Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२३

भोग आणि ईश्वर ६२३
   
कालचा विषय पुढे नेऊया.  

या संपूर्ण विश्वाचा आधार असलेला विश्वात्मा, नेहमी शांततेत रत असतो. कारण मन प्रगाढ शांततेत असताना, मन खऱ्या अर्थाने आनंद अनुभवतं. म्हणजे एरवी त्याला अनुभवास येणारा आनंद हा प्रसंगानुसार येणारा असतो. वास्तविक अर्थाने तो खरा आणि नित्य अनुभव किंवा आस्वाद नाही. खरंतर आस्वाद हा एखाद्या गोष्टीची चव चाखली की वापरला जाणारा शब्द आहे. 

तो शब्द इथे कसा वापरता येईल, असा एक सहज प्रश्न मनात येऊ शकतो. पण आपण तेही जाणून पुढे जाऊ. आस्वाद हा एकप्रकारचा अनुभव असतो. सहसा चवीसाठी वापरतो. पण कोणत्याही गोष्टीचा अनुभव जेंव्हा जिव्हे व्यतिरिक्त मन घेतं, तेंव्हा तोही एक प्रकारचा आस्वादच असतो. आस्वाद घेणं ही एखाद्या पदार्थाचा गंध आल्यानंतर मनात, त्याबद्दल इच्छा जागृत झाल्यानंतर घडणारी कृती आहे. 

तर असा आस्वाद शांततेचा घेण्यासाठी मनात तशी इच्छा जागृत होणं महत्वाचं आहे. यासाठी आपलाच एखादा अनुभव आठवावा. उदाहरणार्थ, आपण कधीतरी एखाद्या थंड हवेच्या स्थळी, किंवा आपल्या आवडत्या गावी जातो. तिथे आपण एक वेगळाच आनंद अनुभवतो. तो वास्तविक अनुभव असतो. पण तो काही क्षणांचा असतो. तरीही तो काही काळासाठी मनाला प्रफुल्लित, उत्साही आणि ऊर्जा प्रदान करतो.त्यासाठीच ठराविक काळानंतर नित्य आपण अश्या यात्रेला जातो आणि तो अनुभव, ती अतिरिक्त ऊर्जा मिळवून येतोच. 

याच आस्वादाला मनात आठवून, मगच मन शांत करण्याचा प्रयास सुरू केल्यास, आपण मन शांत करण्याच्या या प्रयासात, लवकर यश मिळेल. कारण मन जे असं इंद्रिय आहे, ज्याला इच्छा, आसक्ती यांची जोड दिल्याशिवाय ते उद्दिपित अर्थात चार्ज होत नाही. 

याच प्रयासाला पुढे नेण्या विषयीचं चिंतन उद्या सुरू ठेवूया. तोपर्यंत नामातून आनंद मिळवत राहून, त्याद्वारे मनाला शांत करण्यासाठी उद्दिपित करुया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...