Skip to main content

मुरली  - ८


(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ८

 कृष्णविरहिणी राधा निघालेली आहे वृन्दावनाकडे. मार्गी चालताना राधेसह सर्व सख्या शांत आहेत. कोणीच बोलत नाही. कारण सर्वजणी जाणतात की, ही भेट कदाचित पुढील अनेक वर्षानपर्यंत शेवटची असेल. पुढील भेट कृष्ण मनात आणेल त्यावेळीच , अन्यथा अशक्य. 
 
अश्याच मनोवस्थेत राधा असताना एक सखी म्हणते

" राधे आजच, या प्रहरीच कृष्णाने बोलावलय ना ?. नक्की आठवतय ना ?. नाही म्हणजे चुकीचा दिवस आणि प्रहर असायचा म्हणून म्हटल."

राधेच्या विचारांचा अश्व या प्रश्नाने अचानक थांबतो आणि चेहरा प्रश्नार्थक होतो. कावरीबावरी झालेली राधा अजून करुणामय भावात सखीला म्हणते

"आता यासमयी भलभलत्या शंकाकुशंका काढू नका बाई कोणीही. आधीच चिंतेत  माझ मन आहे आणि विचाराने बधिर माझ मस्तक बधिर होत चाललय. या तुझ्या प्रश्नाने मला अजूनच विचाराग्नि भस्म करेल की क़ाय अशी शंका येऊ लागली आहे मला. तेंव्हा कृपा करून तुम्ही माझ्या मनाची चिंता अजूनच वाढवू नका. नाहीतर मला वाटेतच रडायला येईल की क़ाय अस वाटायला लागलय." 

" बर बाई मी माझा प्रश्न मागे घेते.  फक्त जरा लगबगिने चल बाई तू राधे. तरी मी तुला म्हणत होते राधे की, निदान बैल गाड़ी किंवा अश्वगाडी तरी घेऊया किमान चालण्याचे श्रम वाचले असते."

यावर राधा तिच्याकड़े अश्या काही केविलवाण्या नजरेने बघते की बाकीच्या सख्या तिला दोन फटाके हाणतात आणि म्हणतात. 

 " आता तू गप्प बसशील का . अधिच हा मार्ग आज कोसभर दूरच वाटतोय. त्यात अजून तुझ्या बोलाने आम्हाला अजूनच काळजीचे ग्रहण लागले आहे. ते तू वाढवू नकोस. कळल .? " 

यावर आपली पाठ चोळत  ती सर्वाना म्हणते 

" किती जोरात मारलत मला. लागल ना.  हो हो आता काही नाही बोलते मी. निमुटपणे तुंमच्या पाठी येते, मुक़्या मांजरी सारखी." 

"आहाहाहा अगदी नाज़ुकच तू, क़ाय.? आणि तू मुकि मांजर वा हा पण एक गोकुळी विनोद ग बाई" 

अस म्हणून सर्व जणी एकाच वेळी जोरात हसतात. राधा सर्वाना दटावणीच्या सुरात म्हणते 

" पाष्कळ पणा पूरे झाला आता चला अन्यथा कान्हा म्हणजे कृष्ण येऊन निघुन जाईल. " 

" कृष्ण इतका मोठा होऊन सुद्धा  अजूनही तू त्याला कान्हाच म्हणतेस" आणि सर्व जणी एक सुरात " वा " अस म्हणून तिला चिड़वतात. 

राधा यावर लाजुन म्हणते 

" हो मग माझ्यासाठी तो कान्हाच आहे अजूनही, जरी जगासाठी तो कृष्ण, श्रीकॄष्ण , यदुवीर , महाराज असला तरीही." 

यावर सर्व सख्या 

" बर बाई असुदेत" 

अस म्हणून जोरात हसण्यात मग्न होऊन जातात.  

" चला लवकर , हसून झाल असेल तर.  कोणीतरी वाट पाहतय आपली लक्षात असुद्या." 

सर्वजणी लगेच जीभ चावून "हो हो चला चला" अस म्हणून लगबगिने वाट चालायला सुरवात करतात.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले 
२०/०४/२०१८
श्रीकृष्ण 
#PrasannaAthavale
   

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...