Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२४

भोग आणि ईश्वर ६२४
   
काल आपण पाहिल्याप्रमाणे, मनाला शांत किंवा एकाग्र होण्यासाठी, कुठल्यातरी नादाचा, कल्पनेचा, स्वर सुर यांचा, आनंदात घालवलेल्या क्षणांचा, अश्या कुठल्यातरी माध्यमाचा धागा पकडावा लागतो. हे मानसशास्त्र सुद्धा सांगतं आणि धर्मशास्त्र सुद्धा सांगतं. यामध्ये एकाग्र होण्यासाठी हा शब्द मुद्दाम वापरला, कारण सुरवातीला, आपल्याला मनाला कुठेतरी गुंतवून शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव द्यावा लागतो. म्हणजे एकदातरी या अनुभवाची गोडी घडवावी किंवा व्हावी लागते.

तरच मनाला, त्याचा आस्वाद जाणवतो आणि मन ती शांतता आणि एकाग्रता यांत,स्वतःला गुंतवून घेण्यासाठी सिद्ध किंवा तयार होतं. ही जाणिवेची जागृती, हाच जगतातील सर्व साधनांचा उद्देश आणि आत्मा आहे. नवविधा भक्तीचा, कर्मकांडाचा, ज्ञान, वैराग्य, सन्यास इत्यादी सर्व मार्गांचा, अंततः उद्देश मनाला त्या गोडीपर्यंत घेऊन जाणं हाच आहे. हेच अध्यात्मिक ज्ञानाचं सर्वात मोठं गुह्य आणि सार आहे. 

एकदा माणसाच्या मनाला, याची गोडी, स्वाद, आस्वाद यांचा अनुभव आला की, मनच आपोआप त्याच्या प्राप्ती साठी मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करतं. अशांत, अस्वस्थ, विचलित, सैरभैर, विखुरलेले मन हे नेहमी, याचं शांततेच्या आणि आनंदी अनुभवाच्या शोधार्थ अतृप्त असतं. ही अतृप्ती, मनाला, अनेक चुकीच्या, वाममार्गी , अहितकारक कर्म, चुका, प्रमाद इत्यादी करायला भाग पाडतं. 

याचं महत्वाचं कारण, खरा आनंद, खरा उद्देश, खरी शांती, खरा आनंद हा देहाच्या आत मनात आणि अतरातम्यात दडलेला आहे. पण याची जाण नसलेले जीव उद्देश, त्यांच्या पूर्ततेचं स्थान आणि कार्य याचं ज्ञान नसल्याने, चुकीच्या गोष्टी करून, अनेक चुकीचे मार्ग धरून, संसारात, प्रवाहात भरकटत जातात. चुकलेल्या कर्माच्या फलासाठी, या किंवा पुढील अनेक जन्मात भोग किंवा उपभोग भोगून, पुन्हा पुन्हा प्रवाहपतित होत जातात. 

सर्व धर्म शास्त्र, पुराणं, वेद वांगमय, संत महंत याचं कथन, सर्व ज्ञान हे याचं उद्देशापर्यंत मानवी मनाला घेऊन जाण्यासाठी आहेत. श्रीमद्भगवद्गीता, हेच ज्ञान देण्या साठी, भगवंतांनी स्वमुखे उधृत् केली. या उद्देशाला ओळखण्यातील अडचणी, अडथळे काय काय आहेत, याबद्दल उद्याच्या भागात जाणून घेऊया. ते जाणल्या नंतर, मनाचं एकाग्र न होण्यामागील, आपलं स्वतःचं काय कारण आहे आणि ते जाणल्यानंतर, मनाला कशा प्रकारे एकाग्र करायचं, यांचं तंत्र आपल्याला ज्ञात होईल. पण तोपर्यंत आपण नामाच्या आनंदात मनाला हरवून टाकण्याचा प्रयत्न करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/१०/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...