Skip to main content

जानकी पुनःवनवास ८१

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८१

जस जशी ही तिन्ही उपद्वयापी अक्राळविक्राळ आणि राक्षस भावंड वाढू लागली तस तसा जगाचा ताप व्रुधिंगत होत गेला. त्यातच भर म्हणजे यांचे तात दानवराज सुमाली ,ज्याना भगवान विष्णुनी पाताळात हाकलल होत, त्यानीच यांच्या पालनपोषणासाठी यानाही पाताळात नेल. तिथेच याना राक्षसी विद्येचे आणि कुनीतिचे सर्व धडे मिळू लागले. यानी मानव जातिला अत्यंत त्रास देण्यास सुरवात केली. कुंभकर्ण तर माणस किड्यामुंगी सारखी उचलुन गिळंकृत करत असे.

दशानन तर मानव जमातीला तुच्छ मानत असे. असच एकदा सुमाली बरोबर सैर करत असताना सुमाली दशाननाला लंकेच राज्य तेथील सुबत्ता आणि कुबेर,अर्थात वैश्रवण, याबद्दल सांगतात. दशाननाच्या मनातला मत्सर आणि दंभ खवळून येतो. तो तात सुमालीना विचारतो की,

"मला हे सर्व ऐश्वर्य , वैभव आणि सत्ता मिळवायची आहे. मला फक्त असुरांचा नव्हे तर तिन्ही लोकांचा अधपति व्हायचय."

सुमाली सहर्ष त्याला यासाठी क़रावयाच्या घोर तापसाधनेबद्दल सांगतात

" तुला या करता ब्रम्हदेवाना प्रसन्न करून त्यांच्यां कडून इच्छीत वरप्राप्ति करून घ्यावी लागेल. तुला यासाठी खुप अवघड़ तपसाधना करावी लागेल."

"मला माझ्या उद्देशप्राप्तिसाठी सर्व काही करायची इच्छा व तयारी आहे. आपण मला आशीर्वाद देऊन माझे अभीष्ट चिंतावे. "

"तुझी इच्छा फलदायी होवो आणि तू समस्त असुरजातीचा कुलउद्धारक होवोस."

दशाननासह चारही भावंडे तप करण्यासाठी घनदाट अरण्यात जाऊन तप साधन सुरु करतात. दशानन प्रथम हजार वर्ष एका पायावर , तदनन्तर हजार वर्ष दोन्ही हात वर करून नमस्कार मुद्रेत, नन्तर हजार हजार  वर्ष अनेक आसनावस्थेत उन्ह पाऊस थंडीची पर्वा न करता तपश्चर्या करतो. त्याच्याच सह दोन्ही बन्धु व भगिनी मिळून पूर्ण दहाहजार वर्ष उग्र तप करतात

असेच दहाहजार वर्षानी ब्रम्हदेव त्यांच्यां घोर तपोबलाने आकृष्ट होतात आणि ते त्यांच्यासमोर प्रकट होऊन म्हणतात

" हे दशानना मी तुझ्या उग्र आणि निराग्रही तपाने प्रसन्न झालो आहे आणि तुला जे इच्छीत असेल तो वर माग. मी तुला तो देण्यास उत्सुक आहे."

यावर ब्रम्हदेवाना प्रणिपात करून दशानन म्हणाला

" हे भगवान ब्रम्हदेवा मी काही विशिष्ट उद्देश ठेवून या तपास आरंभ केला आहे. आपण मला त्याची पूर्तता करण्यासत्व सयोग्य वर द्यावा"

" बोल वत्सा तुजप्रत कल्याण होवो. निर्भय होऊन माग "

" ऐकाव देवा"

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...