Skip to main content

सुभद्राहरण २७

सुभद्राहरण २७

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

त्यांना येताना पाहून अर्जुन  दारुकाला आज्ञा देतो कि, रथ येणाऱ्या दोन्ही बंधूना भेटण्यासाठी  सामोरा ने.  येणारे सर्व रथ, अश्व आणि दळ अर्जुनाच्या रथासमोर येऊन थांबले. एका रथातून कृष्ण, बलराम आणि एका रथातून अर्जुनासह सुभद्रा उतरले. कृष्ण आणि बलराम यांनी दोन्ही हात जोडून अर्जुनाला प्रणाम केला.

अर्जुन सुभद्रा यांनी दोन्ही भावांना चरणस्पर्श केला. दोन्ही भावांनी अर्जुनसुभद्रा यांना शुभाशीर्वाद दिले. ततपश्चात अर्जुनाला बलराम आणि कृष्ण यांनी आलिंगन दिलं. अक्रूर गद यांसह सर्व यादवांनी दोघांवर पुष्पवृष्टी केली आणि जयजयकार केला.  कृष्ण अर्जुनाला म्हणाला

" हे वीर धनंजया, तुझी सुभद्रेशी विवाहाची इच्छा यादवराज श्रीवसुदेव माता देवकी यांसह सर्वांनी मान्य केली आहे." 

अर्जुन दादांकडे बघतो. कृष्ण स्मित करून म्हणतो.

" अर्थातच दादांनी देखील मान्य केलं आहे आणि तेदेखील हा संबंध दृढ करण्यास उत्सुक आहेत. अर्थात म्हणूनच तर स्वतः माता देवकीने त्यांना आज्ञा केली आहे तुला घेऊन येण्याची. त्यानुसारच आम्ही दोघे बंधू, समस्त यादवकुळाच्या वतीने, पिताश्री श्रीवसुदेव व माता देवकी यांच्या आज्ञेने, तुला द्वारकेत आमच्या यादवकुळातील कन्या, कुमारी सुभद्रा हिच्याशी विवाह करण्यासाठी घेऊन जाण्यास आलो आहोत. अर्थात या विवाहास तुझी मान्यता असेल हे गृहीत धरूनच आम्ही तुला घेऊन जाण्यास आलो आहोत."

अर्जुनाने हसून सुभद्रेकडे पाहिले आणि म्हटले

" प्रिय सुभद्रे, अर्थात तुंही माझ्याशी विवाह करण्यास अनुकूल आहेस हे गृहीत धरूनच मी केशवाला माझा होकार सांगतो." 

सुभद्रा अर्थातच लज्जेने हसून मानेनेच होकार देत कृष्णाच्या रथात बसण्यास निघून जाते. कृष्ण अर्जुनाला म्हणतो

" चला आपण निघुया द्वारकेच्या वेशीवर संपूर्ण द्वारका प्रतीक्षा करत असेल." 

लगेच निघण्यासाठी तिघे वळतात आणि दादा लगेच म्हणतात

" बघ कान्हा अजूनसुद्धा सुभद्रेचा तुझ्यावर जास्त स्नेह आहे."

कृष्ण लगेच म्हणाला

" दादा आपला स्नेहमय धाक जास्त प्रखर असल्यामुळे तिला मी जास्त जवळचा वाटत असेन." 

" नाही दादा मला कृष्णाशी आज जास्त बोलायचं आहे, मार्गात.  म्हणून मी कृष्णाच्या रथातून येते. आपण आर्यपुत्रांना सोबत घेऊन या. आपण ज्येष्ठ असल्यामुळे यांच्यासोबत यावं. मी कृष्णासह येते." 

दादांनी लटका राग दाखवून होकार दिला. सर्व जण आपल्या रथात आरूढ झाले आणि सर्वजण दळभारासह द्वारकेच्या दिशेने निघतात.

क्रमशः

भाग २७ समाप्त
२१/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...