Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४३

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
   
तिच्या हातात ब्रह्मांडाच्या तेजाने तळपणारे कंकण आहेत. हातातील त्या कंकणांचा रुणझुण आवाज जणू रुक्मिणीला कृष्णभेटीची आतुरता लागली आहे हेच वदवून वदवून सांगत होता.  तिच्या तळहाताच्या रंगाबद्दल सांगताना शब्दसंपत्ती आटून गेल्यासारखे भासते. परंतु तरी प्रयत्नमात्रे सांगतो. निलजलातील सौम्य गुलाबी कमलपाकळ्यांसम मखमली तळहात आहेत आणि आता कृष्णमिलनाच्या आतुरतेमुळे त्यांना मदनलालीमा प्राप्त झाली आहे. 

तळपायाला गुलाबी रंगाचे नक्षीकाम केले आहे आणि असे ते चरणकमल नागिणीच्या वळसेदार चालीप्रमाणे नागमोडी आहेत आणि एखाद्या सूक्ष्म पुष्पांच्या पाकळ्यांची नाजूकता त्यांच्यात आहे. असे हे चरणकमल भूधरेवरील खडे व कंटक यांच्यामुळे पीडित होऊ नयेत म्हणून सुरवरांनी स्वये त्या चरणतळी निजदेहाचे आच्छादन पसरले आहे. 

ज्यामुळे त्यांना सायुज्ज मुक्तीचा लाभ व आनंद मिळत आहे. परंतु हे त्यांचे भाग्य पाहून अनेक सुरवर ब्रम्हदेवांकडे याच कार्याचे साकडे घालत आहेत. कारण हे दुष्प्राप्य आणि दुर्लभ आहे, हे तेदेखील जाणत होते. सुवर्णरस सोळा वेळा आटवल्यावर त्याला जी झळाळी येईल, त्या झळाळीचे सोने असलेली कटीमेखला तिच्या कटीला आहे ज्याच्या मध्यभागी घननील रंगाचा अतिमौल्यवान हिरा जडलेला आहे. 

क्षणोक्षणी दिशा उजळवून प्रकाशमय होतील आणि चोहीकडे त्याची प्रभा पसरेल असे हिरे जडलेल्या मुद्रिका तिच्या अतिसुंदर लांबसडक दशांगुळात घातल्या आहेत. दंडातील वाकी कृष्ण कृष्ण या नादाचेच गायन करत आहेत. पायातील नुपुरातून येणारा नाद हासुद्धा कृष्णमय झाला आहे. इतके हरीचे जिला चिंतन जडले आहे ती रुक्मिणी त्रिखंडातील सर्वात सुंदर सुशील स्त्री दिसत होती. 

तिच्या रूपाचं लावण्य कृष्णसख्याला आकृष्ट करण्याइतपत होतं. त्यासाठी सहस्त्र रतीमदन कामाला लागले होते. कारण तृप्तीच्या परिभाषेपलीकडे ज्याची वृत्ती पोचली आहे आणि वैराग्य रंगी ज्याला नित्य समाधी लागली आहे अश्या देही असून विदेही श्रीरंगाला आकर्षण वाटावं यासाठी त्रिखंडातील सौन्दर्य रुक्मिणीच्या ठायी यावं, यासाठी चराचर , ब्रह्मांडा तील प्रत्येक जीवाशिवाला सृष्टीने कामी जुंपल होतं. अर्थातच रुक्मिणीचं सौन्दर्य पाहून सुरवरांचे प्रयत्न साकार झालेत हे जाणवत होतं. 

मगधनरेश  आणि शिशुपाल रुक्मिणीकडे पाहून एकमेकांना सुहास्य सांगत होते.  शिशुपाल मनोमनी संतुष्ट आणि कामातुर दोन्ही भावनेत वाहात होता. कारण जिच्या सौन्दर्याने देशोदेशीचे वीर महायुद्ध करण्यास उत्सुक होते, जिच्या सौन्दर्याने अनेक वीर घायाळ झाले होते, जिच्या एका दृष्टीने शूरवीर हातातील शस्त्रे खाली ठेवण्यास तयार झाले असते , अशी रुक्मिणी मला भार्या म्हणून प्राप्त होणार या विचाराने शिशुपाल घायाळ झाला होता आणि रुक्मिणी कृष्ण विचाराने मुग्ध झाली होती.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१३/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...