Skip to main content

सुभद्राहरण ११

सुभद्राहरण ११

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

एका सुंदर तळ्याकाठी एका मोठ्या वृक्षाखाली स्वच्छ केलेली जागा अर्जुनाच्या दृष्टीस पडली. अर्जुनाने त्या स्थानाची निवड विश्राम करण्यासाठी केली. अर्जुन त्या स्थानी स्थानापन्न झाला. खरतर ती जागा एका निषादाची होती, जो त्या जागी नित्य ध्यानधारणा करत होता. आपली नित्य कर्मे उरकण्यासाठी गेला होता.

अर्जुन योगायोगाने त्याच वेळेत आला, त्यामुळे त्याला माहित नव्हतं की,  ही त्या निषादाची बसण्याची जागा आहे. अर्जुन स्थानापन्न झाल्यानंतर काही वेळाने निषाद आपली नित्यकर्मे पार पाडून त्या स्थानी पातला. आपल्या स्थानी एका यात्रीने स्थान ग्रहण करून  त्यावर आपले आसन मांडून तो तिथे स्थानापन्न झाल्याचे पाहून निषाद क्रोधीत होऊन आपले पिनाक उचलून त्या यात्रेकरुजवळ त्याच क्रोधाच्या आवेशात गेला . त्या यात्रेकरूच्या समीप जाऊन म्हणाला.

"हे उदंड यात्री. तू माझ्या स्थानावर स्थानापन्न होऊन माझे स्थान ग्रहण केले आहेस. याचा काही विषाद नाही वाटत का तुला." 

अर्जुन शांतपणे त्या निषादाला म्हणाला

"हे पांथस्थ निषाद , मी या स्थानी आलो तेंव्हा हे स्थान रिक्त असल्याकारणे मी या स्थानाची निवड केली, विश्रामासाठी. आपण आता दुसरी जागा पहावी. " 

अर्जुनाचे हे बोल ऐकून निषाद अजूनच क्रोधीत झाला. त्याने त्या अर्जुनाला म्हटले

" हे यात्री मी या स्थानी कित्येक दिवस विश्राम करत आहे.  काही नित्यकर्मे उरकून प्रतिदिन मी संपूर्ण दिवस येथे योगायाग , ध्यानधारणा आणि तपसाधना करतो. हे स्थान मी पूर्वीपासून अधिग्रहित केले आहे. मी तुला चेतावणी देतो हे स्थान त्वरित रिक्त करून दे, अन्यथा...."

" अन्यथा काय निषादा,"

" अन्यथा मी माझे हे स्थान, तुझ्याशी युद्ध करून प्राप्त करून घेईन."

" मग मी युद्धास सज्ज आहे"

असे अर्जुनाने प्रत्युत्तर देताच , निषादाने आपले पिनाक उचलले. ते पाहून अर्जुन आपले गांडीव उचलून त्वरित युद्धाचा पावित्रा घेऊन निषादाला आव्हान देता झाला. निषादसुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. तो त्वरित पिनाकास बाण लावून प्रत्यंचा ताणून म्हणाला. 

"हे घे माझे पाहिले अस्त्र." 

असे म्हणून निषादाने अग्नीअस्त्र सोडले. ज्याला अर्जुनाने पर्जन्यास्त्राने प्रत्युत्तर दिले. निषादाने तद्नंतर शक्त्यास्त्र सोडले.ज्याला अर्जुनाने कार्तविर्यास्र सोडून उत्तर दिले. निषादाने या प्रकारे आपल्याकडील एक एक अस्त्र सोडले ज्याला अर्जुनाने तितक्याच प्रभावी अस्त्राने प्रत्युत्तर देऊन आव्हानीत केले. 

अर्जुनाचं धनुष्यातील कौशल्य आणि निपुणता पाहून निषाद संतोषला. 

क्रमशः

भाग ११ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...