Skip to main content

भोग आणि ईश्वर ६१२

भोग आणि ईश्वर ६१२ (१डिसेंबर, २०२० पासून प्रतिदिन अखंड) 

शरण आणि स्मरण या दोन मार्गांनी कोणतीही व्यक्ती, निश्चितपणे, सन्मार्गाला वाटचाल करायला सुरुवात करू शक्ती. यामधे श्रद्धा आणि विश्वास यांचा हात धरला तर नक्कीच सामान्य माणूस, आपल्या संचीतातील एक एक पदर सोडवून घेऊ शकतो. ईश्वराच्या स्मरणात इतकी प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे की, त्यापुढे ब्रम्हांडातील कोणतीही शक्ती नक्कीच निष्प्रभ आणि शक्तिहीन होऊ शकते. 

अर्थात म्हटलं तर हे सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. म्हणजे कसं हे पाहूया. आपण आपल्या प्रापंचिक व्यापात असताना सुद्धा, ज्या ईश्वराने अर्थात परम पित्याने, आपल्या सर्व पुत्रांना या भूलोकी धाडून, संसार, जगरहाटी, भुलोकीचा वास, करण्यास पाठवून, इथून पुन्हा परत त्या परम पित्याकडे,. जाण्याची वाट वा मार्ग धरण्याची इच्छा, उत्पन्न होण्यासाठी, या जगताची अशाश्वत व्यवस्था निर्माण केली, त्याचं परम पित्याला विसरून, मायेचा हात हातात घेऊन, अनेक जन्माच्या मुक्कामाची सोय, त्याचेच पुत्र, स्वकर्माने करतात, त्या आपल्या पुत्राच्या स्थितीकडे पाहून, त्याचं ईश्वराची अवस्था काय होत असेल, याची कल्पना आपल्या सारख्या सर्वसामान्य जनांना येणं शक्य नाही. 

कारण या ब्रम्हांडाची निर्मिती करताना, ही व्यवस्था, तात्पुरती अर्थात कायमस्वरूपी नाही, हे ईश्वराने अनेक पद्धतीने दाखवून दिलं आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूची व्यवस्था, जे या जगात आलं, ते नष्ट होणारच, ही व्यवस्था बालपण तारुण्य आणि वृद्धावस्था यातून, बदल आणि शेवटाकडे जाणारा नश्वर देह किती कवडीमोल होण्याची स्थिती, या जगतातील प्रत्येकाला शेवट आहे ही नैसर्गिक व्यवस्था, इत्यादी अनेक गोष्टींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की, ईश्वराला प्रत्येक अवस्थेत, माणसाला पदोपदी हा संदेश दिला आहे की, तुझ्या इतकी नाशवंत गोष्ट या जगतात नाही. 

तरीही हा देह, या नश्वर गोष्टीत, माणूस जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या देहाचा, त्याच्या असण्याचा, आपल्या कर्तृत्वाचा, कार्याचा, संपत्तीचा, मायेचा, क्रोधाचा, कामाचा अहं बाळगून, स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कस्पटासमान मानून, देह असेपर्यंत, हा अहं, हा दुराग्रह, हे सर्व पूर्वग्रह यामध्येच आपला जन्म आपलं आयुष्य, त्या छोट्याश्या आयुष्यातील सर्व क्षण वाया घालवतो. यातून या जन्मात काहीच मिळत नाही. हे माहीत असूनही, सुधारणा होत नाही. 

बरं यामधे फक्त या जन्माचीच वाट लागते असही नाही. तर पुढील अनेक जन्म त्याचेच परिणाम भोगावे लागतात. पण प्रत्यक्ष परिणाम भोगाच्या रुपात समोर आले की, पुन्हा ईश्वराला दोष देऊन मोकळा होतो. म्हणजे मी केलेल्या कर्माचाच हिस्सा माझ्यासमोर येऊन उभा राहिला असताना, मी ते परिणाम भोगण्याचा कोणताही प्रश्नच येत नाही. कारण परम दयाळू ईश्वराने, ते अपराध, दोष पोटात घेऊन, मला मोठ्या उदार मनाने, क्षमा केली पाहिजे. 

या व अश्याप्रकरच्या अनेक भ्रमाबद्दल उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तोपर्यंत माझा नामाचा नेम मी चुकू देणार नाही, हे ध्यानात ठेवून नाम घ्या. 
 
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०८/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...