Skip to main content

मुरली - १२

एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - १२

कृष्ण हरवून, हरखून नाचणाऱ्या राधेकडे फक्त पाहात आहे आणि ओठांवर बासरी आणि त्यातून येणारे मल्हाराचे सुर. बाकीं पूर्ण जग कृष्णमय झालय कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण  ............

राधा त्या मुरलीच्या सुरावर मंत्रमुग्ध होऊन नाचत होती. दोघांसाठी विश्व जणू स्तब्ध झाल होत आणि दोघांच्याही चित्ताची एकतानता झाली होती. त्याच सुरावटिवर राधा मनात जणू हेच शब्द गुणगुणत होती

मुरली मुरली कान्हा अरे  तुझी मुरली
उरली ना उरली ना सुध बुध माझी ना उरली

वृंदावनी वा यमुनेला येते मागून सुरांच्या मी
तू छेड़िता सुरु मनाचा ताबा घेते ही बासरी
मुरली मुरली कान्हा .........

कृष्ण मेघ हे येता आकाशी हे मन होई वेडे
वेड लावते जीवास मुरली राधा होई अरे बावरी
मुरली मुरली कान्हा .........

असा किती वेळ गेला कोणालाच कळलनाही आणि अचानक रथाच्या चाकांच्या खाड़कन झालेल्या आवाजाने आणि एकदम मिळालेल्या गतीने कृष्ण भानावर आला. त्याला देवी रुक्मिणी विचारत होती

" आज कुठे आहे मन. सर्व जण जाणुन आहेत की इथे मथुरेत, गोकुळात आणि वृंदावनी आपला जीव आहे. आपले गोप, गोपिका, सखे , सवंगडी या सर्वाना सोडून जाण खूपच कठीण असत. निदान हे आम्ही बायका नककीच समजू शकतो. क़ाय ख़र आहे ना.? "

शेवटच्या वाक्याने कृष्णाने किंचित स्मित केल आणि म्हणाला

" खरच सहमत आहे रुक्मिणी तुझ्या वाक्याशी. खुप कठीण आहे अस जग आणि जागा बदलण.  असो, सर्व तयारी आणि बांधाबान्ध व्यवस्थित केलीत ना ? काही राहिलं असल्यास अजून बघाव. रथ थांबवून धरतो."

शेजारीच  बसलेली सत्यभामा लगेच म्हणते

" नाही बघायची काहीच गरज नाही.मी आणि रुक्मिणीदेवी यानी सर्व पूर्ण बघून घेतलय. त्यांमुळे इकडे चिंता नसावी."

कृष्ण हसून म्हणतो

" बर मग ठीक. तसहि मी कोण चिंता करणारा. तो जगदीश्वर समर्थ आहे त्यासाठी."

अस म्हणून कृष्ण सूचक अर्थाने रुक्मिणी कड़े पाहतो आणि स्मित करतो. अर्थातच देवी रुक्मिणी त्याला तसाच सूचक प्रतिसाद देतात. सत्यभामेला यातल काही उमगत नाही. अर्थातच तीही त्याकड़े फार लक्ष देत नाही आणि फार विचार न करता बाहेरील फिरणाऱ्या जगाकडे आणि त्यातील निसर्गसौन्दर्याकडे बघण्यास सुरवात करते.

कृष्ण थोडेवेळ विचार करून रुक्मिणीस म्हणतो

" मी दादाच्या रथात जातो काही परामर्श आणि चर्चा करायची आहे. रेवती वाहिनिना इकडे पाठवून देतो. म्हणजे तुम्हाला सुद्धा बर होईल."

यावर दोघी मानेनेच होकार देतात. कृष्ण त्वरित सारथ्याला रथ थांबवायची आज्ञा देतो. अर्थातच यांचा रथ थांबलेला पाहून बाकीचे रथ गाडया, सर्व लवाजमा सैन्य सगळे थांबले.
कृष्ण रथातुन उतरून बलरामदादाच्या रथाजवळ जाऊन म्हणतो.

" दादा मी तुंमच्या रथातून येतो. वहिनी तिकडे जातील. क़ाय वहिनी.? "

यावर वहिनी समजून फक्त स्मितवदन होकार देतात आणि रथातून पायउतार होतात. सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सर्वजण पुढील वाटचाल सुरु करतात. बलरामाला हे काही फार रुचलेल नाही. म्हणून तो म्हणतो.

" कान्हा तू बालपणापासून खुप चंचल आहेस. स्थिर कधी होणार आहेस ईश्वर जाणे. एक गोष्ट , निर्णय स्थिर नाहीत तुझे."

" तस नाही दादा.पण काही चर्चा करायची असेल तर हे जास्त सोईच आहे, असा विचार आला म्हणून आलो इतकंच."

" बर बर ठीक आहे. लहान आहेस म्हणून तुझे लाड खपवून घेतले, शेवटी मोठा आहे मी. "

यावर कृष्ण

"आपल्या असीम कृपेवर आजवर तरलोय मी दादा"

अस म्हणून प्रणाम करतो.

इकडे मजल दरमजल करत वृन्दावनातून निघालेल्या सर्व गाडया गोकुळात पोचतात. गाड़ीवान आणि गोप सर्व मुलींना व स्त्रियांना त्यांच्या त्यांच्या घरी पोचवून मगच आपल्या घरी जातात.

तर मथुरेहुन द्वारकेला निघालेल्या सर्व गाडया , रथ , सर्व लवाजमा न्याहारिसाठी वाटेत थांबतो. कृष्ण आणि बलराम काही विचार विनिमय करण्यास्तव जरा दूर अंतरावर एका हिरवळीवर जाऊन बसतात. बलराम म्हणतो.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
२७/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...