Skip to main content

जानकी पुनःवनवास ७१

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ७१

मजल दरमजल करत हनुमंताच अयोध्येत आगमन झाल. वाटेत सलग प्रवास केल्यामुळे विश्रांतीसाठी हनुमान एका विशाल वटवृक्षाखाली थांबतो. त्याचा घेर इतका मोठा आहे, त्यावरून तो व्रुक्ष काही शतके वा हजार वर्ष जूना  असावा असा अंदाज येत होता. त्या डेरेदार वृक्षाखाली एकाच समयी अर्धा शतक पांथस्थ सहज विश्राम करू शकतील इतका विशाल घेर होता त्याचा. 

हनुमंताने एक छानशी जागा बघितली आणि तिथे पथारी पसरून बरोबर आणलेली शिदोरी उघडली. मातेने मोठ्या मायेने दिलेल्या अन्नाचा स्वाद काही औरच होता.  त्याची मधुरता शर्करेलासुद्धा लाजवेल अशीच होती.  खुप भूक लागल्यामुळे हनुमान यथास्थित भोजन करून विश्रांति घेत काही काळ निद्रिस्त झाला. वामकुक्षिनन्तर पुन्हा पुढे प्रवास सुरु करून हनुमंत प्रभुंपुढे दाखल झाला.  प्रभुनसमवेत देवी जानकी देखील होत्या. 

" जय श्रीराम. माता जानकी प्रणाम" 

"प्रणाम हनुमन्ता " देवी म्हणाल्या आणि त्यानी विचारणा केली. 

" तुझा प्रवास यथास्थित पार पडला ना ? काही अडचण तर आली नाही ना ?"

" माते ज्याच्या पाठीशी आपला आणि प्रभुंचा वरदहस्त आहे त्याला संकट क़ाय असत हेच माहित नाही आणि आलच संकट तरीही संकटमोचन आहेत ते शक्ति आणि युक्ति प्रदान करतात योग्य वेळी. आपल काम फक्त स्मरण करण इतकंच" 
देवा स्मरण या शब्दावरुन स्मरणात आल की मी निघताना एक शंका विचारली होती . आज्ञा असेल तर पुन्हा पृच्छा करू ?" 

प्रभु किंचित स्मित करून म्हणाले

" हनुमंता तुझी स्मरणशक्तिची दाद देतो मी. त्याच प्रश्नाला तू माझ्या चर्येवरून ताडल होतस की मी काही तरी विचार करतो आहे आणि मी म्हणालो की, माता अंजनी तुझे स्मरण करते आहे" 

" होय प्रभु  आणि आपली आज्ञा घेऊन, मी काही दिवस मुक्काम करून , मातेचे आणि महाराज सुग्रीव यांचे  आशीष घेऊन पुन्हा आलो आहे." 

" मग मातेचा काही निरोप काही आज्ञा माझ्यासाठी" 

" निरोप नाही. पण आपली कुशलता विचारली आणि  मी आपल्यासहवासात आहे याचा विशेष आनंद आहे तिला. इतकच. " 

" बर इतकंच की अजून काही सांगितलय" 

" नाही स्वामी अजून काही स्मरत नाही."

" नीट आठव हनुमंता, काही विसरतोयस तू " 

" नाही तस काही नाही " 

" बर मग मीच सांगतो बघ आठवतय का ते. त्या शिदोरित काही दिलय माझ्यासाठी मातेने. कस क़ाय विसरलास वत्सा" 

श्रीरामांचा स्वर थोड़ा चढला हे पाहुन हनुमंत वरमला आणि म्हणाला 

" चुकलो स्वामी पण ....." 

" पण क़ाय बोल " 

" अभय असाव तरच सांगतो" 

" ठीक आहे बोल" 

" मी विचार केला की ही दूर रानातली कंदमूळ आणि आपण महाराज तेंव्हा ........ संकोच वाटला जरा" 

प्रभुंच्या लोचनात अश्रु आले. 

" स्वामी खरच चूक झाली. मन साशंकित झाल की....  पण पण " 

अस म्हणून हनुमंताने प्रभु चरणावर लोटांगण घातल. अश्रुपूर्ण नयनानी प्रभुंकडे पाहिल. प्रभुनी हनुमंताला खांदे धरून उठवल आणि म्हणाले

" वत्सा जे जे प्रेमपूर्वक व मनोभावे कोणीही मला अर्पण करतो ते ते मी त्याच श्रद्धेने स्वीकारतो. हे तुला ज्ञात आहे ना ?. तरीही सांगितल नाहीस आणि संकोच केलास. अरे हा तर मातेकड़ून आलेला प्रसाद आहे. शबरीची उष्टी बोर सुद्धा मला तितकीच प्रिय आहेत जितक स्वादयुक्त मिष्ठान्न. मी फक्त देणाऱ्याचे भाव बघतो हनुमंता. आता अजून विलंब नको करुस. जे काही मातेने दिलय आणि त्यातील तू जेवढ शिल्लक ठेवलयस ते मला दे"

यावर प्रभु, देवी आणि हनुमंत तिघेहि अश्रु पुसता पुसता हसले. हनुमंताने प्रभुंसाठी आणलेली शिदोरी त्यांच्या स्वाधीन केली. 

प्रभु आणि देवी जानकी यानी स्वहस्ते शिदोरी उघडून त्वरेने त्याचा स्वाद घेत घेत ग्रहण केल. हनुमंत या दृश्याकडे आनंदाश्रुपूर्ण नेत्रानी पाहात कृतकृत्य झाला.

 ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...