Skip to main content

मुरली  - ७


(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ७

"चलाव दादा मी आहे आपल्यामागे." कृष्ण म्हणतो 

कृष्ण दादाच्या पावलांवर प्रस्थान करतो आणि देवी रेवती या  देवी रुक्मिणी, देवी सत्यभामा, देवी जम्बुवंती सह इतर कृष्ण पत्नीना बोलवायला राजमहालात निघुन जातात. देवी रुक्मिणी आणि देवी रेवती यांची भेट होते. देवी रेवती विचारतात 

" द्वारकेस प्रस्थान आता कोणत्याही क्षणी होऊ शकतं त्यांमुळे आपली तयारी कितपत आहे ते एकदा बघून घेऊ. सेवकवर्गाने  सर्व केले असेलच, पण आपण एकदा नजरेखालून घालू. कारण काही समस्या आल्यास आपल्यावर दोषारोप टाकून दोन्ही बन्धु मोकळे होतील. "

" हे बाकीं रेवती वहिनी तुम्ही  योग्य बोललात. चला आपण एकदा बघुया. मी बाकीच्या राण्याना घेऊन येतेच."

" हो ये तू. मी पुढे होते" 

इकडे ही तयारी चालू आहे. पण तिकडे गोकुळात क़ाय स्थिति आहे ते बघुया. ज्यानी कृष्णासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यानी जाण्याच्या तयारीला सुरवात केली. त्यांच्यासाठी कृष्णाने वाहनांची  विशेष व्यवस्था सुद्धा केली आहे. त्यांमुळे तेही त्याच धामधुमित आहेत. पण काही व्यक्तिगत आणि अन्य कारणास्तव ज्यानी न जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे आणि विरहाचे भाव दाटलेले आहेत. कारण इतकी वर्षानची सख्य असलेले आपले बांधव कायम स्वरूपी सोडून जात आहेत याच दुःख आहे. अर्थात जे जात आहेत त्यानासुद्धा हे विरहाच दुःख आहेच.  पण यात सर्वात अगतिक स्थिति आहे राधेची. तिच्या मनाचा ठाव लागतो का पाहुया. बघुया तिच्या मनात क़ाय चाललय.  बऱ्याच काळात कृष्ण न भेटल्यामुळे तिची अवस्था काहीशी अशी आहे 

ही विरही प्रीतीची बेला
श्रावण हा रिताच गेला
तो आला नाही घनही 
घनश्याम ही आला नाही 

किती जळून वृदावनी या
तरु लता समर्पित झाल्या
मन अजूनी तरी वाट पहाते
मुरलीची धुन परि नच येते

ती आली बघ आली सयहि
तरी मयूरावीण नाही नभही
पसरून पंख तो आहे चातक
वाट पाहतो हे का पातक

हा कृष्ण कृष्ण जाइ तो दूर 
सोडुन तिमिरी या मज घोर
या विरही बेलेतून मग मी 
एकटीच जळते रे अजूनी
एकटीच जळते रे अजूनी
एकटीच जळते रे अजूनी

याचाच विचार करत आणि याच भावावस्थेत राधा सखींसह वृंदावनाच्या दिशेने निघाली आहे, कृष्णभेटिसाठी. कारण तिलाही कृष्णाचा संदेश मिळालेला आहेच, द्वारके प्रस्थानाची निकड आहे. पण एकदा भेट वृंदावनी. पुन्हा एकवार माझी  मुरली आणि तुझे पैजण. तेंव्हा ये सखयाना घेऊन. पुन्हा एकदा फेर होऊ देत. म्हणून कृष्णवीरहिणी राधा निघालेली आहे वृन्दावनाकडे. 

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले 
१९/०४/२०१८
श्रीकृष्ण 
#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...