Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४९

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

अश्याच  विचारमग्न अवस्थेत ती होती. तिची ती अवस्था पाहून श्रीकृष्णाला बोध झाला की, ही स्वतःला दोष देत असेल किंवा हिला या घनघोर युद्धाच्या परिणतीची शंका आली असेल. म्हणून तिला धीर द्यायला श्रीकृष्ण म्हणाला

" हे रुक्मिणी , तू चिंता करू नकोस. तुझे दिर आणि इतर यादववीर हे या सर्वांना लोळवून तुला सुखरूप द्वारकेस नेण्यास समर्थ आहेत. या सेनेत जे वीर रथी महारथी आहेत त्यांच्याबद्दल ऐकशील तर तुला कल्पना येईल की किती सुरक्षित हातात तू पोचली आहेस आणि तदपश्चात तुझ्या सर्व चिंतांचं आणि शंकांचं  निवारण होईल. 

यात मुख्य वीर श्रीबलभद्र अर्थात ज्येष्ठ बंधू श्रीबलरामदादा, 
यासोबतच अक्रूर , कृतवर्मा, गद, सारण , सात्विक, चक्रदेव, सात्यकी, अतिदांत , श्र्वशल्फ, महाबाहू, वीर, कंक हे मुख्य वीर यादवसेनेत आहेत. या मुख्य वीरांव्यतिरिक्त अगणित यादव वीर आज इथे उपस्थित आहेत. जे शत्रुसैन्याला त्राही करून सोडतील. विस्तार भयास्तव मी तुला सर्वांची नावं सांगत नाही. तरीही या सर्वांचे नायक दादा आहेत. जे काळाचाही काळ आहेत आणि रणक्षेत्री अजेय आहेत.

आता आपल्या शत्रुसैन्यात कोण कोण वीर आहेत त्यांचीही माहिती थोडक्यात ऐक. जरावस्थेत जसा मोह जन्म घेतो तसाच हा जरासंध आहे हे जाणून घे. आज हा सैन्याचा सागर घेऊन युद्धास्तव येथे उपस्थित आहे. याच जरासंधासह कोण कोण राजे महाराजे आहेत तेदेखील ऐक. शाल्व , पौंड्रक, विदूरथ, प्रबळ, वक्रदंत, या वीरांचा रणात लढण्याचा वेग अतिप्रचंड आहे. गवेषण, अंग, वंग, केशिक , कारूप, कलिंग या राजांनाही जमवून सोबत घेऊन आलेला जरासंध हाच मुख्य आहे या सर्वांचा. मगधनरेश या सर्वांना आपल्या विरुद्ध युद्धास प्रवृत्त करून उभा ठाकला आहे. परंतु या रणात श्रीबलभद्र रणमद चढल्यासारखे  लढत आहेत. त्यांना यादववीर गद विनोदाने म्हणतोय."

" हे वीर श्रीबलभद्र , दादा तुम्ही एकटेच या युद्धात यशश्री घेऊन जाण्याचा मानस ठेवून आलात की काय. मग आम्हास काय कार्य या युद्धात"

पुढे श्रीकृष्ण वदतोय 

"यातील चेष्टेचा भाग बाजूस ठेव, तरीही यात दादांच्या पराक्रमाची तुला साक्ष मिळेल. येथे गद पुढे दादांशी बोलला." 

"आता इथे कोण कोणाशी लढायचं याचा वाटा ठरवून घेऊ. गद म्हणजे मी स्वतः जरासंधाशी, माझा धाकटा बंधू सात्विक हा वक्रदंताशी, कृतवर्मा पौंड्रकाशी, विदूरथाशी अक्रूर आणि दादा बाकी सगळे शत्रूवीर आपल्याला देऊन टाकले" 

कृष्ण हसून सांगतोय

" रुक्मिणी या गदाच्या संभाषणाने अतिविशाल हास्याने दादांनी गदाला आलिंगन देऊन म्हटले की तू खूप मोठा वीर होशील. तुझ्या या वीर वचनांनी आणि पुढाकाराने मी बेहद्द खुश झालोय. तुझा उचित सन्मान युद्धपश्चात करूच. परंतु आता युद्धारंभ करू" 

दादांचे आणि गदाचे हे रणातील आलिंगन दृश्य आणि हास्य पाहून जरासंध रागाने खवळून त्वेषाने आपल्या सैन्याला ललकारीने गरजला. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२०/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...