Skip to main content

जानकी पुनःवनवास ८८

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८८

भरत सर्वाना घेऊन अतिथिगृही परतला.

प्रभुनी काही काळ लक्ष्मणाबरोबर सैन्याच्या गरजा, सुसज्जता, परराज्यातिल गुप्त वार्ता यावर उपयुक्त चर्चा करून काही महत्वपूर्ण सूचनां केल्या. शत्रुघ्ना बरोबर राज्यातील घडामोडी आणि लोकांच्या काही तक्रारी असल्यास त्यावर चर्चा केली.

इतक्यात काही गुप्तचर भेटिसाठी वेळ मागत आहे असा निरोप घेऊन प्रतिहारीं आला. प्रभुनी त्याना आपल्या महालात घेऊन येण्यास सांगितले आणि लक्ष्मण व शत्रुघ्न याना सूचनां देऊन प्रभुनी महालाकडे प्रस्थान केले.

तिथे काही गुप्तहेर जसे विजय, मधुमत्त, काश्यप , मंगल , कुल, सूर्याजी, कालिय, भद्र दंतवक्र आणि सुमागध हे प्रभूंच्या महालाबाहेर प्रतीक्षा करत होते.

प्रभुनी त्यांना आत येण्यास सांगितले. प्रभुनी राज्य कारभार सुरु केल्या पासून हे नित्याचे होते. रोज सर्व कारभार झाल्यानंतर व अन्यथा काही जरुरीचे काम असल्यास , प्रभू आपल्या गुप्तचरांकडून शत्रूंबद्दल, त्यांच्या हालचालींबद्दल , सैन्याच्या मानसिकतेबद्दल माहिती घेत. त्याचबरोबर एक उत्तम राजा असल्यामुळे राज्याबद्दल, राज्यकारभाराबद्दल, राजाबद्दल आणि राजपरिवारातील इतर सदस्यांबद्दल प्रजेचं काय मत आहे याचा वेळोवेळी अंदाज घेत असत. त्याच रिवाजानुसार नुसार प्रभुनी या सर्वांना भेटीस बोलावले होते.

प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्राशी निगडित समाचार प्रभूंच्या कानावर घातल्या. ज्या त्यांनी शांतचित्ते ऐकून काही सूचना सुद्धा केल्या. काही बाबतीत त्यांचे मत देखील विचारले. त्यानंतर भद्र नावाच्या गुप्तचरांकडे वळून प्रभू म्हणाले,

" राज्यात राजाबद्दल, माझे बंधू लक्ष्मण , भरत शत्रुघ्न तसेच राजपरिवारातील बाकीच्या सदस्यांविषयी प्रजेचं एकूण काय मत आहे. काय चर्चा चालते, यावर मला विस्तृत निवेदन हवंय. "

" प्रभू आपण वनवासात जाऊन चौदा वर्ष राहून पितृआज्ञा पालन करून एक आदर्शवत आयुष्य जगलात आणि त्याच बरोबर रावण वध करून अयोध्येचा गौरव वाढवून आलात याबद्दल सर्वांना अत्यंत अभिमान आहे. तुम्ही रघुकुलाच्या कीर्तीला आसमंतात नेलेत याबद्दल कोणाचंही दुमत नाही.  उलट सर्वानसाठी ती अभिमानास्पदच आहे. "

" अजून काय काय मत आहे प्रजेचं, सर्व घटनांबद्दल मला विस्ताराने सांगा. "

"अजून तुमचा सर्व बंधूंचा सलोखा हा एक उत्तम आदर्श आहे यातसुद्धा दुमत  नाही. तुमचा सर्वांचा आदर्श समस्त अयोध्यावासी नव्हे तर समस्त जगताने घ्यावा असहि सर्वांच मत आहे.  हीच रघुकुलाची रीत सदैव चालू राहूदे अशीही प्रार्थना सर्वजण ईश्वराकडे करतात. "

प्रभू हे सर्व ऐकून समाधानी तर दिसत होतेच पण तरीही काही पूर्ण कथन होत नाही याबद्दल त्यांना शंका येऊ लागली. म्हणून त्यांनी भद्रास सांगितले.

" हे भद्रा तू पूर्ण माहिती जी तुझ्याकडे आहे ती मला दे. आणि कोणताही संकोच न करता  तू कथन कर आणि जी वार्ता तुला सांगायची असेल अथवा जो परामर्श तुला करायचा असेल तो तो निःसंकोच कर. "

यावर भद्र म्हणाला

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...