Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८८ (विवाह सोहळा १६)(प्रसंग सोळावा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८८ (विवाहसोहळा १६) (प्रसंग सोळावा समाप्त)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
रुक्मिणीला मूर्च्छितअवस्था येण्याप्रत समाधी लागली, हरिचरणी. देह त्याज्य केल्यानंतरची दृढ अवस्था अथवा ध्यानानंतरची समाधीअवस्था तिला सदेही प्राप्त झाली. कृष्ण चैतन्यरूपाने तिच्या समाधीअवस्थेत तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला

"हे जे संपूर्ण ब्रह्मांड दिसत आहे ,ते व्यापून मीच आहे. प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूत मीच आहे. तरीही मी याहून भिन्न वा तटस्थ आहे. सर्व चराचर व्यवहार स्वयंचलित आहेत तरीही त्यावर ध्यान माझंच आहे. या विश्वातील व्याप्त चैतन्य मीच आहे. मीच सर्वांचा कर्ता धर्ता आणि हर्ता आहे. जन्म मृत्यू निर्माण आणि विनाश मीच आहे. 

मीच सर्व देही व्याप्त आहे. माझ्याशिवाय या जगात काही नाही.  सर्व कर्मांचे भोग मला प्राप्त होतात., त्यातील जे मजसाठी असतात ते मी सेवतो. बाकीचे भोग हे त्या त्या पंचमहाभूतरूप देहाला परत प्राप्त होतात. जे भोग देह नष्ट होताना सुप्तअवस्थेत असतात ते आत्मासोबत घेऊन जातो आणि पुढील जन्मी त्या जन्मातील देह ते भोग भोगून संपवतो. 

तरीही पूर्ण जन्म भोग भोगून होत नाहीत, त्यामुळे  त्या जन्मातील कर्म आपला हिस्सा त्यात ओतून ती गंगाजळी सतत भरत राहतात. म्हणून जन्म मृत्यूची ही साखळी अव्याहत चालू राहते. आता तुझी समाधी अवस्था त्यागून जगतात ये अन्यथा जनांचा गैरसमज होईल आणि त्याचा दोषारोप माझ्याकडे येईल." 

रुक्मिणीने समाधीत हरीचे सर्वांगसुंदर रूप मनोहर पाहून लिलाधराची लीला अवलोकिली. त्या दर्शनाने खरतर आता काही करणे उरलेले नाही ,हे रुक्मिणीला जाणवले. परंतु श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे जगराहाटीसाठी जे क्रमप्राप्त आहे ते करणे गरजेचे आहे,म्हणून लौकिक देही रुक्मिणीने आपले लोचन उघडले आणि समाधानाने हरीमुखी पाहिले. जणू सर्व सुखाचे आगरच तिला प्राप्त झाले होते. 

विवाहाच्या तिसऱ्या दिवशी तेलवण पार पडलं. चवथ्या दिवशी वाणपालटण विधी होता. त्या दिवशी सर्व  वोहरांना अर्थात मेहुण बोलवून त्यांची साग्रसंगीत पूजा करून त्यांना वस्त्र अलंकार देऊन गौरविण्यात आलं. दोन्हीकडून एकमेकां कडील मेहुण अश्या पद्धतीने पूजण्यात आले. त्यानंतर सुस्थितीतील वंशवृद्धी व्हावी यासाठी  वंशपात्रदान विधी अर्थात गर्भदान विधी पार पडला. 

या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथ महाराज यांच्या कृपेने षष्ठदश प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग सप्तमदश

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०२/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...