Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१५

भोग आणि ईश्वर ६१५ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड) 
 
अतींद्रिय शक्ती किंवा अंतर्ज्ञान असं ज्याला सर्वसामान्य पणे संबोधलं जातं, त्यांचं सुद्धा एक विज्ञान आहे. मुळात सर्वच सृष्टी.विधाता नामक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांने, जेंव्हा वैज्ञानिक आधारावरच रचली, त्यावेळी त्यासंबंधीच्या सर्व छोटयातील छोट्या गोष्टींपासून, तारांगण, जीवसृष्टी, ग्रह, आकाशगंगा, अवकाश या मोठ्यातील मोठ्या, सर्वच गोष्टी विशिष्ट नियमांवर आधारित केल्या आहेत. म्हणूनच विश्व नियंत्याच्या बाबतीत, किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी असलेला मार्ग आणि त्या संबंधीचे नियम शास्त्रीय वैज्ञानिक आधारावरच रचले गेले आहेत.

अष्टांगयोगविज्ञान , शस्त्रविज्ञान, शास्त्र, नवविधा भक्ती, हे सर्वच विशिष्ट नियमांवर बेतलेलं आहे. म्हणूनच त्याचाच भाग असलेले, अंतर्ज्ञांन किंवा अतींद्रिय शक्ती किंवा intution व telepathy, यांचे देखील काही नियम व आधार आहेतच. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काही अनुभव आल्यावर आपण असं नेहमी म्हणतो की, त्या व्यक्तीला अंतर्ज्ञांन आहे किंवा काही व्यक्तींना स्वप्नात काही संकेत मिळतात आणि त्यातील बरेचसे खरे होतात. पण हे म्हणताना आपण त्याला दैवी देणगी किंवा प्रारब्धात असलेला एक योग असं संबोधून, त्या योगाचं आणि व्यक्तीचं महत्व थोडं तरी कमी करतो. 

पण यामागील शास्त्र आपण जाणत नसल्याकारणाने हे अनुमान आधारित किंवा प्रारब्ध आधारित विधान केलं जातं. यामागे एक तत्व असं आहे की, साधना, भक्ती, ईश्वर स्मरण इत्यादी अनेक मार्गांनी वाटचाल करत असताना, प्रत्येक मार्गात काही टप्पे किंवा उपलब्धी असतात, त्यातील एक टप्पा हे अंतर्ज्ञांन इत्यादी आहे. यामागचं विशिष्ट कारण, हे त्या व्यक्तीची मानसिक व आत्मिक शुद्धता, ज्ञानेंद्रिय आणि जाणीवा यांची लहरी प्राप्त करण्याची स्थिती व शक्ती आणि आध्यात्मिक प्रगती इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. 

अत्यंत गुंतागुंतीची मानसिक आत्मिक आणि बौद्धिक प्रगती साधणारी किंवा साधलेली अशी ही प्रक्रिया आहे. कदाचित मानसशास्त्र, विज्ञान आणि अध्यात्म या तीनही गोष्टींची अत्युच्च सांगड घालून, पूर्ण अभ्यासाने, सनातन भारतीय ऋषीमुनी या तात्कालीन वैज्ञानिकांनी ज्या पद्धती, शास्त्र, पुराणं, योगायाग, भक्ती इत्यादी अनेक वैज्ञानिक आधार असलेले मार्ग अर्थात most scientific methods, विकसित केलेले आहेत. 

हे मार्ग कालातीत आहेत. याचे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. एक म्हणजे भौतिक जगताबद्दल, अतींद्रिय ज्ञानाने मिळणारी माहिती अर्थात आधुनिक विज्ञान science of Universe आणि आध्यात्मिक जगता बाबत अंतर्ज्ञानाने मिळणारी माहिती अर्थात spiritual science. या दोन्हींमध्ये त्या व्यक्तीचा brain and mind power म्हणजेच बुद्धी आणि मन यांचा विकास ज्याप्रकारे होतो किंवा झालेला असतो, त्यावरून त्यांना प्रगत बुद्धीमत्ता किंवा practical or scientific intellegence आणि अध्यात्मिक बुद्धीमत्ता किंवा spiritual intellegence असं सबोधलं जातं. 

विषय खूप मोठा गहन असल्यामुळे, आपण यावर एकाग्र चिंतन उद्याच्या भागात सुरू करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...