Skip to main content

भोग आणि ईश्वर ६२०

भोग आणि ईश्वर ६२०
  
 माणूस उपभोग घेत असताना कधीही हा विचार करत नाही, जो भोग भोगताना करतो. तो विचार म्हणजे, आता भोगांची परिसीमा झाली, माझी इथून पुढे भोग भोग ण्याची तयारी व इच्छा नाही. पण हाच विचार मनुष्य उपभोग, सुख इत्यादी काळात कधीही करत नाही. त्या काळात, हेच सुख, हाच काळ, हेच सर्व अमर्याद काळा पर्यंत असच सुरू राहूदे, हाच विचार त्याच्या मनात सतत येतो. तश्याच इच्छा मनात जागृत होतात. म्हणजेच सुखाबाबत मनुष्य नेहमी सकारात्मक असतो. 

पण दुःख व भोग याबाबत कायम असाच विचार माणूस करतो की, मला हे का प्राप्त झालं, मी असं काय कर्म केलं, किंवा मी कुणाचं असं काय वाकडं केलं की, हे भोग मला प्राप्त झाले. अजून कितिकाळ हे दुःखं माझ्या वाट्याला येणार आहे. इथेच खूप मोठी चूक आपण करून बसतो. म्हणजे काय करतो तर, नकारात्मक दृष्टी धरून, अनिच्छेने स्वीकारून, त्यावर मनाला, टोचण्या देतो. त्याचा अत्यंत चुकीचा परिणाम होतो. कसा त्यावर चिंतन करूया. 

मुळातच दुःख भोग हा नकारात्मक काळ असतो. त्यातच आपण विचारही नकारात्मक करतो. तेही एकप्रकारचं कर्मच आहे. तेही आपला परिणाम दाखवणार किंवा घडवून आणणार. अशा नकारात्मक विचारांचा परिणाम, त्वरित किंवा ताबडतोब होतो.उदाहरणार्थ, नकारात्मकता ही तापवलेल्या गरम पाणी किंवा तिखट यांसम तीव्र असते. अश्यावेळी या उष्ण पाण्यात किंवा तिखटात अजून तिखट घातल्यावर, परिणामी अधिक उष्णता किंवा अधिक तिखट अर्थातच अधिक तीव्र परिणाम घडून व दिसून येणारं. 

याच्याच अनिष्ट परिणाम स्वरूप, आपल्या दुःखाचा वा भोगांचा कालावधी, आपणच वाढवून घेतल्या सारखं आहे. कारण दुःख रूप नकारात्मकता आपल्या आयुष्यात भरलेली किंवा भारलेली असताना, अजून नकारात्मक विचार, त्याची तीव्रता, गती व कालावधी निश्चितच वाढवणार, यात शंका बाळगायची आवश्यकता नाही. म्हणूनच म्हटलं जातं की, संकटं आली की ती चारही बाजूंनी येतात किंवा एकाचवेळी अनेक नकारात्मक गोष्टी घडतात. 

मुळातच, भोग किंवा दुःख कोणत्याही स्वरुपात, रुपात वा परिणामांत समोर आल्यावर, सर्वात प्रथम त्याचा मनातील वा मनावरील नकारात्मक भाव वा परिणाम, होणार नाही किंवा झालेला टिकणार नाही, हे आधी पाहिलं पाहिजे.कारण त्या काळात आलेली नकारात्मकता. ही, मनातील सर्व शक्ती केंद्रं, जाणीवा, जागृत व अर्धजागृत मन यांच्यावर परिणाम करते. मनुष्य अश्यावेळी, अनेक किंवा सर्वच बाबतीत उलटा विचार सुरू करतो. 

म्हणूनच अश्या पडत्या, नकारात्मक काळात, सुरुवाती पासून काय करावं, यावर उद्याच्या भागात आत्मचिंतन करूया. पण तोपर्यंत, नामाच्या हितकारी नादाला, मनावर सकारात्मक आघात करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०९/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...