन गोष्टी कल्पनेपलीकडील करत करत पुढे जातोय. 

खूप जणांनी फेकू इत्यादी अनेक विशेषणांनी शेलक्या शिव्या घालत जहरी टीका केली. हा माणूस आपलं काम करत करत पुढे पुढे निघाला. बरं मंत्री आपलं आपलं काम करत आहेत ते चालूच राहील. त्यावर मला लिहायचं नाहीये. कारण त्यावर लिहिणारे अनेक आहेत. मी एका वेगळ्याच विषयावर लिहिणार आहे. कदाचित यावर लिहिणारा मी पहिलाच असेन. कारण यावरील कोणताही लेख वाचनात आला नाही. 

तर माझा मुद्दा रीतसर मांडतो. मोदींनी काय काय केलं खऱ्या अर्थाने.

इतकी उलथापालथ फक्त एका निर्णयाने केली की आज अनेक अस्तनीतले निखारे आणि अनेक जुने जाणते पक्ष आपलं मुळ रूप घेऊन आपल्या समोर उभे आहेत. तो निर्णय म्हणजे नोटांबंदी. या विषयावर इतकं लिहिलं गेलं असतानासुद्धा हा विषय का घेतला , याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याचे आता दिसायला लागलेले परिणाम. 

मुळात हा परिणाम लगेच काही प्रमाणात दिसायला लागला होताच. अनेक पक्ष जोर जोरात हल्लागुल्ला करत रस्त्यावर उतरले. खूप आक्रस्ताळेपणा करून मोदींना प्रेशराईझ करण्यासाठी शर्थीने कामाला लागले. जेंव्हा काहीही उपयोग झाला नाही , तेंव्हा इतर अनेक मार्गानी मोदींना रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न करून बघितला. सेनेचा आत राहून विरोध हा त्याच प्रयत्नातील एक भाग वा स्टॅटेजी होती. मोदी स्थिर, अटल राहिले, एका पर्वताप्रमाणे.

2014 च्या विधानसभेला वेगळं लढून भाजपाची पर्यायाने मोदींची ताकद घटवूया हा प्लॅन. पण लोकांनी जास्त सीट देऊन विरोधकांना आपटलं. मला वाटतं 2019ची स्ट्रटेजी त्याच वेळी ठरली असावी. अस वाटायला आज खूप स्कोप आहे. विशेषतः या एक दोन महिन्यातील घटना या पडद्यामागील खरा प्लॅन समोर आणणाऱ्या आहेत. सर्वात पहिला प्लॅन पाच वर्षे आत राहून त्रास देता येईल तेवढा द्यायचा. 

मधल्या काळात नोटांबंदी GST सारखे क्रांतिकारी निर्णय झाले. त्यातील नोटांबंदीत अनेक पारंपारीक गड किल्ले आणि त्यांचे बुरुज ढासळले. मूळ उद्देश काळा पैसा नव्हे तर पक्ष आणि पक्षातील तगडे नेते यांच्याकडे असलेला काळा पैसा नामशेष करणं हा होता. जो १००% यशस्वी झाला. त्याचाच परिणाम आज सर्वच पक्षांच्या अस्तित्वाच्या लढाईमुळे त्यांचा वास्तविक चेहरा जगापुढे आणता आला आणि असे हतबल झालेले सर्वच पक्ष एक एक करत एकमेकांचे साथीदार बनून समोर आलेत. त्यातील शेवटचा साथीदार म्हणजेच पारंपारिक मित्रपक्ष. 

अन्यथा एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष जो एकेकाळी हिंदुत्वाचा कणा होता तो अचानक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस , रांका, समाजवादी काँग्रेस यांसह अनेक पक्षाशी हातमिळवणी करायला तयार होईल, ही अशक्यप्राय गोष्ट करून दाखवली ती फक्त मोदी शाह जोडीने.  

काँग्रेससह अनेक पक्ष आपल्या मूळ भूमिकेतच आहेत अजूनही. पण एका पारंपारिक मित्राने आपली सर्व तत्व गुंडाळली.  नव्हे मोदींच्या कणखर भूमिकेमुळे त्यांना त्यांच्या मूळ रुपात आणून उभं केलं सर्वांसमोर , असं माझं अनुमान आहे. त्यामुळे आता त्यांचं खर स्वरूप उघड झालं, जे खऱ्या अर्थाने मोदींचंच श्रेय आहे. 

आता पोझिशन एकदम क्लिअर. एखाद्याला नमवण्यासाठी (so called त्यांचं उद्देश) आपल्याला किती खालच्या थराला जावं लागतंय, याचं भान नसावं हाही एक चमत्कार म्हणेन मी. 

असो तर आज सर्व मोदी विरोधक, अगदी एकेकाळचा पारंपारिक मित्र धरून, सर्व विरोधक खऱ्या अर्थाने त्यांच्या खऱ्या स्वरूपात , म्हणजे प्रसंगी देशविघातक शक्तींच्या हातात हात घालून उभे राहू शकतात म्हणजे स्वार्थासाठी काहीही करू शकतात,  हे जनतेसमोर उघडं करून दाखवलं आणि हे मोदींच खूप मोठं यश आहे , असं माझं मत आहे.

बाकी जनता दुधखूळी नाही हे जनतेने मे मधेच सिद्ध केलंय. पुढेही वेळ आली तर सिद्ध करतील. देशहिताच्या प्रश्नात प्रत्येक वेळी पाठीशी उभे राहून. आता तर काका देश पातळीवर हाच प्रयोग राबवणार , म्हणजे देशपातळीवर सर्व एका बाजूला आणि मोदीजी एका बाजूला. फिर तो आयेगा मजा. 

आगे आगे देखेंगे होता है क्या !!!!

©® लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०२०
२१:५५

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...