Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१८

भोग आणि ईश्वर ६१८ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड) 

अतींद्रिय शक्ति म्हणजे विधात्याने या देहात केलेली अत्युच्च यंत्रणा सुरू होऊन, अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक, काही संदेशयंत्रणा सुरू झाली, की विधात्याशी संवाद साधण्याच्या कामाला कुठेतरी, सुरुवात होऊ शकते. पण या अतींद्रिय शक्तीचा वापर हा फक्त सकारात्मक आणि सहाय्यक कार्यासाठी केला जावा, अशी विधात्याची देखील इच्छा किंवा अपेक्षा आहे. म्हणूनच या शक्तीचा अती व गैरवापर टाळणे हे श्रेयस्कर.

मनाच्या एकाग्रतेचा सहजसुंदर परिणाम अस, ज्याला म्हणता येईल आणि मनाच्या शक्तीच्या विकासाच्या पात्रतेवरून या शक्तीचा विकास अवलंबून असतो. किंबहुना अध्यात्मिक मार्गावरील सर्वच वाटचाल ही मनाच्या विकसित होण्यावर आणि अतिरिक्त ऊर्जा व शक्ती प्राप्त करण्यावर अवलंबून आहे. अतींद्रिय शक्ती ही अनेक प्रकारच्या उपसानेतून प्राप्त करता येते. प्राप्त केलेली, टिकवून ठेवणं आणि टिकल्यानंतर, तिचा सुनियोजित व योग्य पद्धतीने उपयोग किंवा सदुपयोग करण महत्वाचं आहे.

अतींद्रिय शक्ती प्राप्ती किंवा विकास हे कुंडलिनी शक्ती प्राप्ती, या इतकचं गूढ आणि गहन आहे. मुळात ती कोणाला प्राप्त होईल, याचा अंदाज किंवा आडाखे, एखाद्या शकतील बाहयांगी पाहून, बांधता येणे कठीणच आहे. त्याचा अभ्यास हा वेगळा असू शकत नाही. कारण अश्या शक्ती या सहसा कोणाला वश असतं नाहीत किंवा होत नाहीत. विधात्याच्यां व्यवस्थेतील अनेक व्यवस्था पैकीच, अतींद्रिय शक्ती ही एक व्यवस्था. 

ही शक्ती बऱ्याच गोष्टींची, प्रश्नांची उकल, किंवा उत्तर सहजी देऊ शकते. मुळात शक्ती आणि त्यातही स्वयंभू शक्ती यामुळे, ही शक्ती परब्रम्हातील, अनेक रहस्ये, लीलया सोडवून घेऊ शकते. किंवा ज्या गूढ गोष्टी, मानवी देह मर्यादेच्या पल्याड आहेत, त्यांची माहिती, ज्ञान, आकलन, जाणीव इत्यादी मानवाला मनाच्या अमर्याद सामर्थ्याच्या माध्यमातून, पोचवण आणि माणसाला आपल्या या जन्मात पुढील प्रगतीच्या दृष्टीने अनेक गोष्टी ज्ञात होणं आवश्यक आहे. 

ही आवश्यकता का कशासाठी, हे पुढील भागात जाणून घेऊया. पण नामाच गूढ फक्त नाम घेतल्यानेच ज्ञात होतं, हे ध्यानात ठेवूनच, पुढे जाऊया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...