Skip to main content

जानकी पुनःवनवास ८५


ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८५

 
बंदिवान केलेल्या इंद्राला मेघनादाने  लंकेला आणले. 
मेघनादाच्या या पराक्रमावर प्रत्यक्ष ब्रम्हदेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि वदले

" हे मेघनादा तू तुझ्या पराक्रमाने मला दिपवून टाकलस. मी तुझ्या अतुलनीय पराक्रमाने प्रसन्न झालो आहे. मला प्रसन्न करण्याचा भक्ति व तप हा सर्व परिचित मार्ग आहे, पण तू एकमेव असा आहेस ज्याने मला पराक्रमाच्या बळावर प्रसन्न केले आहे. बोल वत्सा मी तुला एक वर देण्यास उत्सुक आहे."

मेघनाद ब्रह्हदेवाना म्हणाला

" हे प्रभो आपण जऱ प्रसन्न असाल आणि मला काही देणार असालच तर मला अमरत्व प्रदान करा." 

" हे शक्य नाही वत्सा. याहूंन वेगळे काही मग जे मी देण्यास उत्सुक आहे."

"मी प्रत्येक वेळी युद्धाआधी विजयी होण्याच्या संकल्पाने यज्ञ करीन, त्या त्या वेळी अग्नितून माझ्यासाठी एक दिव्य रथ प्रकट व्हावा आणि जितका वेळ मी त्या रथात बसून युद्ध करीन मी अजेय आणि अमर राहीन. आणि जऱ यदा कदाचित असा यज्ञ अर्धवट राहिला तरच मला मृत्यु यावा." 

यावर परम आनंदाने ब्रम्हदेव म्हणाले 

" तुझी इच्छा फलद्रुप होईल. पण त्या आधी तू बन्दी बनवून लंकेस आणलेल्या इंद्राची सुटका करावीस. "

" हे ब्रम्हदेवा आपण माझी इच्छा जऱ पूर्ण करत असाल तर मी इंद्राला सोडून देण्यास तयार आहे."

" तथास्तु वत्सा. या तुझ्या पराक्रमा मुळे समस्त ब्रम्हांड तुला इंद्रजीत अर्थात इंद्राला जिंकलेला असे संबोधित करेल. तसेच तुला माझ्याकडील अजून दोन अनमोल अस्त्र प्रदान करत आहे. ज्याचा वापर तुला फक्त एकदाच करता येईल."

" आपण दिलेल्या वराने मी आता अजेय झालो आहे." 

अगस्त्य प्रभुंकडे पाहून म्हणाले

" हे राजन म्हणून मी तुला म्हणालो की इंद्रजीताचा अर्थात मेघनादाचा वध हा रावण वधाहून श्रेष्ठ ठरतो तो यांच साठी."

" अर्थात " 

भ्राता भरत भ्राता लक्ष्मण, जो तिथे प्रभुंच्या सन्देशानुसार आला होता, याजकडे अभिमानाने आणि कौतुकाने पाहून म्हणाला.

"रावण अर्थात दशानन हा तपोबलाच्या जोरावर अमरत्वाच्या जवळपास पोचला होता. जऱ तो कोणतेही दुष्कृत्य न करता तर त्याला मारण्याचे काहीही प्रयोजन वा कारण राहिले नसते. म्हणून रावणाने आपल्या मृत्युला स्वयेच आपल्या कर्माने निकट बोलावून घेतले. जो मृत्यु त्याच्या जवळ कित्येक युगे पोचलासुद्धा नसता. पण त्यानेच आपणहून जगास , नव्हे तिन्ही लोकास ताप देऊन प्रत्यक्ष नारायणास रामरूपात अवतार घेण्यास भाग पाडले. होय राजन तूच  या विश्वाशक्तिचा , परमशक्तिचा अवताररूपी अंश आहेस. आणि जगताच्या कल्याणार्थ या वसुंधरेवर प्रकट झालास आणि देवी जानकी हि साक्षात महालक्ष्मीच प्रकटरूपच आहे." 

या क्षणी सर्व बन्धु प्रभुंकडे मोठ्या कौतुके पहात होते. 

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...