Skip to main content

जानकी पुनःवनवास ७४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ७४

"कृपानिधान तुम्ही उत्तम शिष्य लक्षण सांगून खरच उपकृत केलत. आता  माझा मूळ प्रश्न आहे त्यावर आपण मार्गदर्शन करावे आणि मला उपकृत करावे ही विनंती."

"तुझा मूळ प्रश्न आहे की सम्पूर्ण मोक्ष प्राप्ति म्हणजे क़ाय .?. बरोबर "

हनुमंत नम्रपणे प्रणिपात करून म्हणतो

" होय प्रभु "

"ऐक तर मग. आत्म्याचं अंशात्मक रूप जेंव्हा परमांशापासून वेगळ होऊन या अन्तरिक्षात प्रवेश करत तिथे त्याचा प्रवास सुरु होतो पुन्हा ईश्वराप्रत पोहोचण्याचा. हे मी आधी सांगितलय तुला"

" होय प्रभु ज्ञात आहे आणि ध्यानात सुद्धा"

" हुशार आहेस. आता पुढच मनःपूर्वक श्रवण कर. मुक्ति म्हणजेच परमेश्वराकडे वा परमशक्तिकड़े त्या आत्म्याचा अंश पुन्हा कायम स्वरूपी परत पोहोचवणं. ह्याची जबाबदारी तिघांचिहि असते."

"अर्थात प्रभु ?"

अर्थात शरीर मन आणि आत्मा. हे जेंव्हा जेंव्हा एकरूप होऊन पूर्ण शक्तिने एकतत्व स्वरूपाचं मनन , चिंतन , ध्यान आणि साधना करतात तेंव्हा तेंव्हा तिथे निर्माण होणारा उर्जास्त्रोत आत्म्याला हळू हळू आपल्या लक्षाकडे नेण्यास सुरवात करतो. इथेच मोह आदी सहा नकारात्मक शक्ति आपलं काम अनेक पटीनी सुरु करतात. मुळात त्या जड़देही पंचमहाभूत तत्वासोबतच प्रवेश करतात आणि प्राणिमात्राच्या देहरूप अस्तित्वापर्यंत कार्यकरुन पुन्हा पंचमहाभूत तत्वात विलीन होतात आणि जीव आपल्या कर्मागतिनुसार पुढील जन्मी त्यांच्यां स्वाधीन होतो व फलादेशानुसार त्यांच्याच आधीन राहतो. या सर्वात माया ही छायेसारखी वावरत असते. ती जीवात्म्याला पूर्ण नियंत्रणात ठेवते. "

" पण मग असा जीव यातून मुक्ति म्हणजेच सुटका कशी करून घेणार. भगवन विस्ताराने कथन करावे, मी लक्षपूर्वक ग्रहण करण्याचा यत्न करतो."

" इथेच पहिली मुक्ति मिळवावी लागते.  पथम आत्म्याच्या आधारे मनःशक्तिला वश करण ही झाली पाहीली मुक्ति."

"ती कशी साध्य व्हावी"

" तू रिक्त समय  कसा क़ाय व्यतीत करतोस."

"जी मी ?. मी तर जो वेळ मिळेल तो प्रभुचिंतनात पूर्णपणे रममाण होतो. त्यांमुळे हे मन ताब्यात ठेवण मला ज्ञात नाही. पण हे सर्व आपल्या कृपेने साध्य होत असा माझा दॄढ विश्वास आणि श्रद्धा आहे. "

" पूर्णपणे सहमत आहे मी. हाच एक मोठा मार्ग आहे.

चिंतने प्राप्त हो गिरिवर
चिंतने प्राप्त सप्त सागर
चिंतने ध्यायसी जे जे तू
प्राप्त हो तुज ते या भुवर

परमईश्वर शक्तिस्त्रोताला ज्ञानातून वा अजाणतेपणी स्मरणात आणून व त्याचे नित्य स्मरणकरून कोणताही जीव ही पहिली मुक्ति प्राप्त करून घेऊ शकतो "

" पण हे सहज साध्य आहे प्रभु "

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...