Skip to main content

जानकी पुनःवनवास ७५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ७५

प्रभु हनुमंताच्या प्रश्नाच उत्तर देणार, त्याच वेळी प्रतिहारीं आत येऊन म्हणाला

" क्षमा असावी महाराज , भ्राता भरत आपली भेट घेऊ इच्छितात. आज्ञा असावी"

" हनुमंता तुझ्या शंकेच निरसन पश्चात करूया."

"हो स्वामी. मी आपल्याला स्मरण करून देईन"

" पाठव भरताला आतमधे "

प्रतिहारीं बाहेर जाऊन भ्राता भरत आत येतो.

" महाराजांचा विजय असो."

" स्थान ग्रहण कर भरता"

अस म्हणून प्रभु भरताला आपल्या शेजारील आसनावर बसण्यास सांगतात.

" जशी आज्ञा ."

"बोल भरता राज्याची स्थिति क़ाय आहे आणि काही समस्या असल्यास क़ाय आहे तेही स्पष्ट करून सांग."

" महाराज रामराज्यात सर्वत्र कुशल मंगल आहे. प्रजाजन सुखात आहेत. विवंचना हा शब्द जनमानस विसरायला लागलेत. किंबहुना विसरलेत अस म्हटल्यास वावग ठरू नये. सर्वत्र उत्साहाच आणि आनंदाच वातावरण आहे. आज अनेक वर्षानन्तर जनमानसाच्या चेहर्यावर रामराज्याचा सार्थ अभिमान ओसंडून वाहातो आहे. राज्याची सांस्कृतिकच नव्हे तर मानसिक स्थिति सुद्धा उत्तम आहे.

इंद्रदेव कृपावन्त असल्याकारणे पर्जन्यराजा  राज्यभरात पुरेशी बरसात करत आहे. त्यांमुळे पिक पाणी उत्तम आहे. शेती मळे बाराही महीने मुबलक प्रमाणात फुललेले असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुटवडा अथवा ग़ैरसोय उरलेलीच  नाही.  अनेक प्रकारची फळ फळावळ, भाज्या, इतर अनेक शेतीउत्पादने यानी नवनवीन उच्चाक गाठले आहेत आणि गाठत आहेत.

सर्व प्रकारची सुबत्ता आहे त्यांमुळे व्यापार उदिम उत्तम असुन परराज्यातून व्यापारी सर्व प्रकारच्या खरेदी साठी आपल्या राज्यात येत आहेत. त्यामुळे आपल्या राज्याचा महसूल वाढला आहेच  पण, व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या अतिरिक्त मालाची पूर्ण विक्री होऊन त्यांचेही उत्पन्न वाढत आहे. कपडेलत्याबाबत राज्य स्वयंपूर्ण झाल असुनि इथेहि परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यानी आपल्या राज्यातील बाजारपेठा बहरुन आलेल्या आहेत. त्याकारणे व्यापार व्यवस्था वाढत आहे.

सोन्या चांदीचे दाग दागिने यांच्याही किमतीत पुरेशी वाढ जाणवत आहे. राज्यातीलच नव्हे तर परराज्यातून सुद्धा सोनार येथे येऊन सोन्याची खरेदी तसेच उत्तमोत्तम दागिने करून घेत आहेत.  त्यांमुळे त्याही क्षेत्रात उत्पन्न उचांकित आहे. 

राज्यात कोणीही याचक नाही. त्यांमुळे रामराज्य एकप्रकारे याचकरहित आहे असे म्हटले तरी चालेल. राज्यात पाणीव्यवस्था उत्तम आहे. गाई गुराना मुबलक चारा उपलब्ध आहे. सधनता व सुबत्ता यामुळे शेतकरी पुरणावारणाच जेवण पशुधनाला खायला घालत आहेत.

त्यांयोगे दूधदुभत्याची व्यवस्था व उपलब्धता उत्तम व पुरेशी आहे. त्याच्या अतिरिक्त साठयातून परराज्यात निर्यात व त्यायोगे उत्पन्न व्रद्धि मुळे शेतकरी शेती व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न कमाई करत आहेत. या अतिरिक्त उत्पन्नाने राज्यातील समृद्धि कल्पनेहून समाधानकारक असून सर्वत्र खुशालीच आणि आनंदाच वातावरण आहे. गोधना व्यतिरिक्त इतर पशुधनसुद्धा सुखासमाधानात आहे. "

भरत  पुढे सांगतो.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...